मेष – कामे रद्द होण्याची शक्यता
आज तुमची व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता आहे. घरातून बाहेर पडू नका. लहान सहान समस्या येण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक काळजी घ्या. मुलं आणि घरातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ – कंबरदुखी जाणवू शकते
आज तुम्हाला कंबर दुखी जाणवण्याची शक्यता आहे. जास्तवेळ लॅपटॉपवर काम केल्यामुळे त्रास होऊ शकतो. लहान सहान समस्यांमुळे घाबरून जाऊ नका. मित्रांशी फोनवरून संपर्कात राहा.
मीन- नात्यात कटूपणा येईल
आज तुमच्या नात्यात कटूपणा येण्याची शक्यता आहे. जवळच्या लोकांमुळे करिअरमध्ये फायदा होईल. कोणाचेही बोलणे मनाला लावून घेऊ नका. आत्मविश्वासात वाढ होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
वृषभ – आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता
एखादे रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होणार आहे. कामातील नवीन कौशल्य शिकण्यासाठी योग्य काळ आहे. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे.
मिथुन – व्यवसायात स्थिरता येईल
संकटकाळामुळे व्यवसायात स्थिरता येण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. घरात आपापसातील संवाद वाढल्याने नाते मजबूत होण्याची शक्यता आहे.
कर्क – आरोग्य बिघडण्याची शक्यता
परदेशातून आलेल्या लोकांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. घरात ऑफिसचे काम करावे लागणार आहे. कौटुंबिक नाती मजबूत होणार आहेत.
सिंह – प्रेमाचे प्रपोजल येण्याची शक्यता
आज तुम्हाला एखादा प्रेम प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. अधिकाऱ्यांशी मिळून मिसळून वागल्यामुळे पदोन्नती होण्याची शक्यता आहे. जुन्या तक्रारी विसरून नव्याने सुरूवात कराल. रखडलेली कामे पूर्ण होण्यात यश मिळणार आहे.
कन्या – विद्यार्थ्यांना आनंदवार्ता मिळणार आहे
आज विद्यार्थ्यांना एखादी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. घराबाहेर मुळीच पडू नका. ऑनलाईन पद्धतीने घरातून ऑफिसची कामे करण्याची संधी मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.
तूळ – शेअर बाजारात मंदी येण्याची शक्यता आहे
आज शेअर बाजारात मंदी येण्याची शक्यता आहे. उत्पन्नापेक्षा खर्च वाढण्याची शक्यता आहे. विनाकारण खर्च करणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या. स्वच्छतेचे नियम पाळा. मुले आणि वयस्कर लोकांमुळे घरात आनंदाचे वातावरण असेल.
वृश्चिक – हेल्थ रिपोर्ट चांगला असेल
आज आजारपणामुळे काढलेला हेल्थ चांगला आल्याने घरात आनंदाचे वातावरण असेल. कौटुंबिक सदस्यांची चांगली साथ मिळेल. सर्वांच्या भावनांना समजून घेणे शक्य होईल. व्यवसायातील स्थिती स्थिर राहण्याची शक्यता आहे.
धनु – प्रेमामुळे नात्यात तणाव येण्याची शक्यता
आज तुमच्या नात्यात तणाव येण्याची शक्यता आहे. व्यवसायातील योजना पूर्ण करणे कठीण जाईल. आर्थिक जोखिम न घेणेच योग्य राहील. घरातील रखडलेली कामे वेळेत पूर्ण करण्याची योग्य संधी आहे.
मकर – डोळे अथवा डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता
आज तुम्हाला डोळे अथवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. मन अशांत राहील. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. भावंडांची चांगली साथ मिळेल. खर्चात वाढ होणार आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर राखा.
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला
अधिक वाचा –
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव