मेष -अविवाहित व्यक्तींसाठी योग्य काळ
अविवाहित व्यक्तींंसाठी लग्नाचा हा योग्य काळ आहे. तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट घरच्यांसमोर सांगू शकाल. प्रभावशाली व्यक्तींची भेट होण्याची शक्यता. व्यवसायात वृद्धी होईल. अचानक बाहेरगावी जाण्याचा बेत आखला जाईल.
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
कुंभ – दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता
कला आणि सिनेसृष्टीशी संबंधित व्यक्तींना आज फायदा होईल. दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा आणि कार्यालयात वृद्धी होण्याची संधी आहे. मुलांसंबंधी चांगल्या बातम्या आज मिळण्याची शक्यता आहे.
मीन – आरोग्यात होईल बिघाड
वरीष्ठ व्यक्तींच्या आरोग्यामध्ये थंडीमुळे बिघाड होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत सावधानता बाळगा. व्यावसायिक स्थिती मनासारखी राहील. कार्यालयात त्रास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक खर्च वाढू शकतात. व्यवहार करताना सावधानतापूर्वक करा.
राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती
वृषभ – अभ्यासात त्रास होण्याची शक्यता
अभ्यासात सतत काहीतरी त्रास होण्याची शक्यता आहे. योग्य लक्ष्य गाठण्यासाठी मेहनत करावी लागेल. कार्यालयात इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नका. विरोधकांपासून सावध राहा. मुलांसह जास्त वेळ घालवा.
मिथुन – धनप्राप्ती अथवा भेटवस्तू मिळेल
कौटुंबिक अथवा पारंपरिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील तुमचा प्रवास हा फायदेशीर राहील. नवे संबंध प्रस्थापित होतील. सासरकडून संपत्ती अथवा भेटवस्तू मिळेल. जोडीदारासह परदेशी जाण्याचा योग आहे.
कर्क – कार्यालयात निष्काळजीपणा करू नका
आज कार्यालयात निष्काळजीपणा करण्यापासून दूर राहा. अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. तरूण वर्गाला करिअरमध्ये चांगली गती मिळणार आहे. चालू माणसांपासून दूर राहा. मुलाबाळांकडून चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनप्राप्ती होईल.
सिंह – थंडीमुळे आजारी पडण्याची शक्यता
थंडीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आजारी होऊ शकतो. त्यामुळे तुमची दिनचर्या नियमित ठेवा. व्यवसायात तुम्हाला अचानक लाभ होऊ शकतो. तडजोडीासाठी तयार राहा. धार्मिक कार्यांमध्ये मन रमेल. वाहनांची नीट काळजी घ्या.
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली
कन्या – प्रेमसंबंधात होईल सुधारणा
घरी पाहुण्यांची ये जा वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये तुमची सुधारणा होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. व्यापारामध्ये नव्या ओळखी होतील. राजकारणात यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
तूळ -नोकरीचा शोध होईल पूर्ण
नोकरीचा शोध घेत असाल तर आज पूर्ण होईल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यामध्ये तुम्हाला यशप्राप्ती मिळेल. तुमच्या आवडीच्या कामामुळे तुम्ही उत्साहित राहाल. व्यवसायाचा विस्तार होऊ शकेल. मित्रांची भेट सुखकारक राहील.
वृश्चिक – आज कोणालाही उधार देऊ नका
आज कोणालाही उधार देऊ नका, पैसे परत मिळण्याची शक्यता नाही. नव्या व्यावसायिक योजनांसाठी तुम्हाला असलेला पैसा खर्च करावा लागेल. मेहनत अधिक आणि कमी लाभ मिळेल. व्यवहारात धोका मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
धनु – तजेलदार वाटेल
आज पूर्ण दिवस तुम्हाला तजेलदार वाटेल. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती तुमची मजबूत राहील. विरोधकांना तुम्ही मात द्याल. सामाजिक संस्थेद्वारे तुमचा सन्मान होण्याची शक्यता आहे.
मकर – प्रेमसंबंधांमध्ये दुरावा येण्याची शक्यता
प्रेमसंबंधामध्ये दुरावा येऊ शकतो. दुसऱ्यांचं ऐकून आपल्या आयुष्यात कोणताही निर्णय घेणं तुम्हाला महागात पडू शकतं. कार्यालयात तुम्हाला अधिकाऱ्यांमुळे तणावग्रस्त वाटेल. आर्थिक स्थिती सुधारेल.