मेष – मित्रांकडून महागडी भेटवस्तू मिळेल
आज तुमच्या एखादा मित्र महागडी भेटवस्तू खरेदी करेल. चल अचल संपत्ती खरेदीचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराशी नाते मजबूत असेल. प्रवासाला जाण्याचा योग आहे.
कुंभ – विवाहाचा योग नक्कीच आहे
प्रेमिकांचे विवाह जुळण्याचा योग आहे. घरात कुटुंबासोबत वेळ घालवाल. ज्या गोष्टी कठीण वाटत होत्या त्या लवकर आणि सहज पूर्ण होतील. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे.
मीन- विद्यार्थ्याना मेहनत घेण्याची गरज
आज विद्यार्थ्यांना मेहनत घेण्याची गरज आहे. आळसाचा त्याग करा. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा खराब होऊ शकते. घरात उत्सवाचे वातावरण असेल. वाहन चालवताना सावध राहा.
वृषभ – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. कामाच्या ठिकाणी दुर्लक्षपणामुळे नुकसान होऊ शकते. वादविवाद करणे टाळा. एखाद्या बातमीमुळे मन निराश होईल. अध्यात्म आणि योगामध्ये रस वाढवा.
मिथुन – वृद्ध लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या
आज घरातील वयस्कर लोकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मन निराश होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. अध्यात्मामध्ये रस वाढणार आहे.
कर्क – प्रेमाचा प्रस्ताव मिळणार आहे
आज तुम्हाला फोनवरून प्रेमाचा प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. अनोळखी लोकांपासून दूर राहा. पदोन्नतीत अडचणी येण्याची शक्यता आहे. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका.
सिंह – ऑनलाईन परिक्षा द्यावी लागेल
आज तुम्हाला ऑनलाईन परिक्षा द्यावी लागणार आहे. रचनात्मक कार्यासाठी उत्तम वेळ आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.घरातील वातावरण आनंदाचे असेल.
कन्या – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
आज आयात निर्यातीच्या व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकते. आर्थिक बाबतीत जोखिम घेऊ नका. वादविवाद करणे टाळलेलेच बरे राहील. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. मुलांसोबत वेळ मजेत जाईल.
तूळ – आरोग्य उत्तम असेल
आज दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल. आरोग्य चांगले असणार आहे. पैशांबाबत असलेल्या अडचणी दूर होतील. आत्मविश्वास वाढणार आहे. घरातील कामे करावी लागणार आहेत. मुलांची कर्तव्ये पूर्ण कराल.
वृश्चिक – मित्रांमुळे दुःखी होण्याची शक्यता आहे
आज तुम्हाला तुमच्या मित्रांच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. व्यवसायातील स्थिती चांगली असेल. कामाच्या ठिकाणी कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. वाहन चालवताना सावध राहा.
धनु – आर्थिक स्थितीत सुधारणा
आज तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. नवीन रोजगाराची संधी मिळेल. सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहा. घरातील सजावटीत वेळ घालवा. प्रियकराशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधाल.
मकर – पाठ अथवा कंबरेचे दुखणे जाणवणार आहे
आज तुम्हाला पाठ अथवा कंबरेच्या दुखण्याचा त्रास होणार आहे. व्यवसायात यश मिळेल. घरात मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना साहित्यात रस वाढणार आहे.
हे ही वाचा –
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा
अधिक वाचा –
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’