#Lucky2020: या राशीच्या लोकांनी कधीही करु नये संसार होतील हे त्रास

#Lucky2020: या राशीच्या लोकांनी कधीही करु नये संसार होतील हे त्रास

दोन भिन्न स्वभावाच्या आणि भिन्न प्रवृत्तीच्या लोकांचे कधी कधी खूप छान पटते. पण कधी कधी अनेक गोष्टी सारख्या असूनही काहींचे वाद होतात असे का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर तुमच्या राशींवर या गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही या गोष्टी मानत नसाल तर एकदा वाचाच कारण तुम्हाला या गोष्टी नक्कीच पटतील.कारण प्रत्येकासाठी अनुकूल आणि प्रतिकूल अशा राशी असतात. त्यावरच तुमचे नाते अवलंबून असते. जाणून घेऊया आज कोणत्या राशीच्या लोकांनी कधीही करु नये संसार… आणि त्यांना काय होऊ शकतो त्रास

#Lucky2020: कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी असणार अप्रतिम वर्ष

मेष आणि वृषभ

मेष आणि वृषभ राशीच्या लोकांचे फारसे पटत नाही. या दोन्ही राशी थोड्याफार प्रमाणात हट्टी असतात. या दोघांमध्ये भांडण झाली तर चूक दोघांपैकी कोणीही मान्य करायला तयार होत नाही. त्यामुळे यांच्यामध्ये झालेला वाद टिकून राहतो आणि तो सतत धुमसत राहतो.  त्यामुळे तुम्ही मेष राशीचे असाल तर वृषभच्या भानगडीत पडू नका 

shutterstock

वृषभ आणि धनु

मेष राशीसोबतचे वृषभेचे वागणे वेगळे असलेत तरी धनु राशीच्या व्यक्तीला वेगळ्या गोष्टींमुळे वृषभ राशीचा कंटाळा येऊ शकतो. वृषभेच्या व्यक्तीला घरी राहणे जास्त आवडते. तर धनु राशीच्या व्यक्ती या कायम एक्सायटेड असतात त्यांना घराबाहेर पडून मस्त फिरायचे असते. त्यांना नवीनवीन प्लॅन आखायचे असतात. त्यामुळे वृषभेला धनुचा आणि धनुला वृषभेचा त्रास होऊ लागतो. 

कर्क आणि मकर

कर्क राशीचे लोक कधीच ऑरगनाईज नसतात त्यांना सगळ्या गोष्टी आयत्यावेळी करायला आवडतात. त्यांना कशाचीही चिंता नसते. तर मकर राशीच्या लोकांना मात्र सगळ्या गोष्टींचे प्लॅनिंग करायला आवडते. त्यांना सगळ्या गोष्टी वेळेवर शिवाय ऑरगनाईज हव्या असतात. या राशीच्या लोकांचे पटू शकते. पण कधीतरी त्यांच्या या स्वभावावरुन एखाद्याचा भडका उडणे स्वाभाविक आहे.

#Lucky2020 : नवीन वर्षात ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार 'गुडन्यूज'

shutterstock

मिथुन आणि कुंभ

मिथुन राशीच्या व्यक्ती या फारच संसारी असतात त्यांना सगळ्या गोष्टींचा शेवट हा हॅपी फॅमिली आणि कपलमध्ये हवा असतो. तर कुंभ राशीचे लोक फ्री बर्ड असतात.त्यांना रिलेशनशीपमध्ये गुंतायला अजिबात आवडत नाही. त्यांना मुक्त संचार करायला आवडतो. जर मिथुन राशीच्या व्यक्ती कुंभ राशीच्या प्रेमात असतील तर तुम्हाला उगीचच या व्यक्ती नात्यात गंभीर नाही असे वाटतील.

वृश्चिक आणि मेष

दोन्ही राशी या स्वभावाने फारच हट्टी आहेत. त्यांच्यात एकदा भांडण झाली की माघार कोणी घ्यायचा असा प्रश्न असतो. या राशी काहीही झाल्या तरी मागे यायला तयार नसतात त्यामुळे या राशी चांगला वेळ घालवून बसतात. ज्याचा त्यांना पश्चाताप होऊनही उपयोग नाही.

मिथुन आणि कर्क

मिथुन राशींच्या व्यक्तींना सगळ्या गोष्टीमध्ये आनंद घ्यायला आवडतो. थोडक्यात या पार्टी लव्हर असतात तर मिथुन राशीची व्यक्ती ही फारच संसारी असते त्यामुळेच या दोघांचे फारसे पटत नाही

मीन आणि कन्या

मीन राशीचे लोक फारच स्वप्नाळू असतात तर कन्या राशीचे लोक फारच प्रॅक्टिकल असतात. या भिन्न स्वभावामुळे या लोकांचे एकमेकांशी पटत नाही.

shutterstock

मेष आणि मीन

मेष आणि मीन राशी या फारच वेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती आहेत. मेष राशीच्या व्यक्तींना एक घाव दोन तुकडे करायची सवय असते. तर मीन राशीच्या लोकांसाठी सगळ्या गोष्टींमध्ये फारच रापायची सवय असते . त्यामुळे मीन राशीशी त्यांचे पटत नाही. 

तुळ आणि कन्या

तुळ  राशीच्या व्यक्ती फार बॅलन्स साधणाऱ्या असतात. तर  कन्या राशीची व्यक्ती फारच हट्टी असते. कन्या राशीच्या व्यक्तीला नात्यात सगळ्या गोष्टी अगदी योग्य हव्या असतात तर तुळ राशीला त्यांना समजावण्यात फार रस वाटत नाही. त्यामुळे या दोघांच्या नात्यात तणाव कायम राहतो 


तुम्हीही या राशींच्या प्रेमात असाल तर आताच तुमच्या जोडीदाराचा स्वभाव जाणून घ्या. नात्यात नंतर तणाव येण्यापेक्षा तो आधीच स्वभाव माहीत असलेला बरा...

 #POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

 Link to bold part with: https://www.popxo.com/shop/zodiac-collection/