घरात एखादी छोटेखानी पार्टी करायची ठरवली की, स्टाटर्सपासून ते अगदी मुखवासापर्यंत सगळी तयारी करावी लागते. खूप जणांना हेवी किंवा जड असे पदार्थ खाल्ल्यावर मीठा पान म्हणजेच गोड पान खायची इच्छा होते. लॉकडाऊनमुळे हल्ली खूप जण घरीच सगळे काही बनवायला शिकले आहेत. अगदी बजेटमध्ये काही गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही घरीच काही गोष्टी बनवलेल्या चांगल्या असतात. जेवणाच्या नंतर मीठा पान बनवायचे असेल तर तुम्हाला बाहेरुन विकत आणण्याची काहीच गरज नाही. तुम्ही काही सामान आणून घरी देखील मस्त मीठा पान बनवू शकता. जाणून घेऊया घरी नेमकं मीठा पान कसं बनवायचं ते.
मीठा पान म्हणजे काय?
गोड पान खाण्याची पद्धत हल्ली सगळीकडे आहे. रोजच्या पानाप्रमाणेच खायची पाने वापरुन त्यामध्ये तंबाखू आणि कात न टाकता केवळ बडीशेप, गुलकंद, चेरी असे काही घालते जाते. त्यामुळे पानाची चव चांगलीच वाढते. गोड पान हे अनेक जणांना त्यावर लावलेल्या चेरीमुळे आवडते तर काही जणांना त्याचा गोडवा आवडतो. पान खाण्याची पद्धत ही तशी जुनीच आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पान बनवले जाते. आता तर पानांमध्ये इतकी व्हरायटी आली आहे की पानांची किंमत ही अगदी लाखापर्यंत गेली आहे. विड्याचे पान खाण्याचे फायदे लक्षात घेत खास समारंभासाठी तुम्ही मीठा पान खायलाच हवे.
असे घरी तयार करा मीठा पान
मीठा पान घरीच करायची विचार केला असेल तर तुम्ही हे साहित्य आणा आणि असे बनवा मीठा पान
साहित्य: खायची पाने, चुना, गोड सुकं खोबरं, लवंग, टुडी फ्रुटी, गुलकुंद, गोड सुपारी, गोड बडीशेप, चमनबहार, कत्था, पेपरमिंट, चेरी आणि आवडत असल्यास चांदीचा वर्ख.
कृती:
- सगळ्यात आधी पानांचा वरचा भाग कापून घ्या. पान स्वच्छ करुन पुसून घ्या
- आता पानाला अगदी कमीत कमी चुना आणि कत्था लावा. पानाला चव ही त्यामुळे येत असते.
- त्यावर गोड सुकं खोबरं आणि उरलेल्या सगळ्या गोष्टी घाला. या गोष्टी अगदी प्रमाणशीर असायला हवे. कारण यामध्ये एखादी गोष्ट जास्त झाली तरी त्याचा त्रास होऊ शकतो.
- आता पान फोल्ड करुन त्यावर लवंग लावा आणि टुथपीक घेऊन ते पानांच्या मध्ये रोवा आणि त्यावर मस्त चांदीचा वर्ख लावा. पान जर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवले तर ते अधिक चांगले लागते. त्यामुळे तुम्ही असे पान वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता
पान खाण्याचे फायदे
खायची पानं (betel leaf in marathi) ही आरोग्यासाठी फारच चांगली असतात. पानं खाण्याचा विचार करत असाल तर पान खाण्याचे फायदेही जाणून घ्यायला हवेत.
- विड्याच्या पानामध्ये कॅल्शिअम, मिनरल्स आणि प्रोटी असतात.
- विड्याचे पान खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते.
- रक्त शुद्ध करण्यासाठी विड्याची पानं ही फारच फायद्याची असतात.
आता खास समारंभासाठी नक्कीच तुम्ही घऱी अशा पद्धतीने मीठा पान बनवा.
अधिक वाचा
जाणून घ्या लसूण खाण्याचे फायदे | Lasun Khanyache Fayde