ADVERTISEMENT
home / भविष्य
27 नोव्हेंबर 2019चं राशीफळ,सिंह राशीला व्यावसायिक फायद्याची शक्यता

27 नोव्हेंबर 2019चं राशीफळ,सिंह राशीला व्यावसायिक फायद्याची शक्यता

मेष : औषधांवर अधिक खर्च
औषधांवर आज अधिक पैसा खर्च होऊ शकतो. व्यवसायात अधिक कष्ट आणि नफा कमी मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासात अधिक आवड निर्माण होऊ शकते.

कुंभ : एकटेपणा लवकरच दूर होईल
एकटेपणा लवकरच दूर होईल. अपत्यासंबंधी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. राजकीय लाभ मिळेल. रखडलेली कामं पूर्ण होतील. पगारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासह प्रवासाचा योग आहे.

मीन : नोकरीचा शोध पूर्ण होईल
नोकरीच्या शोधात तुम्हाला यश मिळेल. ठामपणे बोला, प्रत्येकाचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक आणि बौद्धिक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. आवडीचं काम मिळाल्यानं तुम्ही उत्साहित असाल. मित्रांसोबत भेट घडण्याची शक्यता आहे.

वृषभ : प्रकृती ठीक राहील
घरगुती उपचारांमुळे आरोग्य ठीक राहील. व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळेल. जुन्या मैत्रीचं नवीन नात्यात रुपांतर होऊ शकतं. रखडलेली कामे पूर्ण होतील.

ADVERTISEMENT

मिथुन : कुटुंबात कलह वाढण्याची शक्यता
मालमत्तेसंदर्भात कुटुंबात कलह वाढण्याची शक्यता आहे. कडू बोलण्यानं लोक रागावतील. उत्पन्न आणि खर्चामध्ये समतोल राहील. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे.

कर्क : हृदय रोगांबाबत सावध राहा
हृदयाशी संबंधित आजारांपासून सावध राहा. महत्त्वाची निर्णय घेणं टाळा. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. तुमच्या गोड वागण्याने सामाजिक आदर वाढेल.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)

सिंह : नवीन करार मिळतील
व्यवसायाच्या निमित्ताने केलेल्या धावपळीमुळे फायदा होईल. नवीन करार मिळतील. आर्थिक बाबतीत सुख-समृद्धीचे योग आहेत. कौटुंबिक मित्रांसह बाहेर जाण्याची योजना आखली जाऊ शकते. गुंतागुंतीचे प्रकरण मार्गी लागतील.

ADVERTISEMENT

कन्या : प्रेम संबंधात सुखद अनुभव येईल
पाहुण्यांची ये-जा आज वाढू शकते. प्रेमसंबंधात सुखद अनुभव येईल. बर्‍याच संघर्षानंतर अडचणींपासून दिलासा मिळेल. नवीन व्यावसायिक करार मिळतील. कार्यालयात केलेल्या मेहनतीमुळे पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

तूळ : व्यवसायात चढ-उतार येतील
व्यवसायात चढ-उताराची परिस्थिती असेल. सोपी दिसणारी कामे पूर्ण करण्यात त्रास होईल. प्रेमसंबंध चांगले राहतील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. व्यवहारात निष्काळजीपणा बाळगू नका.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स

वृश्चिक : अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता
अडकलेला पैसा पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. पार्टनरशिपमध्ये एखादं नवीन काम सुरू करू शकता. व्यवसायात आलेल्या समस्या दूर होण्याची शक्यता आहे. खर्च कमी करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

ADVERTISEMENT

धनु : करार रद्द होण्याची शक्यता
महत्त्वपूर्ण व्यावसायिक करार रद्द केले जाऊ शकतात. व्यवसायामध्ये मेहनत अधिक पण नफा कमी होईल. खर्च अधिक राहील. आत्मविश्वास कमी होईल. स्वत:वर नियंत्रण ठेवा. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

मकर : आजारानं होईल त्रास
आजारपणामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आपला दिनक्रम नियमित पाळा. मालमत्ता खरेदी करण्यात अडचणी निर्माण होतील. धार्मिक कार्यात रस वाढेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढेल. प्रेयसी/प्रियकरासोबत झालेली भेट सुखद ठरेल.

(वाचा : जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’)

 

ADVERTISEMENT
23 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT