ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
home-remedies-for-dry-and-dull-hair-during-summer-ajicha-batwa-in-marathi

घामामुळे केस होत आहेत निस्तेज, वापरा आजीच्या बटव्यातील उपाय

उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे केसांमध्ये येणाऱ्या घामाचा. केसांसंबंधित त्रासही या ऋतूमध्ये वाढलेले दिसून येते. घामामुळे केस निस्तेज, कोरडे आणि अत्यंत रखरखीत होतात. त्यामुळे सर्वात जास्त काळजी उन्हाळ्यात त्वचेसह केसांची घ्यावी लागते. केसांची काळजी घेणे म्हणजे महागडे उत्पादन त्यावर वापरणे असं होत नाही. तर तुम्हाला असे उपाय करायला हवेत, जे तुमच्या केसांना नेहमी सुरक्षा देऊ शकतील. केसांचे तुटणे आणि केस गळणे यासारख्या समस्यांपासून तुम्हाला वाचायचे असेल तर तुम्हाला घरगुती उपाय करायला हवे. पण असे घरगुती उपाय, जे आजीच्या बटव्यातील असतील. आजीचे उपाय हे नेहमीच फायदेशीर ठरतात. तुम्ही तुमच्या केसांसाठी नैसर्गिक घटकांचा वापर करून अधिक केस चांगले ठेऊ शकता. तसंच तुम्हाला हेअर केअर रूटिनदेखील (Hair Care Routine) नियमित फॉलो करायला हवे. यामुळे केस अधिक निरोगी राहतात. पण म्हणजे नक्की काय उपाय करायचे ते आता आपण पाहूया. 

हेअर मास्कचा करा वापर (Use Hair Mask)

तुमचे केस निस्तेज झाले असतील तर तुम्ही हेअर मास्कचा वापर करायला हवा. बाजारात मिळणाऱ्या हेअर मास्कमध्ये केमिकल्सचा वापर करण्यात येतो. त्यामुळे याचा उपयगो न करता तुम्ही आजीच्या बटव्यातील नैसर्गिक घटकांनी घरगुती हेअर मास्क बनवा आणि त्याचा तुमच्या निस्तेज आणि कोरड्या केसांसाठी उपयोग करून घ्या. नारळाचे तेल आणि मधापासून तयार करण्यात आलेला हा हेअर मास्क तुमच्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. नारळाचे तेल (Coconut Oil) तुमच्या केसांना मॉईस्चराईज करते, ज्यामुळे तुमचे केस अधिक मुलायम आणि मऊ होतात आणि मध (Honey) तुमच्या केसांना अधिक चांगले हायड्रेट करते. 

साहित्य 

  • नारळाचे तेल
  • मध 

बनविण्याची पद्धत

ADVERTISEMENT
  • एका बाऊलमध्ये तेल आणि मध समसमान प्रमाणात घ्या. तुमच्या केसांची उंची पाहून तुम्ही हे साहित्य घ्या
  • हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि संपूर्ण केसांना लावा 
  • त्यानंतर साधारण अर्धा तास तसंच ठेवा आणि मग नॉन सल्फेट शँपूने धुवा
  • आठवड्यातून दोन वेळा तरी तुम्ही या हेअरमास्कचा उपयोग करा 

तेल लावा (Use Oil For Hair)

कोरड्या आणि निस्तेज केसांपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही केसांना तेल लावायला हवे. तेलांमुळे केसांना चांगले पोषण मिळते. नेहमी तुम्ही केस धुण्याच्या एक रात्र आधी केसांना तेल लावा. यामुळे कोरड्या आणि निस्तेज केसांना नवी चमक मिळते. तसंच तेल केसांना मजबूत बनवते आणि केसांशी संबंधित समस्या सोडविण्यास मदत करते. याशिवाय तेलाच्या उपयोगामुळे केस चमकदार होतात. त्यामुळे तेल लावायला विसरू नका. आठवड्यातून दोन वेळा तरी केसांना योग्य मालिश द्या. 

कोरफडचा करा वापर (Use Aloe Vera For Healthy Hair)

धावपळीच्या आयुष्यात केसांची पूर्ण काळजी घेण्याचा वेळ मिळत नाही. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात केस घामाने भिजून खराब होतात. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस तरी तुमच्या केसांना डीप कंडिशनिंग (Deep Conditioning) मिळायला हवं. अर्थात नियमित शँपूच्या ऐवजी तुम्ही हर्बल वा घरी तयार करण्यात आलेल्या शँपूचा वापर करा. कंडिशनरच्या ऐवजी तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता. कोरफड हे केसांसाठी वरदान आहे. कोरफडमध्ये अनेक नैसर्गिक गुण आहेत, जे केसांसाठी फायदेशीर ठरतात. कोरफडमधील एंजाइम्स केसांना हानी पोहचवणाऱ्या सेल्सपासून वाचवते आणि केसांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. 

या गोष्टींची घ्या काळजी 

  • आपल्या केसांवर हिट टूल्सचा (Hit Tools) अतिवापर करू नका. यामुळे केस खराब होतात. शक्यतो याचा वापर करणे टाळा
  • जर तुमच्या केसांमध्ये अधिक घाम येत असेल तर तुम्ही आठवड्यातून किमान 3 वेळा केस धुवा 
  • केसांना UV किरणांपासून वाचविण्यासाठी नेहमी स्कार्फचा वापर करावा

केसांची काळजी घेण्यासाठी आजीच्या बटव्यातील हे सोपे उपाय तुम्हीही वापरून पाहा आणि आपल्या केसांना योग्य चमक द्या. 

23 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT