गुरूपौर्णिमा (Guru Purnima 2022) हा प्रत्येक गुरू आणि शिष्यासाठी महत्त्वाचा दिवस असतो. आपल्या गुरूमुळेच आपण अनेक गोष्टी आयुष्यात शिकतो. आपल्या आयुष्यातील सर्वात पहिला गुरू म्हणजे आपले आई – वडील. त्यानंतर आपल्या आयुष्यात येतात ते आपल्या शाळेतील शिक्षक आणि मग आपल्या आयुष्यात वळणावळणावर अनेक गुरू आपल्याला भेटत जातात. आपण अनेक गुरूंकडून वेगवेगळ्या विद्या शिकत असतो. पण प्रत्येकाच्या आयुष्यात एका गुरूचं स्थान हे फारच महत्त्वाचं असतं. गुरूपौर्णिमेची माहिती तर प्रत्येकालाच असते आणि आपले आवडते गुरू आणि त्यांची तत्वे आपण नेहमीच जपतो. अशा आपल्या गुरूस्थान असणाऱ्या व्यक्तीला या गुरूपौर्णिमेच्या दिवशी काही खास भेटवस्तू तुम्ही द्यायचे ठरवले असेल तर नक्की काय द्यायचे असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच उद्भवला असेल. अशीच काही खास भेटवस्तूंची यादी आम्ही तुम्हाला या लेखातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हीही तुमच्या गुरूंसाठी खास भेटवस्तू ठरवा आणि त्यांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा देत त्यांची ही गुरूपौर्णिमा करा खास.
पहिला गुरू आईसाठी खास भेटवस्तू
आई ही आपल्यासाठी अगदी आपल्या जन्मापासून झटत असते. आपण केवळ तिच्या असण्यामुळेच आपल्या पायावर समर्थपणे उभे राहू शकतो. आयुष्यातील पहिला गुरू म्हणजे आई. सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत अविरत काम करणारी आई स्वतःसाठी फारच कमी झटते. तिचं स्वतःकडे फारसं लक्षही नसतं. अशा आईसाठी, अशा आपल्या गुरूसाठी तुम्ही एक खास MyGlamm मेकअप किट अथवा तिच्या त्वचेच्या काळजीसाठी एखादे स्किन केअर किट तिला भेट म्हणून या गुरूपौर्णिमेला नक्कीच देऊ शकता.
गुरूसाठी पेन
आपले शिक्षक हे आपल्यासाठी खास असतात आणि त्यांच्यासाठी खास असते ती त्यांची लेखणी. तुम्ही तुमच्या गुरूंसाठी काही खास भेटवस्तू शोधत असलात तर तुम्हाला MONTBLANC Meisterstuck Glacier Classique Fountain Pen (F) – White हे गिफ्ट म्हणून देता येईल. इतकं महाग गिफ्ट जरी तुम्हाला द्यायचं नसेल तरीही तुम्ही तुमच्या खिशाला परवडेल असं पेन नक्कीच गिफ्ट म्हणून आपल्या गुरूला या गुरूपौर्णिमेसाठी गिफ्ट म्हणून देऊ शकता.
त्वचेची काळजी घेण्यासाठी उत्तम गिफ्ट
धकाधकीच्या जीवनात आणि विद्यार्थ्यांच्या मागे अनेक शिक्षक आपल्या काळजीकडे दुर्लक्ष करतात. विशेषतः आपल्या त्वचेची काळजी घेणे सर्वांनाच शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही तुमच्या गुरूंना त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी Organic Harvest चे Organic Vitamin C Gifting Kit देऊ शकता. यामुळे त्यांच्या त्वचेची तर काळजी घेतली जाईलच. त्याशिवाय तुमचे आवडते शिक्षक तुम्हाला अधिक ताजेतवाने आणि फ्रेश दिसतील.
विशेष पत्र
तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि तुमच्या मनातील गुरूंचे काय स्थान आहे हे त्यांना कळण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी आपल्या मनातील भावना पत्राद्वारे व्यक्त करा. तुम्ही त्यांच्यासाठी खास पत्राद्वारे गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा द्या. आजकाल डिजीटल जगात पत्र लिहिणे हे खूपच मागे राहिले आहे. त्यामुळे तुम्ही जर पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्यात तर तुमच्या गुरूंनाही अगदी मनापासून आनंद होईल हे नक्की!
फूल आणि हाती तयार केलेले ग्रिटींग कार्ड
गुरूंना आपल्या विद्यार्थ्यांकडून भरघोस गुण आणि त्यांचे मोठे झालेले नाव, यश याव्यतिरिक्त काहीही नको असते हे जरी खरे असले तरीही तुम्ही गुरूपौर्णिमेला भेट म्हणून अगदी त्यांच्या आवडते फुल आणि हाती तयार केलेले ग्रिटींग कार्डही देऊ शकता. आजकाल अशा पद्धतीने गिफ्ट्स देणे खूपच कमी झाले आहे. त्यामुळे तुम्ही साधे पण अगदी त्यांच्या मनापर्यंत भावना पोहचतील असे परिणामकारक हे गिफ्ट नक्कीच देऊ शकता.
प्रत्येकाचे गुरू हे त्यांच्यासाठी खास असतात आणि गुरूचा हा खास दिवस अर्थात गुरूपौर्णिमा खास करण्यासाठी आम्ही सुचवलेले गिफ्ट्स तुमच्यासाठी नक्कीच आधार ठरतील असा आम्हाला विश्वास आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक