फॅशनेबल दिसण्यासाठी तुम्ही सतत खरेदी करत असता. मात्र जेव्हा तुम्ही कपड्यांवर पैसे खर्च करत असता तेव्हा ती एक प्रकारची गुंतवणूक असते. म्हणूनच हे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जात आहेत का हे अवश्य तपासायला हवं. ड्रेस असो वा साडीचा ब्लाऊज त्याची स्टाईल, प्रकारा यामुळे तुमचा नवा लुक ठरत असतो. जर तुम्ही तुमच्या बॉडीटाईपनुसार ड्रेस अथवा ब्लाऊजच्या हाताची लांबू ठरवली तर तुमच्या लुकमध्ये अफलातून फरक जाणवू शकतो. तुमच्या ड्रेसच्या अथवा ब्लाऊजच्या हाताच्या लांबीमुळे तुम्ही जाड अथवा बारीक दिसू शकता. यासाठी या टिप्स जरूर फॉलो करा.
कशी निवडावी स्लीव्जची लांबी (How to Choose Right Sleeve Length)
जर तुम्हाला ब्लाऊज अथवा ड्रेसच्या हाताची लांबी किती असावी यात संभ्रम असेल तर या टिप्स फॉलो करा.
बारीक हात असतील तर फुल स्लीव्ज
ज्या महिलांचे दंड अतिशय बारीक असतात त्यांना फुल स्लीव्ज छान दिसतात. कारण त्यामुळे तुमच्या शरीराला फुलर आर्म इल्यूजन मिळतं. थोडं जाड दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या ड्रेस अथवा ब्लाऊजचं कापड फ्लोरल, सिक्विन, जरी वर्क वालं करू शकता. जर त्याचे कापड शिफॉन, जॉर्जेट असेल तर तुम्ही खूप बारीक वाटाल. पण तेच ज तु्म्ही कॉटन, सिल्क अथवा वेलवेटचं कापड वापरलं तर तुमचे हात थोडे जाड दिसतील.
जाड दंडासाठी क्वार्टर स्लीव्ज
समजा तुमचे दंड खूपच जाड आणि बलदंड असतील तर शरीर यष्टी बारीक दिसण्यासाठी थ्री फोर्थ अथवा क्वार्टर स्लीव्जचे कपडे वापरा. ज्यामुळे तुम्ही तुमच्या बॉडीटाईपपेक्षा बारीक आणि सुडौल दिसाल. तुम्ही जर उंच असाल तरीही तु्म्हाला या प्रकारच्या बाह्या छान वाटतील.
बारीक लोकांसाठी पफी स्लीव्ज
ज्या लोकांची शरीर यष्टी आणि हात खूप बारीक असतात. त्यांना हात दिसू ड्रेसमधून दिसू नये असं वाटत असतं. मग अशा वेळी स्लीव्जलेस कपड्यांपेक्षा पफी स्लीव्जचे कपडे वापरा. हा लुक एलिगंट आणि सुंदर दिसतो. तुम्ही लॉंग पफी स्लीव्ज अथवा शॉर्ट पफी स्लीव्ज असं तुमच्या आवडीनुसार हाताची लांबी ठरवू शकता. कारण दोन्ही प्रकार तुमच्यावर छान दिसतील.
टोन्ड बॉडी साठी न्यूडल स्ट्रैप्स
जर तुम्ही व्यवस्थित व्यायाम करता आणि त्यामुळे तुमचं शरीर सुडौल असेल तर तुमच्यावर कोणतेही स्लीव्ज चांगले दिसतील. मात्र आम्ही तुम्हाला न्युडल स्ट्रैप ट्राय करण्याचा सल्ला देऊ. हा बाह्यांचा प्रकार कोणावरही चांगला दिसतो. मात्र जर तुम्ही टोन्ड बॉडीशेपच्या असाल तर तु्म्ही या प्रकारात अतिशय सुंदर दिसाल.
स्लीव्जलेस बाह्यांचे कपडे
स्लीव्जलेस ब्लाऊज अथवा ड्रेस घातल्यामुळे तुमचा लुक क्लासी आणि एलिगंट दिसतो. मात्र यासाठी तुमच्या हाताचे दंड परफेक्ट शेपमध्ये असालयला हवे. तुम्ही बारीक असा अथवा जाड जर तुमच्या दंडाचा शेप चांगला असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही.
आम्ही शेअर केलेल्या या टिप्स तुम्ही वापरल्या का आणि त्याचा तुमच्या लुकवर काय परिणाम झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्याचप्रमाणे आमच्या इतर फॅशन आणि ब्युटी टिप्सही अवश्य फॉलो करा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
या हटके स्टाईलने ड्रेप करा साडीचा पदर, मिळेल सेलिब्रेटी लुक
चिकनकारी अथवा लखनवी ड्रेस वापरताना या गोष्टी ठेवा लक्षात
लग्नसराईसाठी असा करा वापर वेलवेटच्या ड्रेसचा, दिसाल स्टायलिश