आपल्या सर्वांनाच साड्या खूप आवडतात. मग तुम्ही सोळा वर्षाची तरूणी असा अथवा साठीतील आजी. कारण प्रत्येक स्त्रीसाठी साडी अथवा साडीप्रमाणे दिसणाऱ्या लांबसडक ओढण्या या नेहमीच आवडीचा विषय असतात. साडी ही एक पंरपरा असून ती गेल्या अनेक वर्षांपासून पुढच्या पिढीला वारसारूपाने मिळत आलेली आहे. ज्यांना प्युअर सिल्क अथवा प्युअर कॉटन साड्यांची आवड असते त्यांच्याकडे इकत कापडातील काही खास साड्या आणि ओढण्या ह्या नक्कीच असतात. इकत हा हाताने विणलेला म्हणजेच हॅंडलूम कापडाचा एक प्रकार आहे. पण या कापडाची खासियत ही की हे फक्त हातमागावर विणलेलेच असतं असं नाही तर त्या कापडातील रंग देखील हाताने तयार केलेले असतात. कापड विणण्याआधी त्या कापडाचे सूत म्हणजेच धागा रंगवला जातो. असे निरनिराळ्या रंगाचे कॉम्बिनेशन वापरत मग इकत कापड हातमागावर विणले जाते. यात रंगानुसार सिंगल इकत आणि डबल इकत असे प्रकार विणले जातात. डबल इकत सिंगल इकतपेक्षा महाग असते. इकत पॅटर्न मध्ये प्युअर सिल्क आणि प्युअर कॉटन असे दोन प्रकार जास्त प्रसिद्ध आहेत. काही जण या पॅटर्नला पटोला पॅटर्न असंही म्हणतात. या कापडाचे धागे सिल्कचे असोत वा कॉटनचे ते पारंपरिक पद्धतीने तेलात बूडवूनच त्याचे रंग पक्के केले जातात. आता आधूनिक तंत्रज्ञानामुळे यात आर्टिफिशिअल सिल्कचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र ज्यांना साड्यांची पारख आहे आणि सूतामधलं ज्ञान आहे त्या महिला नेहमी प्युअर सिल्क, कॉटन अथवा कॉटन सिल्कमधलंच इकत कापड, साड्या, ओढण्या विकत घेतात. असं आपलं हे खास इकत कलेक्शन वर्षांनूवर्ष टिकवून ठेवायचं असेल तर या काही टिप्स नक्कीच फॉलो करा.
इकत सिल्कच्या साड्या ओढण्यांची काळजी घेण्यासाठी टिप्स –
- इकत सिल्कच्या साड्या कधीच हाताने अथवा मशिनमध्ये धुवू नका. त्या नेहमी ड्रायक्लिनलाच द्या कारण या साड्यांमध्ये विविध रंगाचे सूत वापरलेले असते. पाण्यामुळे ते रंग एकमेकांमध्ये मिसळून तुमची साडी अथवा ओढणी खराब होऊ शकते.
- जर तुमच्या साडीवर एखादा डाग पडला तर तो लगेच थोडे थंड पाणी हातावर घेऊन स्वच्छ करा आणि पाणी सुकल्यावर साडी ड्रायक्लिनला द्या.
- इकत सिल्कची साडी अथवा ओढणी उन्हात वाळत घालू नका.
- इकत सिल्कचे कापड इस्त्री करताना ती जास्त तापमानावर गरम करू नका. इस्त्रीवर यासाठी सिल्कचे फंक्शन देण्यात आलेले असते.
- कोरड्या जागी आणि पांढऱ्या शुभ्र मलमलच्या कापडात या साड्या अथवा ओढण्या गुंडाळून ठेवा.
- इकत साड्या प्लास्टिक कव्हर अथवा कपाटात अडकवून ठेवणे टाळा.
- सिल्कच्या साड्यांवर तेलाचे डाग लागले तर त्यावर आपली टाल्कम पावडर लावा. पावडरने तेल शोषून घेतल्यावर ती रब करून काढून टाका आणि मग साडी ड्रायक्लिनला द्या.
- भाजी अथवा आमटीसारखे डाग काढण्यासाठी टुथपेस्ट लावा आणि सुकल्यावर काढून मग साडी ड्रायक्लिनला द्या.
- जर सिल्कची साडी अथवा ओढणीवर तुमच्या लिपस्टिकचा डाग लागला तर तो काढण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा.
इकत कॉटन साड्या आणि ओढण्यांची काळजी घेण्यासाठी टिप्स –
- डबल इकत कॉटन साडी अथवा ओढणी एकतर फार धुवू नयेत कारण धुतल्यानंतर त्यांचे रंग फिक्के पडतात.
- बऱ्याचदा वापरल्यानंतर त्या मीठाच्या पाण्यात वीस मिनिटे भिजवून मगच साध्या पाण्याने आणि सौम्य साबणाने धुवाव्या. कारण मीठाच्या पाण्यात बुडवल्यामुळे त्यांचा रंग जात नाही.
- इक्कत ड्रेस मटेरिअल शिवायला देण्यापूर्वी ते मीठाच्या पाण्यात बुडवून सुकवावे आणि मग शिवायला द्यावे. असं केल्याने त्याचा रंग पक्का होतो आणि ते आटल्यामुळे तुम्हाला मापाचा योग्य अंदाज येतो.
- कॉटन इक्कत मटेरिअल थेड ड्रायक्लिनिंगला देऊ नये कारण त्यामुळे ते लवकर फिक्के पडू शकतात.
- इक्कतचे कापड नेहमी कोरड्या जागी ठेवावे कारण हवामानातील ओलसरपणामुळे त्यातील रंग एकमेकांना लागण्याची शक्यता असते.
इकतची साडी अथवा ड्रेस घातल्यावर स्टायलिश दिसण्यासाठी मायग्लॅमचे मेकअप प्रॉडक्ट नक्की वापरा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
तुम्हालाही नक्कीच आवडेल अंकिता लोखंडेचं हे साडी कलेक्शन
‘रंग माझा वेगळा’ मधील सासू हर्षदा खानविलकरची हटके साडी स्टाईल