रात्री छान आंघोळ करुन झोपायची अनेकांना सवय असते. आंघोळ केली नाही तर अशा व्यक्तींना झोप येत नाही. पण तुम्ही ही आंघोळ जर जेवणानंतर करत असाल तर तसे करणे आताच थांबवा कारण जेवणानंतर आंघोळ करणे आरोग्यासाठी चांगले नाही. तुम्हालाही जेवणानंतर आंघोळ करायची सवय असेल तर तुम्हाला या गोष्टी माहीत हव्यात. म्हणजे जेवणानंतर आंघोळ करायची की नाही हे तुम्ही ठरवू शकाल. आयुर्वेदानुसार आणि मेडिकल सायन्सनुसार याची कारणं वेगवेगळी असली तरी त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.
प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीचा वापर करत असाल तर मग एकदा वाचाच
शरीर स्वच्छ करण्यासोबतच शरीराला थंड करण्याचे काम करत असते. जेवल्यानंतर तुमच्या शरीराचे तापमान वाढते. अशावेळी तुम्ही आंघोळ केली की, तुमच्या शरीराचे तापमान अचानक थंड होते. शरीर थंड झाल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या रक्तप्रवाहावर होत असतो. तुमच्या शरीराला होणारा रक्तपुरवठा अचानक कमी झाल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळेच जेवणानंतर आंघोळ करण्याच्या फंदात पडू नका.
अन्न पचण्यास अडथळा
शरीराचे तापमान थंड झाल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या पचनशक्तीवर होते. शरीराचे तापमान वाढल्यानंतर तुमचे अन्नही तितक्याच जलदगतीने पचत असते. पण ज्यावेळी तुम्ही अंगावर पाणी घेता त्यावेळी तुमची पचनशक्ती मंदावते. तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. करपट ढेकर, गळ्याशी तिखट पाणी असे त्रास तुम्हाला यामुळे होऊ शकता. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला डोकेदुखी येऊ शकते.
रात्री शांत झोप येत नाही का, मग फॉलो करा या टिप्स
लठ्ठपणा वाढू शकतो
जेवणानंतर आंघोळ केली तर तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो असे देखील विज्ञान सांगते. आता या मागील कारण ही अपचन आहे. कारण तुमच्या शरीरातील फॅट तसेच साठून राहते. त्यामुळेच तुमचा लठ्ठपणा वाढू लागतो. आता तुम्हाला सध्याच्या घडीला तुम्हाला अपचन झाले तरी चालेल पण लठ्ठपणा झालेला अनेकांना आवडणार नाही नाही का? त्यामुळे जे आधीच फार स्थुल असतील त्यांनी ही चूक अजिबात करु नका.
आंघोळीशिवाय नाही का पर्याय
आता काही जणांना झोपताना आंघोळ केल्याशिवाय चैनच पडू शकत नाही. अशांना त्यांची सवय बदलता येत नसेल तर तुम्ही जेवल्यानंतर किमान दोन तास तरी आंघोळ करु नका. आयुर्वेदानुसार तुमच्या पोटातील अन्न पचण्यासाठी किमान दोन तास तरी लागतात. त्यामुळे दोन तास झाल्यानंतर तुम्ही आंघोळ करु शकता.
थंड पाण्याची आंघोळ टाळा.
रात्री झोपताना तुम्हाला कितीही थंड पाण्याने आंघोळ करण्याचा मोह झाला तरी तुम्ही तसे करु नका. थंड पाण्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला असा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ केली तर तुम्हाला आराम तर मिळेलच. शिवाय तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. त्यामुळे तुम्ही थंड पाण्याची आंघोळ टाळा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.