ADVERTISEMENT
home / आरोग्य
health benefits of red Banana in Marathi

लाल केळं आहे आरोग्यासाठी उत्तम, जाणून घ्या फायदे

भारतात मोठ्या प्रमाणावर केळ्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे भारतात केळं हे फळाप्रमाणे खातातच शिवाय त्याचा वापर स्वयंपाकातही मोठ्या प्रमाणावर होतो. केळ्याची भाजी, शिकरण, काचऱ्या, भजी, वडे आणि विविध गोड पदार्थ बनवले जातात. पिकलेलं पिवळं धम्मक केळं अथवा हिरव्या रंगाचं कच्चं केळं आपण नियमित खातोच मात्र तुम्ही कधी लाल केळं खाल्लं आहे का? लाल केळ्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे आजारपणापासून तुम्ही दूर राहता.  जाणून घ्या लाल केळ्याचे फायदे

नियमित केळी खाण्याचे फायदे (Banana Benefits In Marathi)

रोग प्रतिकार शक्ती वाढते 

निरोगी राहण्यासाठी नियमित एक केळं खाणं गरजेचं आहे. लाल केळ्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते. कारण या केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी आणि बी 6 असतं. शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे घटक खूप आवश्यक असतात. लाल केळ्यामुळे शरीरात पांढऱ्या रक्त पेशी वाढण्यास मदत होते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी या पेक्षा सुरक्षा रक्षकाप्रमाणे कार्य करतात. सहाजिकच लाल केळं खाण्यामुळे तुम्ही आजारपणापासून दूर राहता.

हाडे मजबूत होतात 

लाल केळं खाण्यामुळे तुमची हाडे मजबूत आणि स्नायू बळकट होतात. एवढंच नाही तर तुमच्या हाडांच्या समस्यादेखील यामुळे दूर होतात. कारण लाल केळ्यात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसं पोषण मिळतं आणि हाडांवर चांगला परिणाम होतो.

ADVERTISEMENT

वजन नियंत्रित राहतं

आजकाल वाढते वजन ही अनेकांची डोकेदुखी ठरत आहे. बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव अशी अनेक कारणं वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. मात्र जर तुमच्या आहारात नियमित लाल केळं असेल तर तुमचं वजन नक्कीच नियंत्रणात राहू शकतं. कारण या केळ्यामध्ये फायबर्स जास्त आणि फॅट्स कमी असतात. वजन वाढवायचे असेल तर जाणून घ्या वजन वाढवण्यासाठी फळं (Weight Gaining Fruits In Marathi)

अशक्तपणा कमी होतो

ज्यांना अशक्तपणा असतो त्यांनी आहाराबाबत वेळीच काळजी घेण्याची गरज असते. आहारात पोषक घटक असतील तर रक्त वाढण्यास आणि अॅनिमिया कमी होण्यास मदत होते. यासाठी अशा लोकांना लाल केळं खावं. कारण त्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 खूप मोठ्या प्रमाणावर असतं. शिवाय यातील अॅंटि ऑक्सिडंटमुळे तुमच्या हिमोग्लोबिनवर चांगला परिणाम होतो आणि अॅनिमिया दूर होण्यास मदत होते. 

इन्संट एनर्जी मिळते

आजकाल धावपळीच्या काळात प्रत्येकाला कामातून वेळ काढणं आणि वेळेत जेवणं कधी कधी शक्य होत नाही. अशा वेळी जर तुम्ही एक लाल केळं खाल्लं तर तुमच्या शरीराचं पोषण होतं, भुक भागते आणि तुम्हाला उत्साही देखील वाटतं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला पटकन उत्साही वाटावं असं वाटत असलं तेव्हा लाल केळ्याचे सेवन जरूर करा. 

आरोग्यासाठी उत्तम फॉलिक ॲसिड पदार्थ | Folic Acid Foods In Marathi

ADVERTISEMENT
23 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT