मेष :प्रेमाचा शोध सुरु राहील
तुमच्या खऱ्या प्रेमाचा शोध सुरु राहील. मित्रांचे मनमौजी वागणे तुम्हाला त्रासदायक ठरेल. कोणी तरी व्यक्ती तुमच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. राजकारणात जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीपासून सुटका मिळेल.
कुंभ: आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
तुमचा विश्वास जिंकून तुमच्याकडून कोणीतरी पैसे काढून घेऊ शकते.तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावधान. मुलांकडून आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील.
मीन: आरोग्य चांगले राहील
घरगुती उपायांनी तुमचे आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांसाठी चांगला कालावधी आहे. अडकलेली काम पूर्ण करण्यास यशस्वी व्हाल. आज तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत चांगला वेळ घालवाल. घरात शुभ कार्याची शक्यता आहे.
वृषभ: पैसे परत मिळण्याची शक्यता
व्यवसाय आणि रचनात्मक काम करण्याऱ्या लोकांना आज फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला लवकरच परत मिळतील. घरासाठी काही नवीन वस्तूंची खरेदी कराल. मित्रांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन : आरोग्यामध्ये बिघाड संभवतो
घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे तुम्ही चिंतातूर व्हाल. अर्धवट कामांना जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. देण्याघेण्याच्या व्यवहारातील अडथळे दूर होतील. व्यवसायात राजकाराणातून फायदा संभवतो.
कर्क : प्रेमाची जाणीव होऊ शकते
आज तुम्हाला कोणाच्या तरी प्रेमाच जाणीव होऊ शकते. सामाजिक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल. कुटुंबात ज्येष्ठांनी दिलेला सल्ला फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. प्रवासाचे योग आहेत.
#Lucky2020: या राशीच्या लोकांनी कधीही करु नये संसार होतील हे त्रास
सिंह: नोकरीत दमछाक होण्याची शक्यता
तुमच्या मनाप्रमाणे नोकरी मिळण्यासाठी तुम्हाला थोडी धावपळ करावी लागेल. मेहनत करुनही यश न मिळाल्यामुळे तुमचे मन उदास राहील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे बर्डन राहील. आर्थिक स्थिती चांगली असेल. देण्याघेण्याचे व्यवहार मिटण्याची शक्यता आहे.
कन्या : महागडी भेटवस्तू किंवा पैसे मिळण्याची शक्यता
सासरच्या मंडळींकडून तुम्हाला आज महागडी वस्तू किंवा पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रवासासाठी अनुकूल असा काळ आहे. नव्या योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. सोयी-सुविधांवर अधिक खर्च होईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नति होईल.
#Lucky2020: कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी असणार अप्रतिम वर्ष
तुळ: विद्यार्थ्यांना मेहनत करण्याची गरज
विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. एखाद्या क्षुल्लक कारणावरुन वरिष्ठांशी बाचाबाची होण्याची शक्यता आहे. जोखिम उचलण्यासाठी तयार राहा. विरोधक तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील सावध राहा
वृश्चिक : दुखापतीमुळे हैराण राहाल
गुडघे दुखीच्या त्रासामुळे तुम्ही हैराण व्हाल. आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक चर्चेमध्ये तुम्हाला यश मिळेल. वादविवादापासून दूर राहा. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल.
धनु : जोडीदाराचे सहकार्य लाभेल
आपआपसातील हेवेदावे विसरुन कामाला लागा, यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. कोणते तरी काम पूर्ण झाल्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल आर्थिकवृद्धी होईल. वादापासून दूर राहा. प्रिय व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे.
मकर : साहित्य आणि संगीत क्षेत्रात आवड वाढेल
साहित्य आणि संगीत क्षेत्रात विद्यार्थी वर्गाची रुचि वाढेल. रचनात्मक कामाशी निगडीत लोकांना विशेष पुरस्कार किंवा सन्मान मिळेल. जोडीदाराच्या माध्यमातून धनलाभ होण्याची शक्यता आहे.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
https://www.popxo.com/shop/zodiac-collection/