ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
आहारात का असावा खपली गहू, जाणून घ्या फायदे

आहारात का असावा खपली गहू, जाणून घ्या फायदे

महाराष्ट्रात फार पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. ज्यामुळे आजही अनेकांच्या घरी हातसडीचा गहू, खपली गहू, बिन पॉलिशची डाळ स्वयंपाकासाठी वापरली जाते. जास्त पिक घेण्यासाठी शेतीत आधुनिक बी-बियाणांचा वापर वाढला असला तरी खपली गव्हाची लागवड महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्येही केली जाते. विशेष म्हणजे खपली गहू हा ग्लुटेन फ्री असल्यामुळे मधुमेही आणि  ग्लुटेनची अॅलर्जी असलेले लोकही खपली गहू नक्कीच खाऊ शकतात. सध्या ग्लुटेनमुळे आहारातून गहू कमी केला जात असताना पुन्हा एकदा खपली गव्हामुळे अनेकांना गव्हाच्या पोळ्या, खीर, लापशी खाण्याचा आनंद घेता येत आहे. खपली गव्हाच्या पोळ्या, पुरणपोळ्या खूपच स्वादिष्ट लागतात. मात्र नेहमीप्रमाणे त्या शुभ्र दिसत नाहीत तर खपली गव्हात फायबर्सचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्या थोड्या काळसर आणि जाड होतात. खपली गहू ग्लुटेन फ्री असल्यामुळे तुम्ही आहारात बिनधास्त याचा समावेश करू शकता. यासाठीच जाणून घ्या खपली गव्हाचे फायदे आणि इतर गहू आणि खपली गव्हामधील प्रमुख फरक काय आहे.

Kuttu Atta In Marathi

खपली गहू खाण्याचे काय आहेत फायदे

खपली गहू आहारात असण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र इतर गव्हापेक्षा खपली गहू थोडा महाग असल्यामुळे तुम्ही किती प्रमाणात आहारात खपली गव्हाचा समावेश करावा हे तुमच्यावर अवलंबून आहे.

  • काही संशोधनात  असे आढळून आले आहे की खपली गहू खाण्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत नियंत्रण राहते. यासाठी मधुमेहींसाठी खपली गहू खाणे नक्कीच फायदेशीर आहे.
  • खपली गव्हामध्ये असलेल्या कार्ब्समुळे तुमची  रोग प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे वाढत्या वयातील मुले, आजारी व्यक्ती आणि  घरातील वृद्धांच्या आहारात खपली गव्हाचा समावेश असायला हवा.
  • खपली गव्हामुळे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्ऱॉल कमी होते त्यामुळे ह्रदयारोग असलेल्या लोकांसाठी खपली गहू खूप लाभदायक ठरू शकतो.
  • खपली गव्हामध्ये ग्लुटेनचे प्रमाण नगण्य असल्यामुळे ज्यांना ग्लुटेनमुळे गहू खाल्यास त्रास होतो अशा लोकांनी खपली गव्हाचा आहारात समावेश करण्यास काहीच हरकत नाही.
  • खपली गव्हामध्ये इतर गव्हापेक्षा दुप्पट प्रोटिन्स आणि दुप्पट फायबर्स असतात. त्यामुळे तुमची भूक भागते आणि लवकर भूक लागत नाही. ज्यामुळे सहाजिकच तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • खपली गव्हामध्ये असलेल्या मॅग्नेशिअम, लोह आणि इतर पोषक घटकांमुळे तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते.
  • गरोदर महिला आणि बाळंपणानंतर महिलांच्या आहारात खपली गव्हाचा समावेश असणे गरजेचे आहे. कारण या गव्हामध्ये अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे गरोदर महिला आणि नवमातांचे योग्य पोषण होते.

ADVERTISEMENT

instagram

खपली गव्हाचे पीठ आणि इतर गव्हाच्या पीठामध्ये काय असतो फरक

बाजारात गव्हाचे अनेक प्रकार मिळतात. ज्यामध्ये लोकवन, शरबती, सिहौर लोकप्रिय आहेत. बराच वेळा जास्त पिक घेण्यासाठी यांच्या मूळ पिकांमध्ये फेरबदल केले जातात. ज्यामुळे या गव्हाच्या पिठामध्ये जास्त प्रमाणात ग्लुटेन असण्याची शक्यता असते. मात्र खपली गहू हा आजही पारंपरिक पद्धतीने आणि सेद्रिंय पद्धतीनेच पिकवला जातो. खपली गव्हाची लागवड करताना कोणत्याही प्रकारचे हानिकारक केमिकल्स वापरले जात नाहीत. ज्यामुळे खपली गव्हामधील ग्लुटेनचे प्रमाण अगदी नगण्य असते. सेद्रिंय पद्धतीने पिकवलेल्या खपली गव्हाच्या दाण्याचा आकार मोठा असतो आणि त्यावर जाड खपली असते. ज्यामुळे या गव्हापासून दळलेल्या पीठात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. शिवाय बाजारात मिळणाऱ्या इतर गव्हाच्या पिठापेक्षा खपली गव्हाची पोळी लाटल्यावर काळसर आणि जाड होते. मात्र इतर गव्हाच्या पिठापेक्षा खपली गव्हाची पोळी चविष्ट आणि आरोग्यासाठी लाभदायक असते. यासाठी आहारात खपली गव्हाचा समावेश करणं नक्कीच फायद्याचे ठरेल.

instagram

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – instagram

अधिक वाचा –

पोळ्या करा अधिक पौष्टिक, गव्हासोबत या धान्यांचाही करा समावेश

आहारात गव्हाचा समावेश करुनही कसं कमी करावं वजन

ADVERTISEMENT

वर्षभरासाठी घरात असे साठवून ठेवा धान्य

12 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT