बऱ्याचदा असं म्हटलं जातं की, मुली या emotional fool असतात. पण कोणीही कितीही आणि अगदी काहीही म्हटलं तरीही मुलींना Seduce करणं ही सोपी गोष्ट नक्कीच नाही असं प्रत्येक मुलीला वाटत असतात. पण खरंच यात तथ्य आहे का? असाही प्रश्न पडतो. कधी कधी मुलं अशा ट्रिक्स वापरतात की, मुली लगेच त्यांच्याकडे आकर्षित होतात. तुम्हालाही मुलांच्या या ट्रिक्स समजून घेणं गरेजचं आहे. तुम्हाला माहिती आहे का? मुलं ही तुम्हाला emotionally टच करून seduce करतात आणि तुम्हाला कळतही नाही. नक्की मुलं कोणत्या ट्रिक्स वापरतात हे आपण बघूया. तुम्हालाही ही माहिती असणं आवश्यक आहे. जेणेकरून कोणताही मुलगा तुमच्यावर ही ट्रिक करत असेल तर तुम्हाला नक्की कळेल.
1. तुमचं लक्ष स्वत:कडे वळवून घेतात
Tumblr
जर निळ्या शर्टाऐवजी मुलं लाल शर्ट घालून आली तर त्यांना तुमचं लक्ष स्वत:कडे वेधून घ्यायचं आहे हे नक्की. त्यानंतर त्याने जर कोणती अशी वाक्य म्हटली जी तुम्हाला पटकन लागतील तर नक्कीच त्याचं काम होतं. तो असं का बोलला याचा तुम्ही विचार करत राहाता अथवा नक्की असं का याचं स्पष्टीकरण देण्यासाठी तुम्ही स्वत:च त्याच्याजवळ जाता. त्याला ही गोष्ट माहीत असते. हे असंच होणार माहीत असल्याने त्याने ही ट्रिक केलेली असते. त्यामुळे ही त्याची नेहमीची आणि अगदीच कामी येणारी ट्रिक आहे.
सकारात्मक कसे रहायचे याबद्दल देखील वाचा
2. तुमच्या दोघांच्याही मध्ये एक विश्वास तयार करतो
तुम्हा दोघांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी तो तुमच्याशी त्याची एखादी व्यक्तीगत गोष्ट शेअर करतो आणि त्यानंतर एकमेकांशी बोलणं वाढत जातं. त्याचा तुमच्यावर विश्वास आहे हा विश्वास तुमच्या मनात निर्माण होतो. तुम्हाला वाटतं की, तो तुमच्याशी त्याने सिक्रेट शेअर करत आहे. पण खरं तर तुमच्याशी अधिक बोलणं वाढवण्यासाठी तो असं करतो. तसंच तुमच्या अधिक जवळ येण्यासाठी तो या गोष्टीचा वापर करत असतो. प्रत्येक मुलगा अशा ट्रिक्स नक्कीच वापरतो.
या ‘8’ ‘टिप्स Sex लाईफ करतील अधिक interesting
3. जुन्या गोष्टींची आठवण करून तुमच्या अधिक जवळ येण्याचा करतो प्रयत्न
Tumblr
जुन्या गोष्टींच्या आठवणी काढून आयुष्य किती सुंदर आहे हे दाखवण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करतो. तसंच त्याच्या असं वागण्याने आयुष्य किती सुंदर आणि चांगलं झालं आहे असं तुम्हाला वाटायला लागतं. तुम्ही जर त्याक्षणी त्रासात असाल तर तुम्हाला नक्कीच त्याच्या अशा गोष्टींनी त्याच्या अधिक जवळ जाण्यासाठी मनापासून बरं वाटायला लागतं.
4. तुमच्या आयुष्यातील सर्वात वाईट phase ची देखील करून देतो आठवण
तुम्ही त्याच्या अधिक जवळ यावं यासाठी तो तुम्हाला तुमच्या वाईट दिवसांची आठवण करून द्यायलादेखील कचरत नाही. यामुळे तुम्हाला अधिक उमाळा येऊन तुम्ही रडू लागता आणि त्याच्या अधिक जवळ जाता. तसंच तुम्ही तुमचं मन त्याच्याजवळ त्या क्षणी मोकळं करता आणि तोच आपल्या अधिक जवळचा आहे असं वाटू लागतं. हा तोच आहे जो आपल्याला सर्वात जास्त समजून घेतो असं तुम्हाला वाटू लागतं.
जेव्हा अशा गोष्टी तुमच्यासोबत घडू लागतात… तेव्हा तुम्हाला असते sex ची गरज
5. तो तुमची एखादी बाब point out करतो
तुमच्यावर एखादा ड्रेस चांगला दिसतो, एखादी हेअरस्टाईल तुम्हाला सूट करते. या सगळ्या लहान सहान गोष्टींकडे तो लक्ष देतो. त्यामुळे तो आपल्याबद्दल किती विचार करतो हे तुम्हाला जाणवतं आणि तुम्ही त्याच्याबद्दल विचार करू लागता. त्यामुळे तुम्ही स्वत:च त्याच्याकडे अधिक प्रमाणात आकर्षित होता.
6. ग्रुपमध्ये असतानाही इशारेबाजी चालू राहाते
Tumblr
इतर सर्व मित्रमैत्रिणी बाजूला असतानाही तो तुमच्याकडे पाहून हसतो आणि डोळ्यांनी हलकेसे इशारे देतो. त्यामुळे असं असताना तुम्ही त्याच्यापासून दूर कसे राहू शकता. शब्दांपेक्षाही कधीतरी त्याचे असे इशारे जास्त काम करतात. या गोष्टी त्यालाही माहीत असतात. त्यामुळे तो या गोष्टींचा तुम्हाला seduce करण्यासाठी जास्त उपयोग करून घेतो. त्याच्या अशा वागण्याने तुम्ही नक्कीच प्रभावित व्हाल हे त्याला माहीत आहे.