ADVERTISEMENT
home / मनोरंजन
होम मिनिस्टर नवे पर्व

होम मिनिस्टरमध्ये लिटिल चॅम्प्स मिळवून देणार पैठणीचा मान

तमाम लाखो वहिनींचा आवडता असा शो म्हणजे ‘होम मिनिस्टर’ गेली कित्येक वर्ष हा शो महिलांच्या मनात राज्य करुन आहे. या शो मध्ये मिळणारा पैठणीचा मान हा सगळ्यांनाच हवाहवासा असतो. गेली कित्येक वर्ष सुरु असणारा हा रिअॅलिटी शो यामध्ये वेगवेगळे पर्व आलेेले आहेत. आता आणखी एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या पर्वात लिटिल चॅम्पस ठरवणार आहेत की कोणाला पैठणीचा मान मिळणार आहे. या नव्या पर्वाच्या जाहिरातीला सुरुवात झाली असून याचा नवा भाग फारच रंजक असणार आहे.

लिटिल चॅम्प्स ठरवणार पैठणीचा मान

सध्या झी मराठीवर सारेगमप लिटिल चॅम्प्स ही स्पर्धा सुरु आहे. पण याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. म्हणजे ते लिटिल चॅम्प्स कोणताही निर्णय देणार नाही. तर ज्या घरात होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगणार आहे. त्याच घरातील लहानमुलं याचा निकाल देणार आहेत. घरातील मुलं आईंसाठी खेळ खेळणार आहे. ते खेळता खेळता खूप गंमत जंमतसुद्धा होणार आहे. त्यामुळे घरातील लहानग्यांसाठी म्हणजेच या लिटिल चॅम्प्ससाठी मस्त खेळ असणार आहेत. ज्यामुळे खूपच मजा येणार आहे. लहानमुलांसोबत गप्पा मारतानाही तितकीच मजा येणार आहे.

ओम जिंकला चँलेज,पण मालिकेमध्ये या कारणामुळे आला ट्विस्ट

सारेगमप लिटिल चॅम्प्स

या स्पर्धेतील बालकलाकारांनी अनेकांची मने जिंकून घेतली आहे. त्यामुळे हे पर्व देखील खूप उत्साहात पार पडत आहे. त्याला अनुसरुन होम मिनिस्टरचे हे नवे पर्व सुरु करण्यात आलेले आहे. होम मिनिस्टरच्या या नव्या पर्वालाही पसंती मिळेल यात काहीही शंका नाही. त्यामुळे जर तुम्हाला हा शो आवडत असेल तर त्याचे हे नवे सीझन पाहायला विसरु नका.

ADVERTISEMENT

केआरकेवर लागला विनयभंगाचा आरोप, मॉडेलने केली तक्रार

लॉकडाऊनमध्ये केले रिलॅक्स 

गेल्या वर्षभरात मालिका त्यांचे शूटिंग सगळे काही बंद होते. परवानगी मिळाल्यानंतर वेगवेगळ्या शकला लावून मालिका सुरु झाल्या होम मिनिस्टरदेखील मोबाईलवरुन म्हणजे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुरु होते. त्यामुळे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन त्या काळातही केले. घरबसल्या होम मिनिस्टरचा हा खेळ रंगला होता. त्याचाही आनंद खूप जणांनी घेतला. आता पुन्हा एकदा घरी जाऊन हा शो सुरु झालेला आहे. जर तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही सहभागी होऊ शकता.

 झी मराठीवर येणार नवी मालिका

झी मराठीवरील काही मालिका निरोप घेणार असून नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ‘ती परत आलीये’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका गूढ आणि भूतावर आधारीत असणार आहे. या मालिकेचे काही प्रोमो सुरु झाले असून ही मालिका लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे आता मनोरजंनाची आणखी खुमासदार फोडणी देण्यासाठी आणखी एक मालिका येणार आहे. तर ज्या मालिका अर्धवट बंद झाल्या होत्या. या मालिका कधी प्रदर्शित होतील याचीही अनेकांना प्रतिक्षा आहे. 

आत होम मिनिस्टरचा हा भाग बघायचा असेल तर आजपासूनच सुरुवात करा.

ADVERTISEMENT
28 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT