ADVERTISEMENT
home / आरोग्य
increased uric acid symptom

शरीरात युरिक ऍसिडची पातळी वाढली असेल तर हे पदार्थ खायला हवेत 

आजकाल खराब जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे अनेक लोकांमध्ये युरिक ऍसिडची समस्या सामान्य झाली आहे. आपण जे अन्न खातो त्यामुळे शरीरात युरिक ऍसिड तयार होते. सामान्यतः, शरीरातील हे वाढलेले युरिक ऍसिड मूत्रपिंडांद्वारे शरीरातून काढून टाकले जाते, परंतु काहीवेळा जेव्हा युरिक ऍसिड खूप वाढते तेव्हा आपली मूत्रपिंडे ते काढून टाकण्यात अपयशी ठरतात. उच्च कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, मधुमेह यासारख्या समस्यांमुळे लोक चिंताग्रस्त असतात. युरिक ऍसिडची पातळी वाढली असेल तर काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त असल्याने लठ्ठपणा, सांधेदुखी आणि किडनीच्या आजारांचा धोका वाढतो हे अनेकांना माहित नाही. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरु करावे लागतात. पण काही नैसर्गिक उपाय देखील युरिक ऍसिडच्या समस्येवर प्रभावी आहेत.

युरिक ऍसिड म्हणजे काय?

Increased Uric Acid Symptoms
Increased Uric Acid Symptoms

युरिक ऍसिड हे एक रसायन आहे जे नैसर्गिकरित्या शरीरात फार कमी प्रमाणात आढळते. हे शरीरातील अनेक प्रक्रियांमध्ये तयार होते आणि कधीकधी मटार, पालक, सीफूड, लाल मांस,बिअर यांसारखे खाद्यपदार्थ पचवतांना शरीरात तयार होते. कारण या पदार्थांत प्युरिन नावाचा एक घटक असतो. अन्नपचन होताना हे ऍसिड रक्तामध्ये मिसळते व किडनी ते फिल्टर करते आणि जास्तीच्या मूत्रासह ते शरीरातून ते उत्सर्जित होते. परंतु जेव्हा शरीरात प्युरीनचे प्रमाण वाढते तेव्हा शरीर ते सहज फिल्टर करू शकत नाही किंवा पचवू शकत नाही. अशा वेळी रक्तातील युरिक ऍसिडची पातळी वाढते, याला हायपरयुरिसेमिया म्हणतात. त्याची वरची मर्यादा 6.8mg/dl असते आणि जेव्हा 7mg/dl ची मर्यादा ओलांडली जाते तेव्हा शरीराला युरिक ऍसिड फिल्टर करण्याची समस्या येऊ लागते.

शरीरात युरिक ऍसिडची पातळी वाढली असल्याची लक्षणे 

अनेकदा असे आढळून येते की असे 1/3 रुग्ण आहेत ज्यांच्या शरीरात युरिक ऍसिडची पातळी वाढते तेव्हा त्यांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. पण, जर तुमच्या शरीरात युरिक ऍसिडची पातळी जास्त असेल पुढील लक्षणे जाणवतात. 

  • सांध्यांवर सूज किंवा लालसरपणा
  • शरीरात तीव्र वेदना होणे 
  • मुतखडा
  • मळमळणे किंवा अस्वस्थता 
  • जास्त प्रमाणात लघवी होणे 
  • मूत्रामध्ये रक्त जाणे
  • दुर्गंधीयुक्त मूत्र
  • ओटीपोटात किंवा पाठीत वेदना होणे 

युरिक ऍसिड वाढण्याचे कारण काय

Increased Uric Acid Symptoms
Increased Uric Acid Symptoms

शरीरात युरिक ऍसिड वाढण्याची अशी ठोस काही कारणे सांगता येऊ शकत नाहीत. काही लोकांमध्ये चुकीचा आहार घेतल्याने किंवा खाण्यापिण्यात काही बदल झाल्याने होऊ शकते. काहीवेळा हे काही अनुवांशिक कारणांमुळे देखील होते. पनीर, राजमा, सीफूड, मसूर, तांदूळ यांसारख्या खाद्यपदार्थांमुळे देखील ते वाढू शकते. आणि मधुमेह, ताणतणाव किंवा लठ्ठपणा आणि जास्त वेळ पोट रिकाम्या राहिल्यामुळे शरीरात युरिक ऍसिड वाढण्याचा त्रास होऊ शकतो. 

ADVERTISEMENT

युरिक ऍसिडच्या त्रासावर हळद ठरते प्रभावी 

जेव्हा युरिक ऍसिडची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक आहार काही गोष्टी पाळणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारची अतिदाहक प्रतिक्रिया टाळता येईल. शरीरातील 2/3 युरिक ऍसिड प्युरीनच्या सेवनाने तयार होते. ऍसिडच्या वाढीव पातळीमुळे होणारे त्रास टाळण्यासाठी डॉक्टर अनेकदा आले, मिरपूड आणि खोबरेल तेलासह हळद खाण्याचा सल्ला देतात. यासोबतच हळद रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित समस्यांमध्येही मदत करते. परंतु आहारात हळदीचे प्रमाण वाढवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

युरिक ऍसिडची पातळी कमी करण्यासाठी विड्याची पाने आहेत गुणकारी 

अभ्यासानुसार, विड्याची पाने युरिक ऍसिड कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. युरिक ऍसिडच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रोज विड्याचे पण खाल्ले पाहिजे. परंतु यावेळी हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण पान चवीसाठी नव्हे तर युरिक ऍसिड कमी करण्यासाठी चघळत आहात. त्यामुळे पान खाताना ते साधेच खावे. त्यात कुठलेही तंबाखूजन्य पदार्थ घालू नयेत. 

अशा प्रकारे तुम्ही शरीरातील युरिक ऍसिडची पातळी नियंत्रित करू शकता. 

Photo Credit – istockphoto

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

07 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT