ADVERTISEMENT
home / Diet
benefits of pistachios

हृदयाचे आरोग्य ते वजन कमी करण्यात फायदेशीर-पिस्त्याचे आरोग्यदायी फायदे वाचा

सुकामेवा खाणे आपल्या शरीरासाठी चांगले असते. बदाम, अक्रोड, मनुका, खारीक, खजूर, अंजीर यांच्याबरोबर पिस्ता खाणे देखील आरोग्यासाठी खूप चांगले असते. काजू किंवा हेझलनट प्रमाणे पिस्त्यामध्ये जास्त कॅलरीज नसतात.म्हणूनच हिवाळ्याच्या मोसमात दररोज थोड्या प्रमाणात पिस्ता खाल्ला पाहिजे कारण पिस्ता खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. नुसता खाता येत नसेल तर सुक्यामेव्याचे पौष्टिक लाडू तुम्ही खाऊ शकता.

पिस्ताशीया वीरा नावाच्या झाडाच्या बियांना आपण पिस्ता म्हणून ओळखतो. पिस्त्यामध्ये हेल्दी फॅट्स , प्रोटिन्स, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. तसेच यात अनेक पौष्टीक घटक आहेत ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते शिवाय पिस्त्यामुळे पोटाचे तसेच हृदयाचे आरोग्य राखण्यास देखील मदत होते. इतिहास सांगतो की लोक इसवी सन पूर्व काळात देखील पिस्ता खात असत. पिस्त्याचे हे फायदे कळल्यावर तुम्ही नक्कीच आहारात त्याचा समावेश कराल. 

वजन कमी करण्यास मदत

पिस्ता खाल्यावर बराच वेळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. आणि प्रत्येक पिस्त्यामध्ये कमी कॅलरीज असतात. म्हणजे संध्याकाळच्या चहा-कॉफीबरोबर तुम्ही पिस्ते खाऊ शकता. अर्थात एका दिवशी दहा पेक्षा जास्त पिस्ते खाऊ नका. एका दिवशी दहा पिस्ते खाल्ले तरी जास्त कॅलरीज पोटात जाणार नाहीत. 

अधिक वाचा – सुकामेवा खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

ADVERTISEMENT

डायबेटीससाठी उपयुक्त 

2014 साली रिव्ह्यू ऑफ डायबेटिक स्टडीजमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिले होते की, ज्या मधुमेही व्यक्तींनी 12 आठवडे दररोज 25 ग्रॅम पिस्ते खाल्ले त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी सुधारली. पिस्ते खाल्ल्यानंतर त्यांचा रक्तदाब, बॉडी मास इंडेक्स आणि सी-रीऍक्टिव प्रोटीन देखील कमी झाले. 

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत 

आहारात नियमित पिस्ते खाल्ल्यास  रक्तातील  बॅड कोलेस्टेरॉल, एलडीएल कमी होण्यास मदत होते आणि शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल, एचडीएल वाढते. यामुळे  हृदयविकार लांब राहण्यास मदत होते. 

हिमोग्लोबिन व रोगप्रतिकारशक्ती वाढते 

व्हिटॅमिन बी 6 हे प्रोटीन रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते. पिस्त्यात व्हिटॅमिन B6 चे प्रमाण जास्त असते. म्हणूनच  जर आपण रोज पिस्त्याचे सेवन केले तर ते आपल्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवू शकते आणि आपले हिमोग्लोबिन वाढवू शकते. व्हिटॅमिन बी 6 मुळे शरीराची प्रतिकारशक्ती देखील वाढते. 

निरोगी त्वचा 

पिस्त्यांमध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाण जास्त असते. व्हिटॅमिन ई आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. नियमितपणे पिस्त्याचे सेवन केल्यास त्वचा निरोगी व नितळ राहण्यास मदत होते तसेच केसांची वाढ देखील चांगली होते.  

ADVERTISEMENT

याखेरीज पिस्त्यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, थियामिन , तांबे व मँगनीज असते. पिस्त्यांमध्ये अँटीऑक्सीडेंट्सचे प्रमाण खूप असते. अँटिऑक्सिडंट्स आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहेत.त्यामुळे आपल्या पेशींचे नुकसान टळते आणि कर्करोगासारख्या रोगाचा धोका कमी करण्यात अँटिऑक्सिडेंट्स महत्त्वाची भूमिका बजावतात.

पिस्त्यात इतर नट्स आणि बियांपेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट असतात. खरं तर पिस्त्यांखेरीज फक्त अक्रोड आणि पेकन्स नावाच्या बियांमध्ये जास्त अँटिऑक्सिडंट असतात. पेकन्स हा सुक्यामेव्याचाच एक प्रकार आहे पण तो आपल्याकडे फारसा मिळत नाही. पण पिस्ते आपल्याकडे मुबलक प्रमाणात मिळतात त्यामुळे अक्रोड आणि पिस्ते आपल्या आहारात असायला हवेत. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात असे आढळले की पिस्ते न खाल्लेल्या लोकांच्या  तुलनेत दररोज पिस्ते खाल्ले त्यांच्या शरीरात ल्युटीन आणि γ-टोकोफेरॉलची पातळी जास्त होती.इतर सुक्यामेव्याच्या तुलनेत पिस्त्यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनचे प्रमाण सर्वाधिक असते, हे दोन्ही डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे अँटिऑक्सिडंट्स आहेत. 

ही सर्व कारणे वाचल्यानंतर नक्कीच तुम्ही तुमच्या आहारात पिस्त्यांचा समावेश कराल.

अधिक वाचा – सुकामेवा जास्त दिवस टिकण्यासाठी फॉलो करा या किचन टिप्स

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

11 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT