मेष : भेटवस्तू मिळतील
बाळाकडून भेटवस्तू आणि विशेष सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील तेजीमुळे आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. सामाजिक आदरात वाढ होईल. आत्मविश्वासात वाढ होईल.
कुंभ : मनातील ईच्छा पूर्ण होईल
मनातील ईच्छा पूर्ण होईल. तुम्हाला ज्यांना भेटण्याची ईच्छा आहे ते स्वतःहून तुमच्याकडे येतील. विवाहाचे प्रस्ताव मिळतील. प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल. व्यावसायिक भागीदारी लाभदायक ठरेल.
मीन : पदोन्नतीमध्ये अडचणी
पदोन्नतीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. करिअरमध्येही धावपळ असेल. आज एखाद्या जुन्या वादात किंवा खटल्यात व्यस्त राहाल. व्यावसायिक यात्रेदरम्यान वादापासून दूर राहा. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.
वृषभ : उच्च शिक्षणातील वाद टाळा
उच्च शिक्षणातील वादांपासून दूर राहा. व्यवसायात एखाद्या मित्राकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांपासून सतर्क रहा. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य मिळेल. वाहनाच्या देखभालीकडे लक्ष द्या.
(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)
मिथुन : आजारपणामुळे त्रस्त
आजारपणामुळे तुम्ही त्रस्त होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात आवड निर्माण होण्याची शक्यता. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. राजकारणात अधिक आवड निर्माण होईल. नात्यात मधुरता येईल.
कर्क : नवीन मित्र बनतील
नवीन मित्रमैत्रिणी आयुष्यात येतील. प्रभावशाली लोकांचा संपर्क वाढेल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची शक्यता. रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवहारांच्या प्रकरणांमध्ये वादा परिस्थिती निर्माण होऊ शकते. उत्पन्न-खर्चामध्ये समतोल राखा.
सिंह : नव्या कामांची योजना होईल यशस्वी
विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांमध्ये यश मिळेल. नवीन कामांची योजना आखली जाईल, ज्या यशस्वी देखील होतील. हरवलेला विश्वास पुन्हा प्राप्त होईल. नवीन प्रेमाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.
कन्या : गुंतवणुकीची योजना टाळा
सध्या गुंतवणुकीची योजना आखणं टाळा. एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची भीती असेल. नवीन संपर्क स्थापित करताना सावधगिरी बाळगा. रचनात्मक कार्यांमध्ये मन रमेल. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.
(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)
तूळ : आरोग्य सुधारण्याची शक्यता
आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत परदेश यात्रा होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक सन्मान आणि धनसंपदेत वाढ होईल. धार्मिक आस्था वाढेल. व्यावसायिक करार मिळू शकतात.
वृश्चिक : मित्राच्या फोनमुळे अस्वस्थ
आज अचानक एखाद्या मित्राच्या फोनमुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. आईवडिलांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराला वेळ द्या. व्यावसायिक योजना यशस्वी होतील सध्या प्रवास करणं टाळा.
धनु : अॅलर्जी होऊ शकते
सर्दी, खोकला किंवा अॅलर्जी होण्याची शक्यता आहे. उघड्यावरील अन्नपदार्थ खाणं टाळा. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. व्यवहारांत विश्वासघात होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासानं घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’
मकर : पैसे मिळण्याची शक्यता
नव्या योजनेसाठी गुंतवणूकदार मिळू शकतो. रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा आणि धनसंपदेत वाढ होण्याची शक्यता आहे. नव्या व्यावसायिक योजना फायदेशीर ठरतील.