home / Diet
मधुमेहींनी यासाठी खायला हवी अळकुडीची भाजी

मधुमेहींनी यासाठी खायला हवी अळकुडीची भाजी

 

अळकुडी म्हणजेच अळुच्या मुळांची भाजी अनेकांना आवडत असेल. काही जण अळकुडीला अरबी असंही म्हणतात. अरबीपासून सुक्या भाजीप्रमाणेच कुरकुरीत भजी, वडी, पातळ रस्सा भाजी, कटलेट असं बरंच काही बनवता येतं. बाजारात अळकुडीची मुळं सहज मिळतात. उपवासाच्या दिवशी कंदमुळांप्रमाणे उकडून त्यात दही अथवा चटणीसोबत ही मुळं खाल्ली जातात. अळुची पानं जशी भाजी आणि वडीसाठी वापरली जातात.तशीच भारतीय खाद्यसंस्कृतीत अळुची मुळं म्हणजेच अळुकुडी आहारात वापरण्याची पद्धत आहे. अळकुडी भाजी चवीला जितकी छान लागते तितकीच ती आरोग्यासाठी उत्तम असते. आयुर्वेदात देखील अळकुडीच्या भाजीला एखाद्या औषधाप्रमाणे स्थान आहे.अळकुडीमध्ये फायबर्स, प्रोटिन्स, पोटॅशिअम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, लोह , अॅंटि ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात.  यासाठीच जाणून घ्या अळकुडी भाजी का खायला हवी आणि विशेषतः उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी आणि मधुमेहींसाठी अळकुडीची भाजी का उपयुक्त आहे.

instagram

जाणून घ्या का खायला हवी अळकुडीची भाजी

 

अळकुडीची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत विशेषतः रक्तदाबाची समस्या असलेले आणि मधुमेहींनी अळकुडीची भाजी खायलाच हवी.

 • अळकुडी खाण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते ज्यामुळे मधुमेहींनी आहारात अळकुडीच्या भाजीचा समावेश करावा. 
 • अळकुडीच्या भाजीत टॅनिन असते ज्यामुळे ती खाल्लावर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.
 • अळकुडीची भाजी खाण्यामुळे पोट साफ होते आणि पित्ताची समस्या कमी होते.
 • अळकुडीच्या भाजीत फायबर्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीरात फॅट्स जमा होत नाहीत आणि तुमचे वजन कमी होते.
 • अळकुडीमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
 • उन्हाळ्यात ज्यांना डोकेदुखी जाणवते अशा अशा लोकांना अळकुडी खाल्ल्यास डोकेदुखीच्या वेदना कमी होतात. ताक, दह्यात अळकुडी मिसळून खाल्ल्यास जास्त फायदा होतो.
 • बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास नियमित अळकुडीची भाजी खावी अथवा अळकुडीचा रस प्यावा. 
 • अती रक्तदाब असलेल्या लोकांनी अळकुडी खाल्ल्यास त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
 • कानातून पाणी येत असल्यास अळकुडीच्या पानांचा रस कानात घालावा ज्यामुळे कानाच्या समस्या कमी होतात.
 • अळकुडी खाण्यामुळे दृष्टी तेजस्वी होते. डोळ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी आहारात अळकुडीचा समावेश करावा
 • अळकुडीमध्ये असलेल्या ग्लायकोसाईड्समुळे कफ आणि खोकल्याचा त्रास लवकर बरा होतो. 
 • कीटकदंश झाल्यास अळकुडीच्या पानांचा रस त्या जागी लावल्याने विषबाधा होत नाही. 
 • अळकुडीमुळे शरीरावर येणारी सूज कमी होते. अळकुडीच्या खोडाचा रस सूज आलेल्या ठिकाणी लावावा. 
 • झोपेच्या समस्या जाणवत असतील तर अळकुडीची पातळ रस्साभाजी रात्री झोपण्यापूर्वी खावी. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येते. 
 • केसांच्या समस्यांवरही अळकुडी उपयुक्त आहे. केसांना अळकुडीच्या कंदाचा रस लावल्यास केस गळणे कमी होते.
 • अशक्तपणा कमी करण्यासाठी अळकुडी भाजून त्याचे भरीत करून खावे. ज्यामुळे अंगात ताकद येते आणि रक्तात वाढ होते.
 • जर तुमची भूक मंदावली असेल तर आहारात अळकुडीचा समावेश करा. अळकुडी अथवा अळुच्या भाजीच्या चवीमुळे तुम्हाला भूक लागण्यास सुरुवात होते. 
 • थोडक्यात अळकुडीची भाजी सर्वांनी नियमित खायला हवी. कारण ही भाजी आरोग्यासाठी लाभदायक ठरते. निरोगी राहण्यासाठी आणि प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अळकुडीची भाजी खाणं तुमच्या चांगलंच फायद्याचं ठरू शकतं. 

श्रावण घेवडा भाजी

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

उन्हाळ्यात यासाठी खायलाच हवेत ताडगोळे

सतत खाऊ नका ओवा,संभवतील या आरोग्य तक्रारी

जाणून घ्या कंदमूळं खाणं आरोग्यासाठी कसं आहे फायदेशीर

पारंपारिक भाजणीचे थालीपीठ रेसिपी मराठी

06 May 2021

Read More

read more articles like this
good points logo

good points text