महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात अशा अनेक ठिकाणी भाकरी खाण्याची पद्धत आहे. कारण भाकरी हे परिपूर्ण अन्न आहे. अनेक प्रकारच्या धान्यापासून भाकरी करता येते. साधारणपणे तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी या धान्याच्या पिठाची भाकरी करतात. काही जण सर्व प्रकारच्या धान्याचे पीठ एकत्र करून त्याची भाकरी करतात. ज्यामुळे सर्व प्रकारची तृणधान्ये आहारातून शरीरात जातात. भाकरीमधून शरीराला पुरेसे फायबर्स, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, कार्बोहायड्रेड मिळतात. ज्यामुळे तुम्ही तुमच्या गव्हाच्या पोळीच्या ऐवजी आहारात सर्व प्रकारच्या धान्याच्या भाकरीचा नक्कीच समावेश करू शकता. कारण ती आरोग्यासाठी जास्त लाभदायक आहे. गव्हाच्या पोळीत जास्त प्रमाणात ग्लुटेन असते. शिवाय एका ठराविक वयानंतर गव्हाची पोळी खाण्यामुळे अॅसिडिटीची समस्या वाढू लागते. वयोमानानुसार शारीरिक फिटनेससाठी भाकरी खाणं फायद्याचं ठरतं. भाकरी खाण्यामुळे तुमच्या ह्रदयाच्या आणि मेंदूच्या कार्याला चांगली चालना मिळते. यासाठी जाणून घ्या भाकरीचे विविध प्रकार आणि त्याचे फायदे
भाकऱ्यांचे प्रकार –
ज्वारीच्या पिठाची भाकरी –
ज्वारी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तृणधान्य आहे. ज्वारीची भाकरी पचण्यास अतिशय हलकी असते. जर तुम्हाला रोज भाकरी खाणं शक्य नसेल तर कमीत कमी आठवड्यातून दोन ते तीन दिवस भाकरी जरूर खा. गर्भधारणा, गरोदरपण, मासिक पाळीच्या समस्या, रजोनिवृत्ती अशा काळात भाकरीचा आहार घेतल्यास महिलांचे हॉर्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते. ब्लडप्रेशर, अपचनाच्या समस्या, अशक्तपणा, मधुमेह, वजन कमी करण्यासाठी, ह्रदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आहारात ज्वारीच्या भाकरीचा जरूर समावेश करा. शिवाय वजन कमी करण्यासाठी नियमित ज्वारीच्या भाकरी खाण्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
बाजरीच्या पिठाची भाकरी –
हिवाळ्यात महाराष्ट्रात बाजरीची भाकरी आवर्जून खाल्ली जाते. मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीला बाजरीची भाकरी आणि मिक्स फळभाजीचा नैवेद्य दाखवला जातो. बाजरी उष्ण गुणधर्माची असल्याने बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसात खाण्याने शरीराला पुरेशी ऊर्जा आणि उष्णता मिळते. बाजरीच्या भाकरीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. या भाकरीमुळे पचनक्रिया सुधारल्यामुळे तुम्हाला अपनाची समस्या जाणवत नाही. पर्यायाने तुमचे वजन कमी होण्यास चांगली मदत होते. यासाठी हिवाळ्यात तुमच्या आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करा.
नाचणीच्या पिठाची भाकरी –
नाचणीत भरपूर प्रमाणात फायबर्स, प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम आणि लोह असतं. नाचणीच्या भाकरीतून ते तुमच्या शरीराला सहजपणे मिळतं. नाचणी खाण्यामुळे शरीराची झीज लवकर भरून काढली जाते. यासाठीच अशक्तपणा अथवा आजारी व्यक्तीला नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो. नाचणी थंड स्वरूपाची असल्यामुळे उन्हाळ्यात आहारात नाचणीच्या भाकरीचा समावेश जरूर केला जातो.
तांदळाच्या पिठाची भाकरी –
तांदूळ बऱ्याचदा भात अथवा भाताचे विविध प्रकार करण्यासाठी वापरला जातो. कोकणात भाताप्रमाणेच भाकरीसाठीही तांदळाचा वापर केला जातो. हातसडीच्या तांदळाची भाकरी खाण्याने शरीराला चांगले फायदे मिळतात. पॉलिश न केलेल्या तांदळाची भाकरी लालसर रंगाची दिसते. मात्र या भाकरीत फारबर्स मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ती भाकरी आरोग्यासाठी हितकारक ठरते. अशा भाकरीतून पोटाच पुरेसे फायबर्स गेल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
सर्व धान्यांच्या पिठाची मिक्स भाकरी –
बऱ्याचदा सर्व प्रकारच्या धान्यांचे पीठ एकत्र करून भाकरी केली जाते. अशी भाकरी खाण्याने सर्व प्रकारची धान्ये पोटात जातात. ज्यामुळे पुरेसे फायबर्स शरीरात जातात. सर्व धान्यांमध्ये असलेली पोषक तत्त्वे या माध्यमातून शरीराला मिळतात.
यासाठीच तुमच्या आहारात भाकरीचा समावेश जरूर करा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
अधिक वाचा –
रोज पोळी खात असाल तर जाणून घ्या किती आहे फायदेशीर
हिवाळ्यात मक्याचं पीठ वापरून केलेली पोळी आणि पदार्थ खाण्याचे फायदे
दुपारच्या जेवणात या पदार्थांचा समावेश असेल… तर तुम्ही राहाल निरोगी