यंदाचा मदर्स डे हा लॉकडाऊन आणि कोरोनामय असला तरी खास आहे. कारण हा मदर्स डे खास करण्यासाठा आपल्या मदतीला आलं आहे गुगल. गुगल हे प्रत्येक दिवशी दिनविशेषानुसार गुगल डूडल बनवत असल्याचं आपण नेहमीच पाहत आलो आहे. आजकाल लॉकडाऊनच्या काळात तर गुगल मीट जणू सर्वांच्या ऑनलाईन भेटी घडवण्यासाठी देवदूतच ठरलं आहे. माणसं एकमेकांना प्रत्यक्षात भेटत नसली तरी टेक्नोलॉजीच्या मदतीने मात्र एकमेकांशी संपर्क साधून आहेत आणि व्हर्च्युअली का होईना. येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक सण आपल्यांसोबत साजरा करत आहे. मग मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी येणारा मदर्स डे याला अपवाद कसा असेल. हो…मदर्स डे करताही गुगल घेऊन आला आहे एक खास फिचर. यंदा मदर्स डे ला गुगल फोटोजच्या मदतीने तुम्ही तुमच्या आईसाठी खास थीम मूव्ही तयार करू शकणार आहात. हे फिचर ऑटोमॅटीक काम करणारे आहे. चला जाणून घेऊया कसा करता येईल याचा वापर येत्या मदर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी.
मोबाईलमध्ये गुगल फोटोजचा वापर करून तुम्ही अनेकदा स्पेशल मूव्ही किंवा शॉर्ट व्हिडिओज बनवले असतील. जे आपण आपल्या जवळच्यांसोबत शेअर करू शकू आणि त्यांच्यावरच असलेलं आपलं प्रेम जाहीर करण्यासाठी. पण आता गुगल फोटोजमध्ये ऑटोमॅटीक थीम मूव्ही तयार करता येणार आहे. हे फिचर गुगल फोटोजच्या अॅपमध्ये आहे. ज्याचं पूर्ण प्रोसेस आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गुगल फोटोजबाबत थोडी माहिती
– प्रत्येक एंड्रॉईड स्मार्टफोनमध्ये गुगल फोटोज हे फिचर प्री लोडेड असते आणि आयओएस फोन्समध्ये मात्र ते इन्स्टॉल करावे लागते. गुगल फोटोज हे लोकप्रिय फोटो अॅप आहे. जे फोटो स्टोर करण्यासाठी सर्वेात्तम मानलं जातं. यामध्ये एक आय फंक्शन आहे ज्यामुळे हे ऑटोमॅटीक व्हिडिओ बनतो. पण जर तुम्हाला तो व्हिडिओ आवडला नाहीतर तुम्ही एडिट आणि कस्टमाईजही करू शकता. गुगल फोटोजमध्ये तुम्ही मोबाईलमधून डिलीट केलेले फोटोज हे पुन्हा रिकव्हरही करता येतात. पण त्यासाठी गुगल फोटोजचा बॅकअप असणं आवश्यक आहे.
– गुगल फोटोजच्या या फिचरच्या मदतीने तुम्ही एक थीम निवडू शकता. एकदा निवडल्यावर ती थीम ऑटोमॅटीक स्वताचं काम करायला सुरूवात करेल आणि तुमचा झक्कास मूव्ही रेडी होईल. जर तुम्हाला त्यात काही बदल करावेसे वाटले तर तुम्ही तेही करू शकता.
आता स्टेप बाय स्टेप हा मूव्ही तयार कसा करायचा ते जाणून घ्या
मदर्स डे ला बनवा मूव्ही
- तुमच्या फोनमध्ये असलेले गुगल फोटोज हे अॅप ओपन करा.
- आता अॅपमधील लायब्ररी या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर स्क्रीनवर वरच्या बाजूला तुम्हाला Utilities असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- नवीन स्क्रीन ओपन होईल. ज्यामध्ये तुम्हाला मूव्ही हा पर्याय दिसेल. आता त्यावर क्लिक करा.
- नवीन स्क्रीन ओपन झाल्यावर त्यात सर्वात वरती न्यू असा पर्याय दिसेल. याशिवाय Meow movie, Doggie Movie आणि Selfie Movie असे पर्याय दिसतील.
- लक्षात ठेवा. जर तुम्हाला मूव्ही बनवायचा असेल तर गुगल फोटोज सर्व्हरमध्ये त्यासाठी जास्त फोटो असणं गरजेचं आहे. एका फोटोने मूव्ही बनवता येणार नाही.
मूव्ही बनवल्यानंतर कसा कराल एडीट
गुगल फोटोजतर्फे ऑटोमॅटीक तयार केलेला मूव्ही तुम्ही एडीट करू शकता. मूव्ही एडीट करायचा असल्यास सर्वात आधी मूव्ही प्ले करा. मूव्ही प्ले केल्यावर तुम्हाला एडीट असा पर्याय दिसेल. त्याच्या मदतीने तुम्हाला साऊंड ट्रॅक, फोटो आणि फोटोचा क्रमही बदलता येतो.
तुमच्या आईचे अगदी लहानपणीपासून ते आत्तापर्यंतचे फोटो सिलेक्ट करून हा मूव्ही तुम्ही बनवू शकता किंवा एखादी थीम जसं तिला ज्या गोष्टींची आवड असेल त्या गोष्टी करतानाचे फोटो जुळवून तुम्ही हा मूव्ही बनवू शकता. या मूव्हीसाठी तिचं आवडतं गाणं निवडा किंवा मदर्स डे स्पेशल कविता – गाणं निवडा. हा दिवस गुगल फोटोजच्या मदतीने तुम्ही अविस्मरणीय बनवू शकता.
मग या मदर्स डे ला तुमची आई तुमच्याजवळ नसल्यास तुम्ही गुगल फोटोजच्या माध्यमातून खास मदर्स डे शुभेच्छा देणारा मूव्ही बनवू शकता. मदर्स डे साठी कविता तर प्रत्येकजण करतोच पण तुम्ही मदर्स डे सेलिब्रेट करा युनिक आणि क्रिएटीव्ह पद्धतीने आणि आईला करा खुष. तुम्ही बनवलेला छान चित्रपट पाहून तिच्या डोळ्यात नक्कीच पाणी तरळेल.
तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. POPxo मराठी कडून तुम्हा सर्वांना मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.