मेष -आईच्या आरोग्यात सुधारणा होईल
आज तुमच्या आईच्या आरोग्यात सुधारणा होईल. आज दिवसभर परोपकार करण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वास वाढणार आहे. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. मुलांच्या सहकार्याने तुमची बिघडलेली कामे सुधारतील.
कुंभ – व्यवसायात हळू हळू प्रगती होणार आहे
आज तुमच्या व्यवसायात हळू हळू प्रगती होणार आहे. राजकारणातील स्थिती मजबूत असेल. जोडीदारासोबत वेळ आनंदात जाईल. घराबाहेरील कोणतेही खाद्यपदार्थ खाऊ नका. अध्यात्म आणि योगामधील रस वाढणार आहे.
मीन- छोट्या चुकीमुळे मोठे नुकसान
आज कामाच्या ठिकाणी तुमच्या एका छोट्या चुकीचा फार मोठा परिणाम भोगावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. विनाकारण चिंता करत बसू नका. एखादी आनंदाची बातमी तुमच्या मनाला उत्साहित करेल. जोडीदाराच्या भावनांचा विचार करा.
वृषभ – प्रेमसंबध बिघडण्याची शक्यता आहे
आज तुमच्या प्रेम संबंधांमध्ये दूरावा येऊ शकतो. मित्रांचे वागणे त्रासदायक असेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा तणाव वाढू शकतो. मुलांसोबत वेळ संगीत साधनेत घालवा. घरातून बाहेर पडू नका.
मिथुन – व्यवसायात नफा होण्याची शक्यता
आज तुमच्या व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होईल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. इतरांच्या मदतीने आनंद मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल.
कर्क – घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
आज तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडू शकते. आहाराची काळजी घ्या. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय बदलावे लागतील. देणी घेणी सांभाळून करा.
सिंह – जोडीदारासोबत रोमॅंटिक व्हाल
आज तुमच्या घरातील लोकांमधील प्रेम वाढणार आहे. जोडीदारासोबत रोमॅंटिक व्हाल. व्यवसायात अथवा नोकरीतील कामे सहकाऱ्यामुळे पूर्ण होतील. जोखिम घेणे टाळलेलेच बरे राहील.
कन्या – मेहनत अधिक लाभ कमी मिळेल
आज कामाच्या ठिकाणी काही बदल होण्याची शक्यता आहे. मेहनत जास्त आणि आर्थिक लाभ कमी राहील. मन निराश होण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीतून सुटका मिळण्याची शक्यता आहे. घरातील लोकांच्या मदतीने कठीण कामे करणे शक्य होईल.
तूळ – नवीन कामे मिळण्याची शक्यता
आज व्यवसायात नवीन कामांमुळे वाढ होईल. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या पद्धतीमुळे तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत वेळ आनंदात जाईल.
वृश्चिक – विद्यार्थ्यांना अधिक मेहनतीची गरज
आज विद्यार्थ्यांनी अभ्यास जास्त करण्याची गरज आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना छोट्या गोष्टींवरून वाद घालू नये, कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. घरातील सजावटीवर लक्ष द्या.
धनु – गुडघे अथवा पायाचे दुखणे वाढेल
आज तुम्हाला गुडघे अथवा पायदुखी जाणवणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. लगेच नफा मिळवण्यासाठी काही गोष्टींबाबत तडजोड करावी लागेल. धार्मिक कार्यात मन रमेल. वाहन चालवताना सावध राहा.
मकर – जोडीदारासोबत वेळ मजेत जाईल
आज एखाद्या व्यक्तीबाबत तुम्हाला आकर्षण वाटणार आहे. जोडीदारासोबत वेळ आनंदात जाईल. तुमच्या कामात तुम्ही स्वतःची एक रचनात्मक छाप सोडणार आहात. विरोधकांचा त्रास कमी होईल. राजकारणातील प्रतिष्ठा वाढणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.
हे ही वाचा –
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’