ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
light_bill_fb

लाईट बील जास्त येते, या ट्रिक्सनी लाईट बील येईल कमी

 घर चालवायचे म्हणजे सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. घर म्हणजे खर्च आलेच. त्यामध्ये लाईट बील, गॅस बील, किराणा मालाचे बील असे सगळे आलेच. काही खर्च घरात टाळता येत नाही. पण काही गोष्टी आपण सवयीनेथोड्याफार कमी करता येऊ शकतात. आता घरात सगळ्यात जास्त बदलणारे काही असेल तर ते लाईट बील.लाईट बीलाचा कधीही अंदाज येत नाही. हे एक बील असे असते जे कधी जास्त कधी कमी येऊ शकते. विशेषत: उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये गरमीपासून थोडी सुटका करण्यासाठी एसी लावला जातो. पण त्यानंतर येणारे बील हे डोळे विस्फारणारे असते. लाईटचे बील काहीही न करता सतत जास्त येत असेल तर तुम्ही या काही ट्रिक्स फॉलो करायला हव्यात .

अधिक वाचा : बाजारातून कुंड्या आणण्यापेक्षा घरातच या टाकाऊ गोष्टींपासून बनवा ट्री प्लांटर्स

लाईटचे बील तपासा 

लाईटचे बील आल्यानंतर आपण ते कमी असेल तर तपासात नाही. कारण कमी आले यातच आपल्याला समाधान असते. पण ज्यावेळी तुमचे लाईट बील येईल त्यावेळी त्यामध्ये नमूद केलेला कालावधी आणि तुम्ही वापरलेले युनिट्स तपासा. त्यानुसार तुमचे बील ठरते. एका युनिटचा दर किती त्यावर तुमचे बील अवलंबून असते. त्यावर लागणारे कर हे देखील बघा. म्हणजे तुम्हाला तुमचे लाईट बीट नीट कळेल. 

लमसम आलेले बील

अनेकदा आपल्याला बील येते ते लमसम असते. म्हणजे काही वेळा एक अंदाजित बील दिले जाते. या बीलाचा अंदाज तुमच्या मागच्या बीलाचा अंदाजावरुन ठरवण्यात आलेला असतो हे बील पुढच्या महिन्यात एडजस्ट करुन येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला किती दिवस असे लमसम बील येते ते तपासा. म्हणजे तुमच्यावर प्रेशर येणार नाही. अशा बीलासंदर्भात तुम्ही रितसर चौकशी करु शकता. त्यामुळे तुमच्या शंकेचे निरसन होईल.

ADVERTISEMENT

मीटर तपासा

मीटर रिडींग महत्वाची

मीटर तपासणे हे देखील खूपच गरजेचे असते. इमारतीमध्ये राहात असाल तर तुमच्या मीटरची एक वेगळी जागा असते. तिथे सगळे मीटर लावलेले असतात. तुमच्या मीटरमध्ये काही छेडछाड तर होत नाही हे तपासा. कारण खूप वेळा आपल्या मीटरकडे लक्ष नसते. त्यामुळे त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात आधी या बाहेरच्या गोष्टी तपासून घ्या. 

आता वरील गोष्टी झाल्या या बाहेरच्या ज्या तुम्ही तपासायला हव्यात.या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या वापरावर कसे नियंत्रण आणायला हवे ते जाणून घेऊया.

  1. घरात एसी असेल तर अशावेळी लाईटचे बील जास्त येते. जर लाईटचे बील कमी येऊ द्यायचे असेल तर अशावेळी तुम्ही एसी तासभर लावा. त्यानंतर बंद करुन एसीची कुलिंग तशीच राहू द्या. त्यानंतर तुम्ही पंखा लावला तरी देखील चालू शकते. 
  2. घरात वॉशिंग मशीन असेल ती किती पावरची आहे ते तपासा. त्याचा उपयोग दिवसातून किती वेळा करता ते पाहा. पांढरे कपडे वेगळे करा.  जीन्स, चादरी असे एकत्र करुन धुवा म्हणजे एनर्जी वाया जाणार नाही. 
  3. जर तुमचे घर हायटेक असेल सगळ्याच गोष्टी वीजेवर अवलंबून असतील तर अशावेळी बील येणे साहजिक आहे. पण यामध्येही काही  बचतीचा पर्याय हा नक्कीच असेल तो देखील तुम्ही तपासणे गरजेचे आहे. 
  4. घरात काही उपकरणे खराब झाली असतील आणि तुम्ही तशीच वापरत असाल तरी देखील जास्त इलेक्ट्रिसिटी वाया जाऊ शकते. त्यामुळे त्याची दुरुस्ती करा. 
  5. वापर नसल्यास लाईट, मशीन्स बंद करा. ही सवय लावून घ्या मगच तुमचे वीज बील कमी येईल. 

आता या काही गोष्टी नक्कीच लक्षात घ्या म्हणजे लाईटचे बील कमी होण्यास मदत मिळेल. 

20 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT