ADVERTISEMENT
home / Make Up Products
मेकअपमध्ये हायलायटर लावते चार चाँद, अशी करा निवड

मेकअपमध्ये हायलायटर लावते चार चाँद, अशी करा निवड

काही जणांनी केलेले मेकअप पाहिल्यानंतर त्यांचा मेकअप इतका परफेक्ट आणि फ्लॉलेस कसा दिसतो असा अनेकांना प्रश्न पडतो. मेकअप करण्याची आवड असेल आणि तुम्हालाही तसाच परफेक्ट लुक हवा असेल तर मेकअप प्रोडक्टमधील विशेष प्रोडक्ट तुम्ही घ्यायलाच हवे असे असतात. आता हायलायटरच घ्या ना! तुम्ही कसाही मेकअप करा त्यावर फक्त हायलायटरचा एक ब्रश फिरवा तुमच्या लुकमध्ये बराच फरक पडतो.हायलायटरमुळे मेकअपमध्ये किती फरक पडतो हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही हायलायटर घेण्याचा विचार करत असाल तर त्याच्या शेड्सनुसार त्याची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. जाणून घेऊया हायलायटरची निवड करण्यासाठीचे काही निकष

मेकअप किटमधील concealer चा असा करतात उपयोग

 

हायलायटर म्हणजे काय? (what is highlighter in makeup)

हायलायटर म्हणजे काय?

Instagram

ADVERTISEMENT

मेकअपमधील हायलायटर हा असा प्रकार आहे जो बऱ्याच पद्धतीने वापरता येतो. हायलायटरचे काम नावाप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावरील जमेची बाजू असलेले पाँईट्स हायलाईट करणे. उदा. नाक, कपाळ, हनुवटी, गाल इ. हायलायटर कॉन्टोरींगसारखे महत्वाचे काम देखील करते.त्यामुळेच तुमच्या चेहऱ्याला एक विशिष्ट आकार देता येतो. शिवाय ‘चमकणे’ हे याचे काम असल्यामुळे शरीराच्या इतर भागांनाही तुम्ही हे लावू शकता. त्यामुळे तुमची त्वचा चमकते. 

तुमच्या मेकअप किट मध्ये हे ‘5’ मेकअप ब्रश आहेत का

हायलायटरची निवड करताना

हायलायटरची निवड करताना

Instagram

ADVERTISEMENT

हायलायटर म्हणजे काय ? हे जाणून घेतल्यानंतर आता वळूया हायलायटरच्या निवडीकडे. हायलायटरच्या निवडीचे हे आहेत काही निकष 

  • कोणत्याही फाऊंडेशप्रमाणे हायलायटरमध्ये अनेक वेगळे शेड मिळतात. हे सगळेच शेड तुमच्या स्किनटोनला साजेशे असतील असे सांगता येत नाही. त्यामुळे स्किनटोनप्रमाणे हायलायटरची निवड करताना तुमच्या स्किनटोनच्या एक ते दोन शेड लाईट रंगाची शेड निवडणे उत्तम ठरते. 
  • तुम्हाला एखादा हायलायटर आवडला ज्याचा शेड फार गडद आहे. असे हायलायटर तुम्हाला चालू शकत नाही. कारण मेकअप आणि हायलायटरचा उद्देश तुमची त्वचा चमकवणे असा असतो ती काळवंडणे असा अजिबात नाही. ज्यावेली तुम्ही गडद रंगाचे हायलायटर घेता त्यावेळी तुमचा चेहरा काळवंडलेला दिसू लागतो. त्यामुळे फार गडद हायलायटर घेणे टाळा. 
  • तुम्ही हायलायटर कोणत्या जागेवर लावणार आहात या नुसारही तुम्हाला तुमची शेड निवडणे गरजेचे असते. समजा तुम्हाला संपूर्ण शरीराला म्हणजे पाय, हात, खांदा, मान या जागी लावण्यासाटी हायलायटर निवडत असाल तर एखादे ग्लिटर किंवा शाईन असणारे हायलायटर निवडू शकता. 
  • हायलायटर हे चमकवण्याचे काम करत असले तरी देखील तुम्हाला असे हायलायटर निवडायचे नाही ज्यामुळे तुम्ही एखाद्या डिस्को बॉलप्रमाणे चमकाल आणि लोकांचे लक्ष तुमच्या चेहऱ्याकडे नाही तर सतत हायलाईट केलेल्या भागांकडे जाईल. त्यामुळे चेहऱ्याला शोभेल आणि नॅचरल लुक देईल असे हायलायटर निवडा. 
  • रोजच्या वापरासाठी हल्ली अनेक जण नुसत्या हायलायटरचा प्रयोग करतात. अशावेळी तुम्ही थोडा  लाईट चेहऱ्याला नॅचरल लुक देईल असे हायलायटर निवडा. तर पार्टी, लग्न समारंभ अशाप्रसंगासाठी थोडे ग्लिटरी हायलायटर निवडा. जे तुम्हाला शोभून दिसेल. 

आता हायलायटर खरेदी करणार असाल तर या गोष्टींचा अगदी हमखास विचार करा आणि मगच हायलायटर घ्या. 

या चुका करतात तुमच्या डोळ्यांचा मेकअप खराब

जर तुम्ही उत्तम हायलायटरच्या शोधात असाल तर माय ग्लॅमचे हे प्रोडक्ट तुमच्यासाठी असेल सर्वोत्तम निवड

ADVERTISEMENT
07 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT