ADVERTISEMENT
home / निरोगी जीवन
लहान मुल बोलताना अडखळत असेल तर तोतरेपणावर करा हे उपाय

लहान मुल बोलताना अडखळत असेल तर तोतरेपणावर करा हे उपाय

तोतरेपणामुळे अडखळत बोलणाऱ्या मुलांना बोलण्याचा संकोच वाटतो. कारण इतर मुलं अशा मुलांना चिडवतात आणि ज्यामुळे पुढे अशा मुलांची धीटपणे बोलण्याची क्षमता खुंटते. तोतरेपणा हा एक स्पीच डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये मुलं अखडळत अथवा थांबत थांबत बोलतात. यामागे अनुवंशिकता, मेंदूचे आजार, मेंदूला मार लागणे, भावनिक धक्का अशा अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. मात्र योग्य वैद्यकीय उपचारांसोबत यावर काही घरगुती उपचार केले तर लहान मुलं या समस्येतून नक्कीच वाचू शकतात.

तोतरेपणावर करा हे घरगुती उपाय –

लहान मुलांचा तोतरेपणा कमी करण्यासाठी वैद्यकीय उपचार जसं की स्पीच थेरपीसोबत काही घरगुती उपचारही फायद्याचे ठरू शकतात.

आवळा –

आवळा खाण्यामुळे मुलांचा तोतरेपणा खूप प्रमाणात कमी होऊ शकतो. कारण आवळ्यामध्ये  मेंदूच्या कार्याला उत्तेजित करणारे गुणधर्म असतात. सहाजिकच आवळा खाण्यामुळे तुमच्या मुलांच्या मेंदूचा योग्य विकास होतो. तोतरेपणा ही तुमच्या मज्जासंस्थेशी निगडीत एक समस्या आहे. मेंदूचा योग्य विकास झाला की ही समस्या आपोआप कमी होऊ लागते. यासाठी मुलांना दररोज ताजे अथवा सुकवलेले आवळे खाण्यास द्या. आवळ्याचा रस नियमित घेतल्यामुळेही चांगला फायदा होऊ शकतो. 

गाईचे साजूक तूप –

आधीच सांगितल्याप्रमाणे तोतरेपणाची समस्या मुलांच्या मज्जासंस्थेच्या अपूर्ण विकासामुळे तयार झालेली एक समस्या आहे. गाईचे शुद्ध तूप मुलांच्या आहारात असेल तर त्यांचा  मेंदूचा विकास झपाट्याने होतो. कारण गाईच्या तूपात ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असते. जे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर ठरते. यासाठीच मुलांना नियमित एक चमचा शुद्ध तूप तोंडावाटे घेण्याची सवय लावा. मुलांना तूपाचा वास आवडत नसेल तर त्यांच्या आहारात तुपाचा समावेश करा.

ADVERTISEMENT

ब्राम्ही चू्र्ण –

मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी, अभ्यास लक्षात राहण्यासाठी, आकलन शक्ती वाढण्यासाठी ब्राम्ही वरदान ठरू शकते. बऱ्याचदा स्मरणशक्ती वाढण्यासाठी मुलांना नियमित ब्राम्हीचे सिरप अथवा चूर्ण दिले जाते. पण एवढंच नाही ब्राम्हीमुळे तुमच्या मुलांचा तोतरेपणाही कमी होऊ शकतो. कारण ब्राम्हीमध्ये अॅंटि ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे मुलांच्या मेंदूचा योग्य विकास होण्यास चालना मिळते. तुम्ही मुलांना  ब्राम्हीचे  सिरप अथतवा चूर्ण मध, पाणी अथवा दूधातून देऊ शकता. 

भिजवलेले बदाम –

बदाम खाण्यामुळे मुलांची स्मरणशक्ती चांगली राहते हे तर तुम्ही नक्कीच ऐकले असेल. पण यामुळे बुद्धी आणि मज्जासंस्थेचा योग्य विकास होतो ज्याचा परिणाम तुमच्या  मुलांच्या बोलण्यावरही दिसून येतो. मुलं जर अडखळत बोलत असतील तर त्यांना नियमित भिजवलेले बदाम खाण्यास द्या. यासाठी दररोज रात्री चार ते पाच बदाम पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी वाटून मुलांना ते दुधात मिसळून पिण्यास द्या. 

काळीमिरी –

काळीमिरी आपण स्वयंपाकासाठी वापरतोच पण काही प्रमाणात ती तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण काळीमिरीमध्ये पिपेरिन नावाचा घटक असतो. जो मेंदूच्या कार्याला उत्तेजित करतो. जर तुमच्या मुलांची बोलताना जीभ जड होत असेल तर रात्री झोपताना मुलांना चिमूटभर काळीमिरीचे चाटण द्या. काळीमिरी पावडर मधातून तुम्ही मुलांना देऊ शकता. मात्र लक्षात ठेवा चुकूनही मुलांना अती प्रमाणात काळीमिरी देऊ नका. कारण काळीमिरी उष्ण असल्यामुळे त्याचे विपरित परिणाम शरीरावर होऊ शकतात.

फोटोसौजन्य –

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

का कीडतात लहान मुलांचे दुधाचे दात, करा हे उपाय

लहान मुलांना चांदीच्या भांड्यातून जेवण भरवण्याचे फायदे

लहान मुलांना हेल्दी खाण्याची सवय कशी लावाल

ADVERTISEMENT
27 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT