ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
Eyes Problem Solution In Marathi

डोळे जळजळ उपाय, करा सोप्या पद्धतीने (Dolyana Khaj Yene Upay)

डोळ्यांमध्ये खाज (dolyat khaj yene) आणि जळजळ याचं मुख्य कारण म्हणजे अलर्जी अथवा इन्फेक्शन असतं. याशिवाय कोरडे डोळे, कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर, डोळ्यांची काळजी नीट न घेणं, एक्सपायर्ड झालेल्या कॉस्मेटिकचा वापर, डोळ्यांना होणारा धुळीचा त्रास या सगळ्यादेखील डोळ्यांमध्ये खाज, पापणी फडफडणे आणि जळजळ होण्याच्या समस्या आहेत. पण डोळ्यांना आराम देण्यासाठी तुम्हाला सतत डॉक्टर्सच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. तर तुम्ही घरच्या घरीदेखील यावर उपाय करू शकता. आम्ही तुम्हाला काही सोपे डोळे जळजळणे उपाय (dolyanchi jaljal upay) सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या समस्या दूर करू शकता.

डोळ्यांखाली येणाऱ्या खाजेसाठी जाणून घ्या घरगुती उपाय (Dolyat Khaj Yene Upay)

डोळ्यांखाली खाज येत असेल तर आपण अनेक उपाय करत असतो. त्यासाठी डॉक्टरांकडेही जातो. पण तुम्ही आता घरच्या घरी यावर उपाय करू शकता. नक्की हे उपाय काय आहेत ते जाणून घ्या.

1. आयवॉश

dolyana khaj yene

डोळ्यांमध्ये खाज (dolyana khaj yene) आणि जळजळीमुळे जर तुम्ही डोळे चोळले असतील तर तुम्हाला यामुळे अलर्जी होऊ शकते. त्यासाठी तुम्ही डोळे चोळण्याऐवजी पहिल्यांदा यावर बर्फाच्या थंड पाण्याने धुत राहा. तुमच्या डोळ्यांचं इन्फेक्शन निघून जाईपर्यंत तुम्ही असं करा आणि डोळ्यातील कसकस कमी होतेय का पाहा. यानंतरही तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टर्सचा सल्ला घ्या. पण असं केल्याने सहसा तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो. डोळ्यांची जळजळ होणे उपाय तसं तर सोपे आहेत. 

2. कोल्ड कंप्रेस

डोळ्यात जळजळ होत असेल तर सर्वात पहिले तुम्ही कोल्ड कंप्रेसचा वापर करा. यामुळे अलर्जीबरोबरच डोळ्यांचा कोरडेपणा आणि खाजेपासून आराम मिळतो. यासाठी साफ धुतलेला कपडा बर्फाच्या पाण्यात बुडवा आणि काढून त्यातील पाणी पिळून घ्या मग ते डोळ्यावर ठेवा. साधारण 5 मिनिट्नंतर हे हटवा आणि दुसऱ्यांदा थंड पाण्यात कपडा बुडवून तसंच करका. कोल्ड कंप्रेस तुम्ही साधारण 3- 4 वेळा पुन्हा करा. यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.

ADVERTISEMENT

3. काकडी

Benefits of Cucumber For Eyes In Marathi

काकडी ही डोळ्यांसाठी अतिशय परिणामकारक असते. काकडीमध्ये अँटिऑक्सिडंट गुण असल्याने डोळ्यांमधली खाज, सूज आणि जळजळ या सगळ्या गोष्टींवर लवकर परिणाम करते. तसंच डोळ्यांचा पफीनेस आणि काळ्या वर्तुलांसाठीदेखील काकडी अप्रतिम ठरते. यासाठी काकडी धुऊन त्याचे पातळ स्लाईस करून घ्या आणि 15- 20 मिनिट्ससाठी फ्रिजमध्ये ठेवा. आता हे थंड झालेले काकडीचे स्लाईस डोळ्यांवर 10 मिनिट्ससाठी ठेवा. असं दिवसातून 4 ते 5 वेळा करा. तुम्ही काकडीऐवजी कच्च्या बटाट्याचाही वापर करू शकता.

वाचा – Home Remedies For Prickly Heat In Marathi

4. ग्रीन टी

Green Tea Benefits For Eyes In Marathi

ग्रीन टी चे अनेक फायदे आहेतच, पण डोळ्यांसाठीही ग्रीन टी अतिशय फायदेशीर आहे. खाज येणाऱ्या डोळ्यांना यामुळे थंडावा मिळतो आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणांमुळे सूज उतरते. याशिवाय खाज निर्माण करणारे व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन यांच्याबरोबर लढा देऊन डोळ्यांना आराम मिळवून देते. यासाठी एक कप पाणी उकळून घ्या आणि त्यात दोन ग्री टी बॅग घाला 5 मिनिट्स तसंच ठेवा. आता ग्रीन टी बॅग काढून हे पाणी थंड होऊ द्या. हे सॉल्युशन तुम्ही दिवसातून दोन वेळा डोळ्यांना लावा आणि डोळे तोपर्यंत धुवा जोपर्यंत तुमच्या डोळ्यांची खाज आणि जळजळ कमी होत नाही. तसंच हे पाणी फ्रिजमध्ये ठेऊन तुम्ही कोल्ड कंप्रेस करूनही वापरू शकता. डोळ्यांची जळजळ होणे उपाय करत असाल तर हा सोपा आणि अगदी सहज जमणारा उपाय आहे.

5. थंड दूध (Cold Milk)

Benefits of Cold Milk  For Itchy Eyes In Marathi

डोळ्यांना थंडावा देण्यासाठी थंड दुधाचा चांगला वापर करता येतो. डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी आणि खाज दूर करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. तसंच थकलेल्या डोळ्यांनाही यामुळे आराम मिळतो. यासाठी तुम्ही थंड दुधात कापसाचा गोळा भिजवा आणि तुमच्या डोळ्यांवर हलक्या हाताने हा गोळा फिरवा. दिवसातून असं दोन वेळा करा. तुम्ही दुधाचा वापर कोल्ड कंप्रेसप्रमाणेही करू शकता. याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येतो. डोळ्यांची जळजळ होणे उपाय करत असताना सर्वात पहिले हा सोपा उपाय करून पाहा. 

ADVERTISEMENT

वाचा – शरीरातील उष्णता कमी करण्याचे उपाय

6. गुलाबपाणी (Rose Water)

Rose Water For Itchy Eyes In Marathi

डोळ्यांच्या खाजेसाठी गुलाबपाणी अतिशय परिणामकारक असतं. तुमच्या थकलेल्या आणि पफीनेस आलेल्या डोळ्यांसाठी हे अतिशय चांगलं परिणाम देतं. यासाठी दिवसातून कमीत कमी दोन वेळा तुमचे डोळे गुलाबपाण्याने धुवा. तुम्हाला त्वरीत आराम मिळण्यासाठी कोल्ड कंप्रेस अथवा आयड्रॉप स्वरूपात दिवसातून दोन वेळा गुलाबपाण्याचा वापर करा.

7. कोरफड

कोरफडमध्ये सूदिंग आणि मॉईश्चराइजिंग गुण असतात. कोरफड तुमचे सौंदर्य वाढविण्यास मदत करते. तसंच डोळ्यांची खाज (dolyana khaj yene) आणि जळजळ थांबवण्यासाठी अतिशय परिणामकारक आहे. तसंच डोळ्यांचा पफीनेस आणि सूज कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. यासाठी कोरफडची ताजी पान घ्या आणि त्यातील जेल डोळ्यांच्या बाहेर लावा. हे साधारण 10 ते 15 मिनिट्स तसंच ठेवा. नंतर थंड पाण्याने धुवा. असं दोन दिवस दिवसातून दोन वेळा करा.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक टिप्स (Tips For Eye Health In Marathi)

  •  डोळे कधीही चोळू नका
  •  डोळ्यांमध्ये खाज येत असेल तर कॉन्टॅक्ट  लेन्स लावू नका
  •  एक्सपायर्ड  आयड्रॉप्सचा वापर करू नका
  •  कॉन्टॅक्ट लेन्स अथवा आय मेकअप कधी कोणाही बरोबर शेअर करू नका
  •  डोळयांचं आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या डाएटमध्ये गाजर आणि पालकाचा वापर करा
  •  उन्हात जाताना गॉगलचा वापर करा
  •  कॉम्प्युटरवर काम करत असाल तर काही वेळासाठी आपल्या डोळ्यांना आराम द्या
  •  डोळ्यांवर हवा जोरात येऊ देऊ नका

हेदेखील वाचा

ADVERTISEMENT

डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी फॉलो करा या ‘10 टीप्स’

आयलायनरच्या 20 वेगळ्या स्टाईल्स, बदलेल तुमचा लुक

06 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT