ADVERTISEMENT
home / Ayurveda
कडूलिंबापासून तयार करा हे घरगुती फेस पॅक (Homemade Neem Face Packs)

कडूलिंबापासून तयार करा हे घरगुती फेस पॅक (Homemade Neem Face Packs)

कडूलिंब ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. कडूलिंबाचा वापर अगदी  प्राचीन काळापासून सौंदर्य खुलवण्यासाठी करण्यात येतो. औषधासाठी, त्वचेच्या समस्यांवर उपाय करण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी, इनफेक्शन दूर करण्यासाठी कडूलिंबाचा वापर केला जातो. कारण त्वचेला उजळ करण्यासाठी, पिंपल्स आणि पुरळ कमी करण्यासाठी, चेहऱ्यावरील डाग आणि व्रण कमी करण्यासाठी अशा अनेक त्वचा समस्यांवर कडूलिंब गुणकारी आहे. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत कडूलिंबापासून तयार केलेले काही घरगुती फेसपॅक शेअर करत आहोत. ज्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.

कडूलिंबाची पेस्ट आणि हळद (Neem Leaves And Turmeric Powder)

कडूलिंब आणि हळदीमध्ये नैसर्गिक अॅंटिसेप्टिक गुणधर्म असतात. ज्यामुळे हा फेस पॅक तुमच्या त्वचेचं इनफेक्शनपासून रक्षण करतं.

साहित्य –
उकडलेली कडूलिंबाची पाने, अर्धा चमचा हळद पावडर, एक चमचा नारळाचे तेल

ADVERTISEMENT

कसा कराल वापर –
कडूलिंबाची उकडलेली पाने वाटून त्याची पेस्ट तराय करा ही एक चमा पेस्ट, अर्धा चमचा हळद आणि नारळाचे तेल एकत्र करून त्याची जाडसर पेस्ट तयार करा. तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. पंधरा मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका

काय फायदा होतो –
कडूलिंब आणि हळदीच्या अॅंटि बॅक्टेरिअल आणि अॅंटि फंगल गुणधर्मांमुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होते. शिवाय यात नारळाच्या तेलाचा वापर केल्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायमदेखील होते. 

कडूलिंबाची पेस्ट आणि हळद

Shutterstock

ADVERTISEMENT

कडूलिंब पावडर आणि मुलतानी माती (Neem Powder and Multani Mitti)

कडूलिंब आणि मुलतानी मातीचा फेस पॅक हा एक सर्वोत्तम फेस मास्क असू शकतो. 

साहित्य –
एक चमचा कडूलिंबाची पावडर, एक चमचा मुलतानी माती आणि चार चमचे दूध

कसा कराल वापर –
एका भांड्यात एक चमचा कडूलिंबाची पावडर आणि एक चमचा मुलतानी माती घ्या. मिश्रण एकजीव करून घ्या आणि त्यात गरजेनुसार दूध मिक्स करा. या  मिश्रणाची जाडसर पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर हा मास्क लावा आणि वीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.

ADVERTISEMENT

काय फायदा होतो –
कडूलिंबाच्या पानांमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स शिवाय मुलतानी मातीमुळे तुमच्या चेहऱ्यावरील धुळ, माती, प्रदूषण कमी होण्यास मदत होते. म्हणूनच या दोन घटकांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा कमी होण्यास मदत होते. शिवाय दुधाच्या वापरामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम दिसू लागते. 

चंदन फेसपॅक आणि त्याचे त्वचेसाठी विविध फायदे

कडूलिंबाची पेस्ट आणि काकडीचा गर (Neem And Cucumber)

जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स अथवा व्रण असतील तर ते दूर करण्यासाठी हा फेस पॅक तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे.

ADVERTISEMENT

साहित्य –
अर्धी किसलेली काकडी, एक चमचा कडूलिंबाची पेस्ट आणि एक चमचा आर्गन ऑईल

कसा कराल वापर –
एका भांड्यात किसलेली काकडी, कडुलिंबाची पेस्ट आणि आर्नग ऑईल एकत्र करा. मिश्रण चांगले मिक्स करा. बोटांच्या मदतीने हा फेस पॅक चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. 

काय फायदा होतो –
काकडीमध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात. कडूलिंब आणि आर्गन ऑईलमुळे तुमच्या चेहऱ्यावरील मुरमं आणि पुरळ कमी होण्यास मदत होते आणि त्याचा दाह कमी करण्यासाठी काकडीचा फायदा होतो. 

वाचा – मसूर डाळीपासून बनवा हे होममेड फेसपॅक

ADVERTISEMENT

कडूलिंबाची पेस्ट

Shutterstock

कडूलिंब, चंदन पावडर आणि मध (Neem Powder, Sandalwood and Honey)

कडूलिंब, चंदन आणि मधामुळे तुमची त्वचा नितळ आणि फ्रेश दिसू लागते. या कडुनिंबाचा फेस पॅक आपल्या त्वचेवर फोड व डाग कमी करतो आणि त्वचेला एक प्रकारचा शीतलता प्रदान करतो.

ADVERTISEMENT

साहित्य –
एक चमचा कडूलिंबाची पावडर, एक चमचा चंदन पावडर आणि एक चमचा मध 

कसा कराल वापर –
सर्व मिश्रण एका भांड्यात एकत्र करा. मिश्रण एकत्र करून त्याची छान पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर एकसमान लावा. अर्धा तासाने चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. 

काय फायदा होतो –
कडूलिंबामुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होते. चंदन पावडरमध्ये त्वचेचा दाह कमी करणारे गुणधर्म असतात. तर मधामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते. या फेस पॅक मुळे तुमच्या त्वचेवरील व्रण, डाग कमी होतात आणि त्वचेला एकप्रकारचा थंडावा मिळतो. 

ADVERTISEMENT

कडूलिंब, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस (Neem Powder, Rosewater and Lemon)

कडूलिंब आणि लिंबाचा रस या दोन्ही घटकांमुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होते. 

साहित्य –
एक चमचा कडूलिंबाची पावडर, दोन ते चार लिंबाचा रस आणि गुलाबपाणी

कसा कराल वापर –
कडूलिंबाची पावडर, लिंबाचा रस आणि गुलाबपाणी एकत्र करा. या मिश्रणाचा फेस पॅक करून चेहऱ्यावर लावा. थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

काय फायदा होतो –
कडूलिंब आणि लिंबामुळे त्वचा स्वच्छ होते शिवाय गुलाबपाण्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. ज्यामुळे त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी न होता त्वचा मुलायम आणि तजेलदार दिसू लागते. 

ADVERTISEMENT

कडुूलिंब आणि पपईचा गर (Neem Powder And Papaya)

कडूलिंबाची पाने आणि पपईमध्ये त्वचा नितळ आणि चमकदार करणारे गुणधर्म असतात.

साहित्य –
सात ते आठ कडूलिंबाची पाने, अर्धा कप पपईचा गर

कसा कराल वापर –
कडूलिंबाच्या पानांची वाटून पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये पपईचा गर मिक्स करा. दोन्ही घटक एकत्र करून त्याचा चांगला फेसमास्क तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून पंधरा मिनीटांनी तो थंड पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करा.

ADVERTISEMENT

काय फायदा होतो –
पपईमुळे तुमच्या चेहऱ्यावरील जुनाट व्रण, सुरकुत्या, पिंपल्स कमी होण्यास मदत होते. हा फेस पॅक लावल्यामुळे तुमची त्वचा नितळ आणि फ्रेश दिसू लागते.

कडूलिंबाची पावडर, दही आणि बेसन (Neem Powder, Curd, And Gram Flour)

कडूलिंब, दही आणि बेसनाचा फेस पॅक तुम्ही चेहऱ्याप्रमाणेच तुमच्या संपूर्ण शरीरावर एखाद्या बॉडीमास्कप्रमाणे लावू शकता. 

साहित्य –
एक चमचा कडूलिंबाची पावडर, एक चमचा बेसन, एक चमचा दही 

कसा कराल वापर –
सर्व मिक्षण एका भांड्यात व्यवस्थित मिक्स करून घ्या. चेहऱ्यावर, मानेवर आणि हात,पायांना या मास्कचा एकसमान थर लावा. सुकल्यावर मास्क धुवून टाका. 

ADVERTISEMENT

काय फायदा होतो –
बेसनामुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्कीन निघून जाते. शिवाय यामुळे त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतात. कडूलिंबामुळे या मोकळ्या झालेल्या रोमछिद्रांमध्ये इनफेक्शनचा धोका कमी होतो आणि दह्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि तुकतुकीत होते. 

कडुलिंबाचा फेसमास्क

Shutterstock

कडूलिंब, ओट्स, दूध आणि मध (Neem Powder, Oatmeal, Milk and Honey)

ओट्स खाण्यासाठी जितके फायदेशीर आहेत तितकेच ते तुमच्या त्वचेसाठी उत्तम आहेत. शिवाय कडूलिंबासोबत ओटसचा असा वापर केल्यामुळे तुमचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.

ADVERTISEMENT

साहित्य –
अर्धा ओट्स, एक चमचा दूध, एक चमचा मध आणि दोन चमचे कडूलिंबाची पेस्ट

कसा कराल वापर –
दूध आणि ओटस् एकत्र करा. त्यात मध आणि कडूलिंबाची पेस्ट टाकून मिश्रण एकत्र करा. हा मास्क चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर एखाद्या स्क्रबप्रमाणे तो हळूवारपणे काढून टाका. थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. 

काय फायदा होतो –
ओट्समध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स भरपूर असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचे चांगले पोषण होते. याशिवाय या फेस पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाण्यास मदत होते. दुध आणि मधाच्या पोषणामुळे तुमची त्वचा सॉफ्ट होते. थोडक्यात हा फेस पॅक  लावल्यामुळे तुमच्या त्वचेचं सर्वांगाने पोषण होऊ शकतं. 

कडूलिंबाच्या फेसमास्कमुळे होईव त्वचा सुंदर

ADVERTISEMENT

Shutterstock

कडूलिंब पावडर, गुलाबपाणी आणि चंदन पावडर (Neem powder, Rosewater, And Sandalwood)

कडूलिंब, चंदन आणि गुलाबपाण्यामुळे तुमच्या त्वचेचं सौंदर्य खुलून येतं. 

साहित्य –
कडूलिंबाची पाने, एक चमचा चंदन पावडर, गुलाबपाणी

कसा कराल वापर –
कडूलिंबाची पाने सुरवून त्याची पावडर करा. ही पावडर वस्त्रगाळ करून त्यात गुलाबपाणी आणि चंदनपावडर मिसळा. चंदन पावडर उपलब्ध नसल्यास उगाळलेले चंदन तुम्ही यासाठी घेऊ शकता. या मिश्रणाचा एक फेसपॅक तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. अर्धा  तासाने फेसमास्क सुकल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.

ADVERTISEMENT

काय फायदा होतो –
गुलाबपाणी आणि चंदनपावडरमध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. चेहऱ्यावरील धुळ, माती, प्रदूषण कडूलिंबाच्या पानांमधील रसामुळे दूर होते. शिवाय या फेस पॅक मुळे चेहऱ्याला थंडावा मिळाल्याने तुम्हाला फ्रेश वाटू लागते.

कडूलिंब आल्याचा रस आणि नारळाचे तेल (Neem Powder, Garlic, And Coconut Oil)

आल्याच्या रस आणि कडूलिंबाचा रस हे मिश्रण त्वचेचं इनफेक्शन कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतं.

साहित्य –
सात ते आठ कडूलिंबाची पाने, एक चमचा आल्याचा रस, एक चमचा नारळाचे तेल

कसा कराल वापर –
कडूलिंबाची पाने उकडून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये नारळाचे तेल टाका आणि मिश्रण चांगले एकजीव करा. आल्याचा रस टाकून हा मास्क फक्त त्वचेवर इनफेक्शन झालेल्या भागावर चेहऱ्यावर लावा. 

ADVERTISEMENT

काय फायदा होतो –
बऱ्याचदा  त्वचेवरील इनफेक्शन दूर करण्यासाठी तुम्ही महागडी औषधे लावता. मात्र घरातील काही सोप्या गोष्टींचा वापर करून तु्म्ही त्वचेचं इनफेक्शन दूर करू शकता. यासाठी हा फेस पॅक तुमच्या पिंपल्स, पुरळवर अथवा जुनाट व्रणांवर लावा. हळूहळू हे डाग आणि त्वचा समस्या कमी होण्यास मदत होईल. 

कडुलिंबाचा फेसमास्क लावलेली महिला

Shutterstock

कडूलिंबाबत मनात असलेले काही निवडक प्रश्न – FAQs

1. कडूलिंबाची पावडर कशी तयार करावी ?
कडूलिंबाची पाने वाळवून तुम्ही त्याची पावडर तयार करू शकता. मात्र घरी केलेली पावडर वस्त्रगाळ करण्यास मुळीच विसरू नका. नाहीतर त्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. 

ADVERTISEMENT

2. कडूलिंबाचे काही दुष्परिणाम होतात का ?
कोणत्याही गोष्टीचा अती वापर हा हानिकारकच असतो. त्याचप्रमाणे कडूलिंब थंड असल्यामुळे ते उन्हाळ्यात फायदेशीर ठरतं मात्र थंडीत त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. 

3. कडूलिंबामुळे तुमची त्वचा नितळ होते का ?
कडूलिंबामध्ये अॅंटिबॅक्टेरिअल आणि अॅंटिफंगल गुणधर्म असल्यामुळे याच्या वापरामुळे त्वचेला इनफेक्शन होत नाही. शिवाय यामुळे तुमच्या त्वचेखाली रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे त्वचेला उजळपणा येतो.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

ADVERTISEMENT

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा –

सौंदर्य खुलविण्यासाठी फॉलो करा ’20’ आयुर्वेदिक ब्युटी टीप्स

कडूलिंबाचे फायदे आणि औषधीय गुण ऐकून तुम्हीही व्हाल चकीत! (Benefits Of Neem In Marathi)

ADVERTISEMENT

मानेजवळील त्वचा काळवंडली आहे का, मग करा हे घरगुती उपाय

Benefit of Neem for Hair in Hindi

16 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT