ADVERTISEMENT
home / आरोग्य
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी बनवा आवळ्याचे माऊथ फ्रेशनर

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी बनवा आवळ्याचे माऊथ फ्रेशनर

तोंडाला घाणेरडा वास येणं ही एक खूप मोठी आरोग्य समस्या आहे. कारण यामुळे तुमच्या तोंडाचे आरोग्य बिघडतंच शिवाय चारचौघांमध्ये बोलण्याचा संकोचदेखील वाटतो. अनेक उपाय करूनही तुम्हाला या समस्येवर योग्य परिणाम जाणवला नसेल. तर आधी जाणून घ्या तोंडाला दुर्गंधी येण्याची कारणे, लक्षणे आणि काही घरगुती उपाय...तोंडाला येणारा घाणेरडा वास कमी करण्याचा सोपा घरगुती उपाय म्हणजे घरच्या घरी आवळ्याचा मुखवास तयार करणे. जाणून घ्या सोपी पद्धत

तोंडाला घाणेरडा वास का येतो

तोंडात अस्वच्छता असेल अथवा एखादी आरोग्य समस्या असेल तर तुमच्या तोंडाला घाणेरडा वास येण्याची शक्यता असते. कारण अशा वेळी तोंडात जीभ, दात, हिरड्यांवर जीवजंतू पोसले जातात. ज्यामुळे तोंडातील अस्वच्छतेमुळे हा घाणेरडा वास येतो. जर तुम्ही अति प्रमाणात धुम्रपान अथवा मद्यपान करत असाल तरी तुमच्या तोंडाला घाणेरडा वास येतो. यासाठीच वेळच्या वेळी चूळ भरणे, दोन वेळ दात स्वच्छ घासणे आणि आरोग्याबाबत सावध असणं गरजेचं आहे. तोंडाचा घाणेरडा वास कमी करण्याचा सोपा उपाय म्हणजे घरी तयार केलेले मुखवास खाणे. कारण कधी कधी कांदा, चिकन सारखा उग्र वासाचा पदार्थ खाल्यावरही तुमच्या तोंडाला घाणेरडा वास येण्याची शक्यता असते.

असा करा आवळ्याचा मुखवास

आवळ्याचा मुखवास करणं अतिशय सोपं असून हा मुखवास खाण्यामुळे तुमच्या तोंडाला येणारा घाणेरडा वास कमी होतोच. शिवाय आवळ्यातील पोषक घटकांमुळे तुमचे आरोग्यही सुधारते

साहित्य –

ADVERTISEMENT
  • अर्धा किलो आवळे
  • अर्धा किलो पिठी साखर
  • जिरा पावडर
  • आमचूर पावडर
  • काळीमिरी पावडर
  • सैंधव

आवळा मुखवास बनवण्याची कृती –

आवळे स्वच्छ धुवून घ्या आणि एका मोठया भांड्यात उकडत ठेवा.

उकडून थंड झाले की आवळ्याच्या पाकळ्या वेगळ्या होतात या फोडींना पिठी साखर लावा.

आवळ्याच्या भांड्याला वरून मलमलच्या कापडाने झाकून दिवसभर तसेच ठेवा

ADVERTISEMENT

आवळ्याला सुटलेलं पाणी काढून टाका आणि पुन्हा तसेच झाकून ठेवा ,साधारणपणे दोन ते तीन वेळा असे करा.

तीन ते चार दिवसांमध्ये आवळ्यातील पाणी निघून ते कोरडे होतील. मग त्यावर चवीनुसार सैंधव, काळीमिरी, जीरे पावडर आणि आमचूर पावडर लावा. 

आवळ्याच्या फोडी सुकल्यावर त्या हवाबंद डब्यात भरून ठेवा आणि मुखवासासाठी वापर करा. 

यासोबतच घरीच बनवा या चटपटीत आवळा रेसिपीज (Amla Recipes In Marathi)

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

14 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT