फॅशन म्हटलं की आपण बॉलीवूड Divas यांना अनेकदा फॉलो करत असतो. मराठी तारका असोत वा अन्य बॉलीवूड हिरॉईन्स यांचा फॅशन सेन्स आपण अनेकदा फॉलो करत असतो. आजकाल साडीचा ट्रेंड अधिक दिसून येतो आहे. हँडलूम साड्यांची फॅशन कधीही जुनी होत नाही आणि अशातच महाराष्ट्रीयन साड्यांची शान म्हणजेच पैठणीचा वेगळाच तोरा आहे. याची भुरळ अनेक तारकांनाही पडलेली आहे. अनेक मोठमोठ्या हिरॉईन्स वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाताना पैठणी नेसण्याला प्राध्यान्य देताना दिसतात. सोनाली बेंद्रे (Sonali Bendre), माधुरी दीक्षित(Madhuri Dixit), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यासारख्या लोकप्रिय अभिनेत्रींनाही पैठणीची भुरळ पडलेली आहे. पैठणी साडीची स्टाईल नक्की कशी करायला हवी जेणेकरून अगदी मराठमोळा आणि ठसकेबाज लुक तुम्हाला मिळू शकेल हे घ्या जाणून.
काय आहे पैठणी साडी?
महाराष्ट्रीयन लग्न असो अथवा काही खास कार्यक्रम असो पैठणी साड्यांना खूपच महत्त्व आहे. प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये एकतरी पैठणी असायलाच हवी. ही मराठी स्टाईल असणारी साडी सिल्कपासून तयार होते. यामध्ये जरी बॉर्डरसर पदरावर मोर, कमळाचे फूल, पोपट तसंच अनेक हँडलूम डिझाईन्स तयार करण्यात येतात. प्युअर सिल्कची ही साडी असल्यामुळे बाजारात या मूळ साडीची किंमत ही खूपच आहे. पैठणी साडी ही चंदेरी आणि सोन्याच्या धाग्यांचा वापर करूनही बनवण्यात येते आणि त्यामुळेच याची किंमत अधिक असते. याची स्टाईल कशी करावी हे जाणून घेऊया.
1. पैठणी साडी आणि दागिने
पैठणी साड्यांसह कोल्हापुरी साज अथवा सोन्याचे दागिने अधिक उठावदार दिसतात. यासह तुम्ही मोत्यांच्या दागिन्यांचा वापर केल्यासही तुमची स्टाईल आकर्षक दिसेल. तुम्हाला पैठणी साडीवर अधिक भरजरी दागिने घालयचे नसतील तर तुम्ही एखादा चोकर आणि सोन्याची चैनचा वापर करा आणि मोत्याचे वेलवाले दागिने घाला. ही स्टाईल उत्तम ठरते. तसंच पैठणी साडी ही मुळातच दिसायला भरजरी असल्यामुळे तुम्ही अधिक भारदस्त दागिने यावर घालू नका. नाजूकसे कानातलेही यावर उठावदार दिसतात. त्याशिवाय मोत्याची नथ घालायला विसरू नका. कारण नथीने एक वेगळाच साज चढतो. पैठणी साडी नेसल्यावर भडक मेकअप करायची गरज अजिबात भासत नाही. कारण साडी आणि त्यावरील दागिने तुमच्या लुकसाठी परफेक्ट ठरतात.
2. पैठणी साडी आणि हेअरस्टाईल
पैठणी साडीवर पारंपरिक लुक अधिक शोभून दिसतो. त्यामुळे कोणत्याही लग्न अथवा मुंजीमध्ये तुम्ही पैठणी साडी नेसणार असाल तर तुम्ही त्यावर हेअरस्टाईल म्हणून अंबाडा आणि गजरा नक्की ट्राय करा. महाराष्ट्रीयन नवरी सहसा ही हेअरस्टाईल निवडतात आणि ही अधिक उठावदार आणि आकर्षक दिसते. तुमचा चेहरा थोडा जाडसर आणि गोलाकर असेल तर तुम्ही मेस्सी बनचा वापर करा जेणेकरून तुमच्या चेहऱ्यापेक्षा तुमच्या हेअरस्टाईलकडे लोकांचे अधिक लक्ष जाईल. तुमचा चेहरा बारीक असेल आणि कॉलर बोन असेल तर तुम्ही स्लीक अप-डू हेअरस्टाईलचा वापर करू शकता. पैठणीवर तुम्ही वेगवेगळ्या हेअरस्टाईल तुमच्या चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे करू शकता.
3. पैठणी साडी आणि ब्लाऊज स्टाईल
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ब्लाऊज डिझाईन्स नेहमीच बनवून घेत असता. पैठणी साडीसह तुम्ही ब्लाऊजचे डिझाईन्सदेखील पारंपरिक अर्थात ट्रेडिशनल ठेवण्याचा प्रयत्न करा. पैठणी साडीचे रंग हे अधिक गडद आणि आकर्षक असतात. तसंच तुम्ही ब्लाऊजचे नेक आणि बॅक डिझाईन्सह वेगवेगळे प्रयोग करू शकता. पण अधिक साड्यांसह ¾ ब्लाऊज अथवा फुल स्लीव्सचे ब्लाऊज अधिक शोभून दिसतात. लग्नासाठी ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही डिझाईनर ब्लाऊज घेतलात तरी त्याला काहीसा पारंपरिक टच देण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्ही अधिक सुंदर दिसू शकाल.
4. पैठणी साडी आणि दुपट्टा
पैठणी साडीसह तुम्ही दुपट्टा अथवा शेला घेऊन त्याची शोभा अधिक वाढवू शकता. पैठणी साडी जर नऊवारी साडी असेल तर त्यावर शेला अधिक सुंदर दिसतो. पाचवारी साडी कशी नेसायची हे सर्वांनाच माहीत आहे. पण नऊवारी साडीच्या लुकवर तुम्ही हा शेला घेऊन त्याचा लुक अधिक रॉयल करा. तुम्ही तुमच्या अथवा कोणत्या जवळच्या व्यक्तीच्या लग्नात तयार होत असाल तर तुम्हाला हा लुक अधिक सुंदर दिसतो.
साडीचा ट्रेंड कधीही जुना होत नाही. त्यामुळे तुम्ही पैठणी साड्या अथवा हँडलूम साड्या आवडत असल्यास, अशा पद्धतीने स्टाईल करा. तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कमेंटबॉक्स मध्ये तुमचे प्रश्नही आम्हाला विचारू शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक