ADVERTISEMENT
home / Care
जाणून घ्या स्काल्पवर पिंपल्स येण्याची कारणं आणि घरगुती उपाय

जाणून घ्या स्काल्पवर पिंपल्स येण्याची कारणं आणि घरगुती उपाय

काहीजणांच्या केसांमध्ये बऱ्याचदा तीव्र खाज येते आणि लगेचच दोन – तीन पिंपल्स अथवा फोड येतात. तुम्हालाही ही समस्या जाणवत असेल तर काळजी करण्याचं कारण नाही कारण ही एक केसांमध्ये निर्माण होणारी सामान्य आरोग्य समस्या आहे. या समस्येचं मूळ कारण आहे स्काल्पवरील पोअर्स बंद होणं. यामुळे तुमच्या स्काल्पवर जीवजंतूचे संक्रमण वाढते आणि स्काल्पवर खाज येते. या समस्येला ‘स्काल्प एक्ने’ असं म्हटलं जातं. बऱ्याचदा पावसाळ्यात केस ओले राहिल्यामुळे स्काल्प एक्ने येण्याची शक्यता वाढते. स्काल्प एक्नेमुळे केसांमध्ये तीव्र खाज येते. मात्र याबाबत फार चिंता करण्याचं कारण नाही. कारण साधे घरगुती उपाय करूनही तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

Shutterstock

नारळाचे तेल –

नारळाचे तेल केसांच्या कोणत्याही समस्येवर अगदी रामबाण उपाय ठरू शकते. कारण नारळामध्ये अॅंटी इनफ्लैमटरी, अॅंटि बॅक्टेरिअल आणि  अॅंटि मायक्रोबाईल गुण अ्सतात. ज्यामुळे तुमचा स्काल्प निरोगी होतो. यामुळे तुमच्या केसांमधील हे फोड अथवा पिंपल्स बरे होतात आणि पुन्हा  येत नाहीत. 

ADVERTISEMENT

कसा कराल वापर –

 • यासाठी शुद्ध नारळाचे तेल एका वाटीमध्ये घ्या आणि थोडे कोमट करा
 • कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांना आणि स्काल्प एक्नेवर हे तेल लावा.
 • एक ते दोन तास तेल केसांमध्ये मुरू द्या. 
 • त्यानंतर एखाद्या केमिकल फ्री शॅम्पूने केस धुवा.
 • तुम्ही या तेलामध्ये थोडं ट्री टी ऑईलदेखील मिसळू शकता. 
 • आठवड्यातून एक ते दोन वेळा केसांना नारळाचे तेल लावा.

Shutterstock

कोरफड –

कोरफडीमध्ये दाह कमी करणारे अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या स्काल्पवरील पिंपल्स लवकर बरे होतात. खाज कमी करण्यासाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी तुम्ही केसांना नियमित कोरफड लावू शकता.

ADVERTISEMENT

कसा कराल वापर –

 • कोरफडाचे एक जाड पान घ्या आणि त्याचा गर वाटीमध्ये काढून घ्या.
 • कोरफडाचा गर एकजीव करून तुम्ही तो थेट तुमच्या स्काल्पवर अथवा एक्नेवर लावू शकता.
 • त्यानंतर कमीत कमी  तीस मिनीटांनी केस स्वच्छ धुवा
 • तु्म्ही दररोज अथवा एक दिवस आड हा प्रयोग केसांवर करू शकता. 

Shutterstock

अॅपल सायडर व्हिनेगर –

अॅपल सायडर व्हिनेगरमुळे तुमच्या स्काल्पमधील पीएच बॅलन्स संतुलित राहण्यास मदत होते. शिवाय यामुळे तुमचे स्काल्प एक्ने लवकर बरेदेखील होऊ शकतात. यामधील अॅंटि मायक्रोबाईल घटक तुमच्या त्वचेला लवकर बरे करते. केसांच्या विविध समस्यांवर अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर केला जातो.

ADVERTISEMENT

कसा कराल वापर –

 • अर्धा चमचा अॅपल सायडर व्हिनेगर, दीड कप पाणी आणि एक ते दोन थेंब टी ट्री ऑईल एकत्र करा. 
 • केसांना शॅम्पू केल्यावर तुम्ही हे मिश्रण केसांवर लावून केस साध्या पाण्याने धुवू शकता. 
 • हे मिश्रण लावल्यानंतर केसांना शॅम्पू करू नका
 • त्याचप्रमाणे त्यानंतर केस ड्रायरने वाळवू नका.
 • जेव्हा जेव्हा तुम्ही केस धुवाल त्यानंतर हे मिश्रण केसांना लावा ज्यामुळे दोन ते तीन आठवड्यांनी तुमच्या केसांमधील एक्ने कमी होतील. 

कडूलिंबाची पाने –

कडूलिंबामध्ये अॅंटि सेप्टि आणि अॅंटिट बॅक्टेरिअ गुणधर्म असतात. ज्यामुळे जीवजंतू, विषाणूंचा यामुळे नाश होतो. केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी कडूलिंबाचा वापर नियमित करणं गरजेचं आहे.

कसा  कराल वापर –

 • दहा ते पंधरा कडूलिंबाची पाने पाण्यामध्ये उकळून घ्या. 
 • पाणी उकळल्यावर त्याचा रंग बदलेल.
 • पाणी गाळून घ्या आणि थंड करा.
 • केस शॅम्पू केल्यावर केसांवर हे पाणी लावा आणि साध्या पाण्याने केस धुवा. 
 • आठवड्यातून एक ते दोन वेळा असं केल्यास स्काल्प एक्ने लवकर बरे होतात.

ADVERTISEMENT

Shutterstock

मेथी

मेथीच्या बियांचा वापर केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी ठरते. अॅंटि इनफ्लैमटरी घटक असतात ज्यामुळे जीवजंतूंचा नाश होतो. केसांच्या अनेक समस्यांवर याचा उपाय करता येतो. 


कसा कराल वापर –

 • दीड कप मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजत घाला
 • दुसऱ्या दिवशी ते गाळून वाटून घ्या
 • मेथीचे मिश्रण केसांच्या मुळांना लावा आणि अर्धा तासाने केस धुवून टाका.
 • आठवड्यातून दोन ते तीन वेळा मेथी लावण्यामुळे तुमचा स्काल्प निरोगी होतो.

ADVERTISEMENT

Shutterstock

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

महिलांना टक्कल पडण्याचे कारण आणि घरगुती उपाय (Home Remedies For Female Baldness)

ADVERTISEMENT

केस तुटण्याची कारणे आणि त्यावरील हमखास उपाय (Home Remedies For Hair Breakage In Marathi)

तुमचेही केस कोरडे आहेत का? मग हे शॅम्पू तुमच्यासाठी आहेत बेस्ट (Shampoo For Dry Hair)

09 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT