ADVERTISEMENT
home / Uncategorized
काखेत येणारी पुळी

काखेतील पुळी किंवा संसर्ग टळण्यासाठी अशी घ्या काळजी

खूप जणांना काही ना काही कारणास्तव अंगावर मोठे मोठे फोड येण्याचा त्रास होतो.

विशेषत:खूप जणांना केसतोडीमुळे पुळी किंवा संसर्ग होण्याचा त्रास होतो. केसतोड किंवा केस परतण्याचा त्रास होण्यामागे अगदी क्षुल्लक कारणामुळे होऊ शकतो. काखेत असलेली अस्वच्छता आणि त्याच दरम्यान जर तुम्हाला कपडा घासला गेला असेल तरी देखील तुम्हाला काथेत पुळीचा येऊ शकते आणि त्याचा संर्ग होऊन तुम्हाला त्रासही होऊ शकतो. तुम्हालाही काखेत पुळी येण्याचा वरचेवर त्रास होत असेल तर तुम्हाला काही काळजी घेणे देखील गरजेचे असते. जाणून घेऊया काखेत पुळी आल्यावर तुम्ही नेमकं काय करायला हवं ते

स्वच्छता राखा

सौजन्य: Instagram

बरेचदा अस्वच्छता हे एक कारण असते ज्यामुळे काखेत पुळी येऊ शकते. जर तुम्ही आंघोळ करताना तुमच्या काखेत पाणी तसंच राहात असेल तर त्याठिकाणी बुरशी यायला सुरुवात होते. ओलावा आणि घाम यामुळे काखेत असणाऱ्या पोअर्समध्ये सतत घाण जाते. या ठिकाणी अस्वच्छता अशीच राहिली तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पुळी येऊ शकते. ही पुळी लहान नाही तर त्यामध्ये पस साचेल इतका पू तयार होऊन आकार मोठा होता. त्यामुळे हाताची हालचाल करण्यास अडथळा निर्माण होतो. तुम्हाला पुळी आी असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही रोज याची स्वच्छता राखायला शिका. तुम्हाला नक्की त्यामुळे त्रास होणार नाही.

दातांच्या स्वच्छतेसाठी वापरत असलेला टुथब्रश योग्यवेळी बदला, नाहीतर…

ADVERTISEMENT

औषधोपचार करा

पुळी आल्यानंतर ती फुटेपर्यंत आराम मिळत नाही. या पुळीला फोडण्याचे तंत्र डॉक्टरांना योग्यपद्धतीने माहीत असते.  त्यामुळे जर ही पुळी फुगली असेल आणि तिला तोंड आले असेल तर डॉक्टरांकडे जाऊन ती योग्य पद्धतीने फोडून घ्या. त्यामुळे तुमच्या काखेत डाग पडणार नाही. पुळी फोडल्यानंतर त्यावर जंतुनाशक लावण्याचे काम देखील डॉक्टर करतात. त्यामुळे यावर औषधोपचार करणे नेहमीच चांगले.

पुळी फोडू नका

तुम्हाला कितीही पुळी फोडायची इच्छा झाली असेल तरी देखील ती पूर्णपणे पिकल्याशिवाय पुळी फोडू नका. कारण प्रीमॅच्युअर पुळी फोडली तर त्याचा त्रास आणखी होऊ शकतो. हा संसर्ग आजुबाजूला पसरण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे काहीही झाले तरी थोडे दिवस त्रास सहन करा पण ती फोडायला अजिबात जाऊ नका. थोडा धीर ठेवा. त्यावर वेगवेगळे प्रयोग करु नका.

सतत पिऊ नका काढे होतात हे दुष्परिणाम

आवश्यक असल्यास ड्रेसिंग करा

ADVERTISEMENT

 जर पुळीचे दुखणे खूपच वाढले असेल आणि तुम्ही ती जाऊन फोडून घेतली असेल तर ती जखम तशीच उघडू पडू देऊ नका. कारण ती तशीच उघडी राहिली की जखमेत घाण शिरण्याची शक्यता असते. शिवाय  त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यताही असते. पुळीतून सगळा पस काढण्यासाठी ती बरेचदा मोठी केली जाते. त्यामुळे ती जागा खूप मोकळ होते. म्हणूनच त्यावर ड्रेसिंग करणे हे नेहमीच चांगले असते. 

काखेत पुळी येण्याचा त्रास तुम्हालाही होत असेल तर तुम्ही अशी काळजी घ्या.

डोळ्यांमुळे दिसत असेल वाढलेले वय तर आहेत ही कारणे

29 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT