मेष – करिअरमध्ये यश मिळेल
आज तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या साथीमुळे करिअरमध्ये यश मिळेल. अधिकाऱ्यांची मर्जी राखल्यामुळे प्रमोशन मिळणे शक्य होईल. प्रवास सुखद असेल. जोडीदारासोबत सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. रखडलेलील कामे वेळेत पूर्ण करा.
कुंभ – पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे
आज तुमच्या पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांसोबत नाते सुधारण्याची शक्यता. भागिदारीत नवा व्यवसाय सुरू कराल. देणी-घेणी करताना सावध रहा. वादविवादांपासून सुटका मिळेल. धार्मिक कार्यात रस वाढेल.
मीन – जुने वाद मिटण्याची शक्यता
आज तुम्हाला तुमच्या जुन्या वादातून सुटका मिळणार आहे. जोडीदारासोबत प्रेम आणि सहकार्याने वागा. व्यावसायिक संपर्क लाभाचे ठरतील. आत्मविश्वास वाढणार आहे. रचनात्मक कार्यात वाढ होईल.
वृषभ – मौल्यवान वस्तू खराब होण्याची शक्यता आहे
आज तुमची मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची अथवा खराब होण्याची शक्यता आहे. वादविवादांपासून दूर रहा.राजकारणातील सक्रीयता वाढणार आहे. देणी-घेणी सांभाळून करा.
मिथुन – एखादा जुना आजार डोकं वर काढेल
आज तुम्हाला एखादा जुना आजार त्रास देण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासाने निर्णय घ्या. प्रतिष्ठा आणि धनसंपत्तीत वाढ होईल. क्षमतेपेक्षा जबाबदाऱ्या वाढणार आहेत. प्रवासाचा योग आहे.
कर्क – नात्यातील तणाव वाढेल
आज तुमच्या नातेसंबंधातील तणाव वाढणार आहे. याला कारण तुमचे एखाद्या वक्तीकडे झालेले आकर्षण असू शकते. नातेसंबंध सांभाळ्याचा प्रयत्न करा. रागावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक स्थिती आनंददायी असेल. मित्रांसोबत सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
सिंह – डोळ्यांच्या समस्या जाणवतील
आज तुम्हाला विनाकारण दगदग करावी लागेल. डोळ्यांच्या समस्या वाढणार आहेत. व्यावसायिक भागिदारीतून लाभ मिळेल. मित्रांबरोबर वेळ घालवाल. विवाहातील अडचणी कमी होणार आहेत. आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे.
कन्या – उत्पन्नात वाढ होईल
आज तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. कामाच्या ठिकाणी मेहनत आणिु हुशारीने पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. नवीन कामे मिळाल्याने फायदा होणार आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. परदेशी जाण्याचा योग आहे.
तूळ – रोमॅंटिक प्रवासाचं सरप्राईझ मिळेल
आज तुम्हाला एखाद्या रोमॅंटिक प्रवासाला जाण्याचं सरप्राईझ मिळणार आहे. असं काहीतरी कराल ज्यामुळे मीडियामध्ये लोकप्रिय व्हाल. एखाद्या संस्थेकडून सन्मान मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत असेल.
वृश्चिक – नव्या नोकरीचा शोध घ्यावा लागेल
आज तुम्हाला मनासारख्या कामासाठी नव्या नोकरीचा शोध घ्यावा लागेल. योग्य वेळी निर्णय न घेतल्यास समस्या वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल.
धनु – रखडलेली कामे पूर्ण होतील
आज तुमची रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. उत्पन्नाचे नवे साधन मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याचा योग आहे. व्यावसायिक दगदग सहन करावी लागेल. नवीन कामे मिळतील. गरजूंना मदत केल्यामुळे आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
मकर – व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता
आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळणार नाही. नवीन योजना यशस्वी होतील. व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी जाणवेल. वाहन चालवताना सावध रहा.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव