मेष – जोडीदारावर विनाकारण संशय घेऊ नका
जोडीदारावर विनाकारण संशय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. अनोळखी व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवू नका. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. देणी घेणी करताना सावध राहा.
कुंभ – – कर्ज घेणे टाळा
आज तुम्हाला धनसंपत्तीबाबत समस्या येण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे सध्या टाळा. राजकारणात कामे मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. वाहन चालवताना सावध राहा.
मीन- आरोग्यात सुधारणा होईल
आज तुमच्यासाठी दिवस चांगला असेल. तब्येतीत सुधारणा होईल. दिवसभर फ्रेश वाटेल. रचनात्मक कार्यात मन रमेल. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत प्रवासाला जाण्याचा योग आहे.
वृषभ – कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळणार आहे. व्यवसायात वाढ होईल. प्रेमसंबध चांगले होतील. जोडीदारासाठी काळ सुखाचा असेल. रचनात्मक कार्यात प्रसिद्धी मिळणार आहे.
मिथुन – मन अशांत राहील
आज तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. मन निराशा आणि असमाधान जाणवेल. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. घरातील खर्च वाढणार आहे. मित्रांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील.
कर्क – घरात वाद घालणे टाळा
आज एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत वाद घालणे टाळा. नोकरी अथवा व्यवसायात व्यस्त राहणार आहात. आरोग्याची काळजी घ्या. रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रवासाला जाण्याचा योग आहे.
सिंह – विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये
आज विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा कंटाळा करणे टाळा. अधिकाऱ्यांकडून कामाबाबत आश्वासन मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या वाढल्यामुळे व्यस्त राहाल. वादविवादापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या – धनप्राप्तीचा योग आहे
आईकडून धनसंपत्ती मिळण्याचा योग आहे. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. व्यावसायिक विस्तारासाठी परदेशी जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल.
तूळ – कामाचा आळस करू नका
काम करण्याचा आळस करू नका. विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी कठीण आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. मित्रांकडून आनंदवार्ता मिळेल. देणी घेणी सांभाळून करा.
वृश्चिक – अंगदुखी जाणवणार आहे
आज लठ्ठपणामुळे तुम्हाला अंगदुखी जाणवणार आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. व्यावसायिक योजनांना यश मिळेल. सध्या प्रवासाला जाणे टाळा.
धनु – आजचा दिवस कुटुंबासोबत घालवाल
आजचा दिवस घरातील लोकांसोबत चांगला जाईल. एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. जोडीदारासोबत एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. मित्रांकडून जाणवणारा विरोध कमी होईल.
मकर – मोठी कामे मिळण्याची शक्यता
मोठी कामे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी परदेशी जाण्याचा योग आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. रचनात्मक कामात प्रगती होईल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल.
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा –
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
राशीनुसार जाणून घ्या, कशी मिळेल मनाला शांती
जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’