आंघोळ करताना, केस धुताना काही प्रमाणात केस गळणे अगदी सामान्य आहे. केस धुताना अगदी प्रत्येकाचे केस काही प्रमाणात गळतात. पण जेव्हा शॉवर ड्रेनमध्ये आपल्याला आपल्या गळलेल्या केसांचा मोठा गुंता दिसतो तेव्हा अंतर आपल्याला चिंता वाटू लागते कारण अति प्रमाणात केस गळणे हे धोकादायक असू शकते. अति प्रमाणात केस गळणे हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. म्हणूनच शॉवर दरम्यान भरपूर प्रमाणात केस गळत असल्याचे लक्षात आल्यास, ते निश्चितच चिंतेचे कारण असू शकते. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की केस धुताना त्यांची मुळे सामान्यतः कमकुवत होतात आणि म्हणूनच ते लवकर तुटतात व गळतात. परंतु शॉवर दरम्यान केस गळण्याचे हे एकमेव कारण नाही. पण इतरही अनेक कारणे असू शकतात. केसगळतीवर घरगुती उपाय देखील करता येतात.
केसगळतीची कारणे
केसांच्या वाढीचे अनेक टप्पे असतात. ऍनाजेन- अंदाजे 85% ते 90% केस कोणत्याही वेळी या सक्रिय वाढीच्या टप्प्यात असतात.कॅटजेन – . कोणत्याही वेळी सुमारे 10% केस या क्षीण वाढीच्या टप्प्यात असतात. टेलोजन- सुमारे 5% ते 10% केस कोणत्याही वेळी या टप्प्यात असतात. तज्ज्ञांच्या मते जेव्हा हे टप्पे त्यांच्या सामान्य संतुलनात असतात, तेव्हा सरासरी व्यक्तीचे दिवसाला सुमारे 100 केस गळतात. टेलोजन टप्प्यात असताना केस मुळापासून गळतात. पण जर हे टप्पे असंतुलित झाले आणि अधिक केस टेलोजन टप्प्यात प्रवेश करत असतील, तर केस गळतीचे प्रमाण वाढू शकते. तसेच तुमचे केस जर दाट असतील तर अशावेळी सामान्यतः केसांची संख्या जास्त असते. तुमच्या टाळूवर केसांची संख्या जास्त असल्यामुळे त्या प्रमाणात तुमचे जास्त केस गळू शकतात.
शॉवरमध्ये केस गळतात कारण तुम्ही केस धुताना किंवा केसांना कंडिशन केल्यावर तुमची टाळू उत्तेजित होते. तुमचे केस जे आधीच गळायचे ठरले होते ते शॅम्पू केल्याने त्यांना मुळापासून गळणे अधिक सोपे होते. तुम्ही जर केस धुण्यामध्ये खूप गॅप ठेवत असाल तर तुम्हाला केस धुताना जास्त केस गळताना दिसतील.
केस धुताना ही काळजी घ्या
- केस धुण्यासाठी फक्त कोमट पाणी वापरा. हिवाळ्यात थंडी पडते तेव्हा आपण आंघोळीसाठी खूप गरम पाणी घेतो किंवा इतर वेळेला रिलॅक्स होण्यासाठी गरम पाण्याचा शॉवर घेती. दिवसभराच्या कामाने दमल्यावर गरम पाण्याने आंघोळ करणे खूप सुखदायक वाटते परंतु केस धुण्यासाठी अगदी गरम पाणी वापरण्याची चूक करू नका. फक्त थोडे कोमट पाणी वापरा. गरम पाण्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस ठिसूळ होऊन गळण्याची शक्यता वाढते.
- रुक्ष हवामानामुळे केस कोरडे होतात. केस आधीच कोरडे असल्यास, शॅम्पूमुळे आणखी कोरडे होतात. चांगल्या मॉइश्चराइज्ड केसांसाठी को-वॉशिंग किंवा कंडिशनर वॉशिंग करा, म्हणजे कंडिशनर वापरूनच केस धुवा. परंतु तुमचे केस पातळ असल्यास आणि टाळू ऑईली असल्यास सल्फेट-मुक्त सौम्य शॅम्पू वापरा.
- तुमच्या केसांना चांगले तेल लावा. तुमचा स्कॅल्प अत्यंत कोरडा असेल तर त्यामुळे फॉलिकल्स सैल होऊ शकतात ज्यामुळे केस गळतात आणि कोंडा होतो.टाळू कोरडी होऊ नये म्हणून केस धुण्यापूर्वी नैसर्गिक तेलाने केसांच्या मुळांना व टाळूला हळुवार मसाज करणे आवश्यक आहे.
- केसांना शॅम्पू करण्यापूर्वी केस चांगले विंचरा आणि त्यांतील गुंता पूर्ण काढून घ्या. त्यामुळे केस तुटणे आणि खडबडीत होणे टाळता येईल. केस चांगले विंचरण्यासाठी रुंद व जाड दातांचा कंगवा वापरा.
- केसांची चांगली निगा राखा. केस धुण्यापूर्वी नैसर्गिक हेअर पॅक किंवा हेअर प्रोटीन क्रीम वापरा आणि धुतल्यानंतर चांगले सीरम वापरा.
अशा प्रकारे तुम्ही केस धुताना ते तुटू नयेत म्हणून काळजी घेऊ शकता.
Photo Credit – unsplash.com
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक