ADVERTISEMENT
home / आरोग्य
how-to-take-care-of-heart-patients-in-summer-in-marathi

उन्हाळ्यात हृदयरोगींनी कशी काळजी घ्यावी

उन्हाळ्यातील उष्णतेमुळे आपल्या शरीराच्या तापमानातही वाढ होते आणि त्यामुळे शारीरिक तापमान थंड ठेवण्यासाठी हृदयाला कठोर परिश्रम करावे लागतात.  हृदयविकाराच्या समस्या असलेल्यांनी उन्हाळ्यात पुरेशी खबरदारी न घेतल्यास हृदयविकाराचा झटका (Heart Attack) किंवा पक्षाघाताचा झटका येऊ शकतो. हृदयविकार असलेल्या व्यक्तीला या उकाडयाच्या दिवसांत काही महत्त्वाच्या आरोग्यदायी टिप्सबद्दल या लेखाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न. डॉ बिपीनचंद्र भामरे, मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन यांच्याशी आम्ही बातचीत केली. 

हृदयरोग म्हणजे कोणतीही अवरोधित किंवा संकुचित रक्तवाहिनी ज्यामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा एंजिना देखील होऊ शकते. तसेच, हृदयाच्या स्नायूंवर किंवा वॉल्व्हवर परिणाम करणाऱ्या परिस्थितींना हृदयरोग म्हणता येईल. हृदयरोग आणि उन्हाळ्यातील उष्णता हे एकत्रितपणे धोकादायक आहे. 

उष्ण हवामानाचा हृदयावर कसा परिणाम होतो?

Heart Attack

जेव्हा तापमान वाढते तेव्हा शरीर वेगळ्या पद्धतीने कार्य करते. शरीराचे तापमान नियंत्रित ( ठेवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त जलद पंप करावे लागते. शरीराला नीट थंडावा न दिल्यास उष्माघाताचा झटका येऊ शकतो. हृदयाला अधिक कष्ट करावे लागतील, ज्यांना हृदयविकाराच्या आधीपासून समस्या आहेत त्यांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा प्रचंड धोका असतो. खराब झालेले किंवा कमकुवत हृदय असलेल्या लोकांमध्ये उष्माघात, निर्जलीकरण, अतालता, एंजिना आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते, जी काही प्रकरणांमध्ये जीवघेणी असू शकते.

जाणून घ्या उन्हाळ्यात हृदयाची काळजी घेण्यासाठी विविध उपाय

व्यायामाचा अतिरेक नको (Over Exercise) – उन्हाळ्यात, शरीराचे तापमान जास्त असते आणि एखाद्याचे हृदय अधिक काम करते. कोणतीही कष्टदायक शारीरीक क्रिया करणार्‍याच्या -हदयाला रक्त जलद पंप करावे लागेल. विशेषत: सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान गरम हवामान टाळून घरामध्ये व्यायाम करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. 

ADVERTISEMENT

पुरेसे पाणी प्या (Drink Enough Water) – पाणी हे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते. हे शरीराला हायड्रेट ठेवते आणि त्यामुळे आपले शरीर सर्व कार्ये सहजतेने करू शकतात. पुरेसे पाणी प्यायल्याने हृदयाचे ठोके नियंत्रित राहतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

कॅफीन आणि अल्कोहोलचे सेवन टाळा (Don’t take Caffeine and Alcohol) – कॅफीन आणि अल्कोहोलमुळे निर्जलीकरण होते. हृदयविकार असलेल्यांसाठी निर्जलीकरण हे अत्यंत धोकादायक आहे. उन्हाळ्यात, एखाद्या व्यक्तीच्या शरीराला नियंत्रित तापमानात राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, म्हणून कॉफी, चहा किंवा अल्कोहोल टाळा जे तुम्हाला निर्जलीकरण करतात. तुम्ही ज्यूस, नारळ पाणी किंवा ताक देखील निवडू शकता. ज्यांनी अँजिओप्लास्टी केली आहे किंवा स्टेंट आणि कृत्रिम हृदयाच्या झडपा आहेत त्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे कारण निर्जलीकरणामुळे रक्त घट्ट होऊ शकते, ज्यामुळे स्टेंट ब्लॉक होऊ शकतो.

संतुलित आहार घ्या (Balanced Diet) – आहारात सर्व आवश्यक पोषक तत्वांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. ताजी फळे, भाज्या, तृणधान्य, कडधान्ये, मसूर आणि शेंगा खा. जंक फूड, मसालेदार, तेलकट, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर रहा.

डॉक्टरांच्या संपर्कात राहा (Always Take Doctor’s Advice) – कोरोनरी हृदयरोग असलेल्या रुग्णांना उन्हाळ्यात हृदयावर दाब पडल्यामुळे हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो आणि त्यांना ऑक्सिजनची गरज भासू शकते. या लोकांना अॅट्रियल फायब्रिलेशन आणि कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचाही धोका असतो. त्यामुळे हृदयविकार असलेल्यांनी निरोगी राहावे आणि तापमान वाढल्यावर आवश्यक ती खबरदारी घ्या. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

18 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT