खणाची साडी नेसायला सगळ्यांनाच आवडते. हल्ली खणाच्या साड्यांचे इतके प्रकार मिळतात की, त्या साड्या घेऊन नक्की ट्राय कराव्यात असे सगळ्यांना वाटते. तुम्हालाही खणाच्या साड्या किंवा खणाच्या कपड्यांपासून तयार केलेले कपडे आवडत असतील तर त्या कपड्यांची काळजी कशी घ्यायची हे देखील तुम्हाला माहीत असायला हवे. कारण खणाची साडी घेतल्यानंतर त्याचे दोेरे निघण्याची शक्यता जास्त असते. कधी दागिन्यांना अडकून त्याचा एक दोरा निघाला तरी देखील त्याचा लुक खराब होतो. शिवाय हे असे कपडे सतत धुवूनही त्याचा रंग जातो. खणाची ओळख हा त्याचा रंग आणि त्याचे टेक्श्चर असते. त्यामुळे खणांच्या साड्यांची काळजी कशी घ्यायला हवी ते जाणून घेऊया.
कपड्याला लावा नेट
जर खणाची साडी खूपच महागातील असेल तर तुम्ही त्या साड्यांना शक्य असेल तर जाळी लावा. जाळी लावल्यामुळे दोरे हे पटकन निघत नाही. त्यामुळे शक्य असेल तर साड्यांचा फॉल असलेल्या भागामध्ये नेट लावा. त्यामुळे साड्या या अधिक टिकतात. खूप जण जरी असलेल्या किंवा भरलेल्या साड्यांना देखील नेट लावतात. त्यामुळे तुम्हालाही असे करायचे असेल तर त्याला नेट लावून घ्या. त्यामुळे आतल्या बाजूने तुम्हाला दोरे ओढले जाण्याची शक्यता कमी होते.
ब्लाऊजला लावा अस्तर
ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला अधिक काळजी घ्यायला हवी. कारण ब्लाऊज हा शरीराच्या खूप जवळ असतो. ब्लाऊजमध्ये दोरे ओढण्याची शक्यता जरी असली तरी देखील काखेत घाम आल्यामुळे रंग जाण्याची शक्यता देखील अधिक असते. त्यामुळे तुम्ही ब्लाऊज शिवायला देत असाल तर त्याला अस्तर लावायला विसरु नका. त्यामुळे काखेत तो रंग जात नाही. ब्लाऊज पीस घेताना तो चांगल्या क्वालिटीचा आहे का नाही ते बघून घ्या. कारण चांगल्या क्वालिटीचा खण असा पटकन खराब होत नाही.
खणाची साडी ठेवा नीट
खणाची साडी ही जरा जपूनच ठेवायला लागते. त्यावरील दोऱ्याचे काम खराब झाले की, त्याची डिझाईन खराब होऊ लागते. त्यामुळे खणाची साडी वापरुन झाली की, ती छान झटकून हवे खाली वाळवून मग ठेवा. एकाच वापरात ही साडी धुवायला देऊ नका. कारण त्यामुळे त्याचा रंग जाण्याची शक्यता ही खूप जास्त असते. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. तुम्ही ज्या ठिकाणी साडी ठेवत आहात तिथे दोरा ओढला जाणार नाही याची काळजी देखील घ्यायला विसरु नका.
मुंडावळ्या आणि त्यातील विविध प्रकार | Mundavalya Designs In Marathi