मेष: आज तुम्हाला फ्रेश वाटेल
आज पूर्ण दिवस तुम्हाला फ्रेश वाटेल. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.विरोधकांना मात देण्यास तुम्ही यशस्वी व्हाल.व्यवसाय विस्ताराची शक्यता आहे. सामाजिक संस्थेद्वारे सन्मान होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील.
कुंभ: राजकारणाची आवड वाढण्याचे योग
खेळाडू आज सामना जिंकतील. विद्यार्थी अभ्यासासोबत काही सामाजिक कार्यातही सहभागी होईल. जर तुमच्याकडे कोणती चांगली युक्ती असेल तर ती नक्की सांगा, त्यामुळे नक्कीच फायदा होईल. राजकारणाची आवड वाढण्याचे योग आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
मीन: भांडणापासून दूर राहा
आज कामाच्या ठिकाणी झालेली एक चुकी तुमचे नुकसान करु शकते. भांडणापासून दूर राहा. व्यवसायात काही अडचणी येण्याची शक्यता आहे. निर्णय विचारपूर्वक घ्या. मनात नको त्या शंकांना थारा देऊ नका. कोणत्यातरी शुभवार्तेमुळे तुमच्यातील उत्साह वाढेल.जोडीदाराची भावना समजून घ्या.
वृषभ : रागावर ठेवा नियंत्रण
आज तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा, त्यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. मन आणि आरोग्य दोघांवर त्याचा परिणाम होईल. व्यावसायिक यात्रेचे योग आहेत. आर्थिक बाबतीन विचारपूर्वक निर्णय घ्या. सामाजिक कामात धावपळ होईल. नव्या संपर्कामुळे फसवणूक होण्याची शक्यता आहे.
धनु: आरोग्यात होईल बिघाड
आज तुमचे आरोग्य बिघडेल. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. व्यावसायिक स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात.कौटुंबिक खर्च वाढू शकतात. देण्याघेण्याचे व्यवहार करताना सावध राहा. अडकलेली कामे पूर्ण होतील. कोर्ट कचेरी प्रकरणात यश मिळेल.
कर्क: दिलेला पैसा परत मिळेल
कला आणि सिनेसृष्टीशी निगडीत असलेल्या व्यक्तींना आज फायदा होणार आहे.कोणाला दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल.नोकरीत पगार वाढण्याची शक्यता.संततीकडून सुखदवार्ता मिळू शकते. प्रवासाचे योग आहेत. सामाजिक सन्मान आणि संपत्तीत वाढ होईल.
सिंह: जोडीदारासोबत रोमँटीक राहाल
प्रियजनांच्या मदतीने तुमच्या नात्यातील समतोल राखला जाईल आणि प्रेम वाढेल. जोडीदारासोबत रोमँटीक वातावरण एन्जॉय कराल. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सहकर्मचाऱ्यांच्या मदतीने अडकलेली कामे पूर्ण होतील. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. राजकारणात जबाबदारी वाढू शकते. फिरायला जाण्याचा योग आहे.
कन्या : मेहनत जास्त करावी लागेल
आज कामाच्या ठिकाणी काही बदल होण्याची शक्यता आहे. मेहनत जास्त करावी लागेल पण आर्थिक फायदा कमी होईल. मन चिंतीत राहील. व्यापारात चढ- उतार राहील. कोर्टकचेरीचे प्रश्न सुटतील. अभ्यासासाठी घरापासून दूर जावे लागण्याची शक्यता आहे. नातेवाईकांच्या मदतीने कठीण कामे पूर्ण होतील.
तूळ: व्यवसाय विस्ताराची शक्यता
आईकडून धनप्राप्ती होण्याचे योग आहेत. मुलांकडून काही शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्तारासाठी विदेश यात्रा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नति होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. बिघडलेली कामे पूर्ण होतील.
वृश्चिक: कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल
परीक्षेची तयारी करताना अजिबात हयगय करु नका. तुमच्या याच गोष्टीमुळे तुम्ही चांगली संधी गमावू शकता. अधिकाऱ्यांकडून कामासंबंधी आश्वासन मिळतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळाल्यामुळे तुम्ही व्यग्र राहाल.भांडणापासून दूर राहा. आरोग्य चांगले राहील.
धनु : मन दु:खी राहील
जोडीदाराचे आरोग्याच्या तक्रारीमुळे मन अशांत राहील.मन निराश आणि दु:खी राहील. धार्मिक कामांमध्ये रुचि वाढेल. कुटुंंबातील खर्च वाढू शकतात. मित्रांच्या सहकार्यामुळे अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. रचनात्मक कार्यात यश मिळेल.
मकर: जोडीदारासोबतचे संबंध निकट होतील
तुमच्या मनमिळाऊ स्वभावामुळे जोडीदारासोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील. जोडीदारासोबतचे रुसवे- फुगवे दूर होतील. भावनिक दृष्टया तुम्हाला अधिक चांगले वाटेल. व्यवसायात वृद्धि होईल. नव्या ओळखीचा आर्थिक फायदा होईल. नोकरीत पदोन्नति होईल. रचनात्मक कामात रुचि वाढेल.
हे ही वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना येतो पटकन राग
आळशी आहेत या राशीचे लोक, तुम्ही नाहीत ना त्यातले
राशीनुसार जाणून घ्या, काय आहे तुमचा भाग्यशाली क्रमांक