ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
सिल्कचे कपडे घरीच ‘ड्राय क्लीन’ करण्यासाठी सोप्या टिप्स

सिल्कचे कपडे घरीच ‘ड्राय क्लीन’ करण्यासाठी सोप्या टिप्स

सिल्क अथवा नाजूक पोताचे कपडे साबणाने न धुता ते फक्त ‘ड्राय क्लीन’ करणं गरजेचं असतं. अशा कपड्यांवर ‘ड्राय क्लीन ओन्ली’ असं  लेबल लावलेलं असतं. मात्र कपडे ड्राय क्लीन साठी दिल्यावर ते तसेच चमकदार राहत नाहीत असा अनेकांचा अनुभव असेल. बऱ्याचदा ड्राय क्लीनसाठी कपडे अथवा महागड्या साड्या लॉंड्रीमध्ये दिल्यावर त्या खूपच फिक्या रंगाच्या आणि जुनाट दिसू लागतात. महागड्या कपड्यांवर ड्राय क्लीन करण्यासाठी एकतर खूप पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे अशा प्रकारे जर तुमचे महागडे कपडे आणि ड्राय क्लीनसाठी लागणारे पैसे दोन्ही वाया गेले तर नक्कीच वाईट वाटतं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत घरच्या घरी कपडे कसे ड्राय क्लीन करावेत. 

ड्राय क्लीन म्हणजे नेमकं काय –

कपड्यांना पाणी न लावता ते ड्राय वॉश करणे म्हणजे ड्राय क्लीन असा एक समज आहे. मात्र ड्राय क्लीन म्हणजे कपड्यांच्या रेशमी धाग्यांचे नुकसान न करता अथवा त्यांचा रंग आणि चमक कमी न करता ते वॉष करणे. खरंतर ड्राय क्लीन केल्यामुळे तुमचे जुने कपडेही नव्याप्रमाणे  चमकू शकतात. ड्राय क्लीन दोन प्रकारे केलं जातं. एक वेट ड्राय क्लीन आणि दुसरं ड्राय क्लीन. तुम्हाला कोणत्या कपड्याचे वेट ड्राय क्लीन करायचं आहे आणि कोणत्या कपड्यांचे ड्राय क्लीन करायचं आहे हे समजणं गरजेचं आहे. जे कपडे रंगहीन आहेत त्यांना तुम्ही वेट ड्राय क्लीन करू शकता. रंगीत  आणि वर्क केलेले कपडे मात्र तुम्हाला फक्त ड्राय क्लीनच करायला हवेत. 

Instagram

ADVERTISEMENT

घरी कपडे ड्राय क्लीन करण्यासाठी सोप्य टिप्स –

  • जर तुमच्या कपड्यांवर एखादा डाग लागला असेल तर पूर्ण कपडे धुण्यापेक्षा त्या डागावरच उपाय करा. गरम पाण्यात कपडे धुण्याचा सौम्य साबण अथवा लिक्विड मिसळा आणि स्पंजच्या मदतीने तो डाग स्वच्छ करा. त्यानंतर ते कापड थंड पाण्याने धुवून टाका. 
  • रेशमाचे अथवा नाजूक पोताचे कपडे  कधीच  उन्हात सुकवू नका. घरातच ते हवेवर सुकू द्या. 
  • डिझायनर कपड्यांवर ड्राय क्लीन करण्याबाबत ज्या सूचना असतात. त्या व्यवस्थित फॉलो करा. 
  • मीठ अथवा बेकींग पावडरनेही तुम्ही तुमच्या महागड्या कपड्यांवरील डाग काढून टाकू शकता.
  • व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही कपड्यांवरील ग्रीस अथवा कॉफीचे डाग काढू शकता. 
  • सर्वच कपड्यांना बाहेर लॉंड्रीमध्ये ड्राय क्लीन करण्याची गरज नसते. सुती, पॉलिस्टर, एक्रेलिक कपडे तुम्ही सौम्य साबणाने  घरीच धुवू शकता. 
  • वेट ड्राय क्लीनसाठी कधीच हार्श डिर्टंजटचा वापर करू नका. सौम्य साबण अथवा शॅम्पूनेच असे कपडे धुवा. 
  • जर तुमच्या कपड्यांवर कोणताही डाग नसेल पण तुम्हाला घामाचा वास काढून टाकायचा असेल तर तुमच्या कपड्यांना फक्त स्टीम द्या. ज्यामुळे ते स्वच्छ होतील. तुम्ही हेअर ड्रायर अथवा व्हॅक्यूम क्लीनरने असे कपडे स्वच्छ करू शकता.
  • एखादे रेशमी कापड तुम्ही घरी धुवू शकता का हे तपासण्यासाठी त्याची पॅच टेस्ट घ्या. कॉनट पॅडवर पाणी लावून तो त्या कापडावर हलका रगडा जर त्याचा रंग जात असेल तर तुम्हाला या कापडावर वेट ड्राय क्लीन करता येणार नाही.

Shutterstock

आम्ही दिलेल्या या टिप्सचा तुम्हाला कसा फायदा झाला आणि तुम्ही कपडे घरी ड्राय क्लीन केले का हे आम्हाला जरूर कळवा.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

पावसाळ्यात सिल्कच्या साड्यांची काळजी घेण्यासाठी खास टिप्स

आयुष्य अधिक सुखकर करणाऱ्या क्लिनिंग हॅक्स (Best Cleaning Hacks In Marathi)

Kitchen Tips: फ्रिजची अशाप्रकारे करा साफसफाई

ADVERTISEMENT
24 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT