मेष : प्रेम संबंधांमध्ये कटुता येऊ शकते
प्रेम संबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते. मित्रांच्या वागणुकीमुळे तुम्ही दुःखी व्हाल. भागीदारी असणाऱ्या कामांपासून अंतर ठेवा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तणाव वाढू शकेल. सध्या प्रवास करणं टाळा.
कुंभ : करार रद्द होण्याची शक्यता
व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी किरकोळ समस्या उद्भवू शकतात. वादापासून दूर राहा. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य लाभेल.
मीन : तणाव दूर होईल
मानसिक तणावातून आराम मिळेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नवीन संपर्क तयार केले जातील. रचानात्मक कामांमध्ये मन गुंतेल. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. आर्थिक परिस्थिती ठीक राहील. प्रवासाचा योग आहे.
वृषभ : मानसिक तणावाचा त्रास
कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक तणावात असाल. आत्मविश्वास कमी होईल. कामाच्या ठिकाणी समस्या उद्भवू शकतात. पैशांसंबंधी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रियकर/प्रेयसीसोबतचे संबंध अधिक दृढ होतील.
मिथुन : पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता
कार्यालयाच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगार वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे प्रेम आणि सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाच्या निमित्तानं परदेश यात्रा होण्याची शक्यता आहे.
कर्क : नातेसंबंधांमध्ये जवळीकता वाढेल
तुमच्या मनमिळाऊ स्वभावामुळे नातेसंबंधात जवळीकता वाढेल. जोडीदारासोबत झालेले रुसवे-फुगवे दूर होतील. भावनिकदृष्ट्या आज चांगले वाटेल. व्यवसायात वाढ होईल आणि नवीन संबंधांमुळे आर्थिक लाभ होतील.
सिंह : कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा टाळा
कामाच्या ठिकाणी आज निष्काळजीपणा टाळा. अडचणी निर्माण होऊ शकतात. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात मन गुंतेल. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कन्या : धन प्राप्तीचा योग
आईकडून धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. अपत्याकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. व्यावसायिक विस्तारासाठी केलेला प्रवास यशस्वी होईल.आर्थिक परिस्थिती सुधारेल. आत्मविश्वास वाढेल. रखडलेली काम पूर्ण होतील.
तूळ : प्रतिस्पर्धी त्रास देऊ शकतात
करिअरसंबंधीचे निर्णय आज घेऊ नका. आत्मविश्वासाच्या अभावापायी निर्णय घेण्यास अडचणी येतील. प्रतिस्पर्धी कार्यालयाच्या ठिकाणी उघडपणे आव्हान देतील. व्यवहाराशी संबंधित बाबतीत सावधगिरी बाळगा. कायदेशीर प्रकरणातून दिलासा मिळेल.
वृश्चिक : मन दु: खी आणि अस्वस्थ होईल
मन उदास आणि अस्वस्थ असेल. स्वभाव चिडचिडा होईल. कार्यालयात काम करताना त्रास होईल. व्यवसायाच्या योजना पूर्ण होतील. व्यवहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.
धनु : खास व्यक्तीसोबत भेट होईल
जो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो, अशा व्यक्तीसोबत भेट होऊ शकतो. नवीन संबंध तयार होऊ शकतात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल.
मकर : रचनात्मक कार्यांमध्ये वाढ होईल
विद्यार्थ्यांच्या शिक्षणामधील अडथळा दूर होईल. रचनात्मक कामे वाढतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. व्यवहारांची प्रकरण मार्गी लागण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा :
कोणत्या राशीच्या लोकांना कोणता खडा घालणं शुभ आहे, जाणून घ्या
जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना येतो पटकन राग
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली