ADVERTISEMENT
home / फॅशन
स्किनी पॅंटने अशी करा हटके स्टाईल (How To Wear Skinny Pants In Marathi)

स्किनी पॅंटने अशी करा हटके स्टाईल (How To Wear Skinny Pants In Marathi)

फॅशनचे ट्रेंड नेहमीच बदलत असतात. सतत सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी प्रत्येकजण या ट्रेंडप्रमाणे फॅशनेबल राहण्याचा प्रयत्न करत असतो. कधी पंजाबी सूट तर कधी साडी, कधी स्कर्ट कर कधी  जीन्स असे विविध प्रकार आपण ट्राय करतो. बॉडी हगिंग कपड्यांमुळे तुमचा बॉडी शेप अधिक चांगला दिसतो. ज्यामुळे सध्या स्किनी पॅंटची फॅशन ट्रेंडमध्ये आहे. आजकाल एखादी अभिनेत्री असो वा कॉलेजला जाणारी तरूणी प्रत्येकीला स्किनी पॅंटची स्टाईल करायला नक्कीच आवडते. यासाठी आज आपण स्किनी पॅंटने कसं फॅशनेबल दिसता येईल हे जाणून घेणार आहोत. 

instagram

ADVERTISEMENT

स्किनी पॅंट म्हणजे काय (What Is Skinny Pants In Marathi)

प्रत्येक व्यक्तीचा बॉडी शेप हा निराळा असतो. ज्यामुळे प्रत्येक ड्रेसमध्ये तुमचा लुक निराळा दिसत असतो. शरीराचा बेढपपणा कमी करण्यासाठी तुम्हाला अंगाला चिकटणारे कपडे फायद्याचे ठरतात. ज्यामुळे तुमचा बॉडीशेप चांगला दिसतो आणि तुम्ही स्लीमदेखील दिसता. स्किनी पॅंट हा फॅशनचा असाच एक प्रकार आहे. स्किनी पॅंट तुमच्या बॉडीशेपनूसार दिसत असल्यामुळे त्यात तुम्ही अगदी सुडौल आणि सुंदर दिसू शकता. या पॅंट तुमच्या मांड्या आणि पायावर अगदी घट्ट बसतात. ज्यामुळे तुम्ही मुळीच लठ्ठ दिसत नाही. शिवाय या पॅंटचे कापड अती जाड नसल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रासही होत नाही.

Also Read How To Choose Straight Fit Pants In Marathi

स्किनी पॅंटचे विविध प्रकार (Types Of Skinny Pants)

तुमच्या बॉडीटाईपनूसार तुम्ही तुमच्या आवडीची आणि सोयीची स्किनी पॅंट ट्राय करू शकता. स्किनी पॅंट तीन प्रकारात मार्केटमध्ये उपलब्ध असतात. तुम्ही त्यावर काय परिधान करणार आहात यावर तुमचा लुक कसा दिसेल हे ठरू शकतं. लेगिंग, जेगिंग आणि ट्रेंगिगची फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आहे. 

1. लेगिंग्ज (Leggings)

आजकाल बाजारात तुम्हाला विविध प्रकारचे लेगिंग विकत मिळतात. पूर्वी कुर्तीवर सलवार, पायजमा, धोती असे प्रकार घातले जायचे. मात्र आजकाल कुर्तीवर तिच्यावर मॅंचिंग लेगिंग वापरले जातात. शर्ट, टी-शर्टवरदेखील लेंगिग घालण्याची  फॅशन आहे. बाजारात स्टॅंडर्ड मापाचे आणि विविध रंगछटांचे लेगिंग्ज मिळतात. ज्यामुळे तुमच्या कोणत्याही कुर्ती अथवा टी-शर्टवर रेडीमेड लेगिंग तुम्ही कॅरी करू शकता. लेगिंग घालणं आणि विकत घेणं फारच सोयीचं असतं. अतिशय कमी किंमतीत तुम्हाला विविध शेड्सच्या लेगिंग्ज कुठेही मिळू शकतात. आजकाल अनेक ब्रॅंडच्या लेगिंग्ज बाजारात उपलब्ध आहेत. एकाच रंगातील विविध शेडस् तुम्हाला लेगिंग्जमध्ये मिळू शकतात. 

ADVERTISEMENT

2. जेगिंग्ज (Jeggings)

लेगिंग्ज आणि जीन्स यांचं कॉम्बिनेशन म्हणजे जेगिंग्ज.जेगिंग्ज अतिशय आरामदायक असल्यामुळे वापरण्यासाठी अतिशय सोयीच्या असतात. शिवाय दररोज जीन्स घालणं कंटाळवाणं वाटू शकतं. कारण जीन्स बराच काळ घातल्यामुळे पायांना आणि शरीराच्या खालील भागात हवा खेळती राहत नाही. ज्याचा परिणाम तुम्हाला स्कीन इनफेक्शन होऊ शकतो. जेगिंग्ज घातल्यामुळे तुम्हाला जीन्स घातल्याचा फीलही येतो आणि त्रासही कमी होतो. जीन्ससारख्या असूनही जेगिंग्ज अतिशय आरामदायक असतात.यात विविध प्रकार बाजारात उपलब्ध असून त्या फार महाग मुळीच नसतात. 

वाचा – श्रगचे विविध प्रकार

3. ट्रेगिंग्ज (Treggings)

आजकाल लेगिंग्ज आणि जेगिंग्जसोबत ट्रेंगिंग्जची फॅशनही इन आहे. ट्रेंगिग्ज म्हणजे ट्राऊजर पॅंटचा एक नवा प्रकार. मात्र यामध्ये वापरण्यात आलेलं कापड हे स्ट्रेची असतं. ज्यामुळे त्या तुमच्या बॉडीशेपनूसार फिट बसतात. या पॅंटला बटण, झीप असे कोणतेही प्रकार नसल्यामुळे ते घालणं तुमच्या सोयीचं ठरतं. शिवाय स्ट्रेची मटेरिअलमुळे तुम्हाला त्यांना कडक इस्त्री करण्याचीदेखील गरज नाही. आजकाल ऑफिसमध्ये  ट्रेंगिंग्ज मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. 

स्किनी पॅंट मुलींना का आवडतात (Why Girls Love Skinny Pants)

प्रत्येक स्त्रीचा बॉडीशेप वेगवेगळा असतो. रेग्युलर बॉडी टाईप, पिअर बॉडी शेप, अॅपल बॉडी शेप, ग्लास बॉडी शेप अशा विविध शेपमध्ये बॉडी शेप असतात. तुम्ही जर स्किनी पॅंट वापरलं तर तुमचा बॉडी शेप चांगला दिसू शकतो. मांड्या आणि नितंबाचा आकार शेपमध्ये दिसावा यासाठी तुम्ही स्किनी पॅंट नक्कीच वापरू शकता. प्रत्येकीला आपण स्लीम आणि सुंदर दिसावं असं नक्कीच वाटत असतं. जर तुम्ही काहीही न करता स्किनी पॅंटमुळे सुडौल दिसत असाल तर तुम्हाला या प्रकारच्या पॅंट घालणं नक्कीच आवडू शकतो. 

ADVERTISEMENT

वाचा – अशाप्रकारे करता येईल बूटांची स्टाईल

स्किनी पॅंटची फॅशन कशी कराल (Skinny Pants Fashion)

स्किनी पॅंट तुम्ही विविध प्रकारे स्टाईल करू शकता. आरामदायक आणि तुम्हाला आवडेल असा लुक तुम्ही कॅरी करू शकता. स्किन पॅंटसोबत विविध लुक करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही भन्नाट आयडीया देत आहोत. ज्यामुळे तुम्हाला एक परफेक्ट लुक नक्कीच मिळेल. 

लॉंग टी-शर्टसोबत (With Long T-Shirt)

एखाद्या ओव्हरसाईज अथवा लॉंग टी- शर्टसोबत तुम्ही स्किनी पॅंट कॅरी करू शकता. जर तुम्हाला बॉयफ्रेन्ड टी-शर्ट घालायचा असेल तर स्किनी पॅंट बेस्ट पर्याय आहे. कोणतीही अॅक्सेसरीज न घालता एखाद्या ब्लॅक लेगिंग्ज, डेनिम कलरचा जेगिंग्जसोबत तुम्ही कोणतेही टी-शर्ट घालू शकता. केसांमध्ये एखादा छानसा मेसी बन घाला आणि कॅन्हवासचे शूज घाला. तुमचा लुक अगदी मस्त आणि कुल होईल. 

ADVERTISEMENT

instagram

बटन डाऊन शर्टसोबत (Button Down Shirt)

ऑफिसमध्ये आजकाल ट्रेगिंग्ज पॅंट्स मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. एखाद्या बटन डाऊन शर्ट सोबत स्किनी पॅंट तुमचा लुक परफेक्ट करेल. मात्र या लुकसोबत पम्स, हाय हिल्स, कानात रिंग, नेकचेन आणि एखादे डायमंड स्टड्स, हातात घड्याळ जरूर घाला. 

वाचा – स्वेटरचे प्रकार

ADVERTISEMENT

instagram

टर्टलनेक टी – शर्टसोबत (Turtle Neck T-Shirt)

हिवाळ्यात टर्टलनेक टी-शर्टचा ट्रेंड असतो. अशा ट्रेंडी टी- शर्टसोबत स्किनी पॅट घातल्यास तुमचा लुक अगदी हटके आणि मस्त दिसेल. बाहेरगावी अथवा परदेशी फिरायला जाताना अथवा थंड हवेच्या ठिकाणी जाताना हा लुक तुम्ही नक्कीच करू शकता. एखाद्या ब्लॅक स्किनी पॅंटसोबत तुम्ही  जर एखादं कलरफुल टर्टलनेक टी – शर्ट घाला आणि परफेक्ट दिसा. कानात एखादं मोत्याचं स्टड आणि लेदर जॅकेटमुळे तुम्ही आणखी सुंदर दिसाल.

instagram

ADVERTISEMENT

एखाद्या व्हाईट शर्टसोबत (With White Shirt)

काही लोकांना व्हाईट शर्ट फार आवडतात. ऑफिस मिटींग अथवा सेमिनारला जाताना तुमचा हा लुक अगदी परफेक्ट दिसू शकतो. ब्लॅक स्किनी पॅंटवर व्हाईट कलरचं शर्ट, पायात हाय हिल्स, एखादं मॅचिंग ब्लेझर, कानात मोत्याचे स्टड, हातात घड्याळ तुमचा ऑफिस लुक पूर्ण करेल.  

instagram

श्रगसोबत (Shrugs)

स्किनी पॅंट फारच घट्ट असतात. ज्यामुळे त्यासोबत ओव्हरसाईज अपरवेअर नेहमीच चांगले आणि सुटसुटीत दिसतात. जर तुम्ही स्किनी पॅंटसोबत टॉप आणि श्रग घातलं तर तुमचा लुक इतरांपेक्षा वेगळा आणि हटके दिसू शकतो. गळ्यात एखादी लॉंग चेन आणि हातात ब्रेसलेट घाला आणि तुमचा हा लुक अगदी परफेक्ट होईल. केस मोकळे सोडा आणि पायात एखादं फ्लॅट फूडवेअर घाला. 

ADVERTISEMENT

वाचा – विंटर जॅकेट्सची अशी करा स्टाईल

instagram

ADVERTISEMENT

स्किनी पॅंट घालताना काय काळजी घ्याल (What To Wear With Skinny Pants)

स्किनी पॅंट घालून तुम्ही सुंदर दिसत असला तरी ही फॅशन करताना काही गोष्टींची तुम्हाला काळजी घेणं फार गरजेचं आहे. कारण छोट्याशा चुकांमुळे तुमचा लुक बिघडू देखील शकतो.

काय करा (What To Do)

स्किनी पॅटसोबत या टीप्स फॉलो करून तुम्ही अधिक आकर्षक दिसू  शकता. 

1.स्किनी  पॅंटच्या आतमध्ये नेहमी स्लीम पॅंटी कॅरी करा. कारण जर तुम्ही यामध्ये रेग्युलर पॅंटी घातली तर तुमचा लुक बिघडू शकतो. 

2.स्किनी पॅंट नेहमी हिवाळ्यातच कॅरी करा. कारण उन्हाळ्यात या पॅंटमुळे तुम्हाला गरम होईल आणि पावसाळ्यात जर तुम्ही भिजला तर सुकण्यासाठी बराच वेळ लागेल. ज्यामुळे तुम्हाला त्वचेचं इनफेक्शन होऊ शकतं. 

ADVERTISEMENT

3.डार्क रंगाच्या स्किनी पॅंटवर उठावदार अपर वेअर घाला. ज्यामुळे तुम्ही जास्त आकर्षक दिसाल.

4.तुम्हाला जर स्किनी पॅंटमध्ये आरामदायक वाटत असेल तरच ती कॅरी करा. कारण अंगाला चिकटणाऱ्या या पॅंटमुळे कदाचित तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं.

5.स्किनी पॅंटसोबत तुम्ही लेदर जॅकेट घातलं तर तुमचा लुक अगदी परफेक्ट आणि कूल दिसेल. 

काय करणे टाळा (Avoid Doing This)

स्किनी पॅंट कॅरी करताना जर या गोष्टी पाळल्या नाही तर कदाचित तुमचा लुक बिघडू शकतो. 

ADVERTISEMENT

1.अती एक्सेसरीज घालू नका. कारण असं केल्याने तुमचा लुक खराब दिसेल. अती दागिने तुमच्या स्लीम लुकला बिघडवू शकतो.

2.स्किनी पॅंटसोबत बेल्ट कॅरी करू नका. कारण आधीच या पॅंट स्किनी असतात. त्यात जर तुम्ही त्यावर बेल्ट घातला तर तुमचा लुक बिघडू शकतो. 

3. उन्हातून फिरताना स्किनी पॅंट घालू नका. कारण त्यामुळे तुम्हाला गरम होऊ शकतं.

4. जर तुम्हाला ब्लडप्रेशर अथवा श्वसनाचा त्रास असेल तर स्किनी पॅंट मुळीच ट्राय करू नका.

ADVERTISEMENT

5. स्किनी पॅंटसोबत काळजीपूर्वक अपरवेअर निवडा कारण त्यामुळे तुमचा  लुक चांगला दिसू शकतो अथवा बिघडू शकतो.   

स्किनी पॅंट बाबत मनात असलेले काही निवडक प्रश्न – FAQS

अॅपल शेप असलेल्या मुलींनी स्किनी पॅंटसोबत कोणती फॅशन करावी ?

जर तुमचा बॉडी शेप सफरचंदाच्या आकाराचा असेल तर तुम्ही स्किनी पॅंटसोबत एखादं लॉंग ब्लेझर अथवा लॉंग श्रग कॅरी करू शकता. ज्यामुळे तुमचा बॉडीशेप चांगल्या पद्धतीने कव्हर होईल.

स्किनी पॅंट कोणत्या ठिकाणी तुम्ही घालू शकता ?

आजकाल स्किनी पॅंटची खूपच फॅशन आहे. त्यामुळे तुम्ही कॉलेज, ऑफिस, फिरायला जाताना आणि शॉपिंगला जाताना स्किनी पॅंट घालू शकता.

ADVERTISEMENT

एखाद्या पार्टीसाठी स्किनी पॅंट कॅरी करता येऊ शकते का ?

नक्कीच, तुम्ही पार्टीसाठी मोनोक्रोम लुक करू शकता.  अपरवेअर आणि स्किनी पॅंट एकाच रंगाची घालून तुम्ही तुमचा एक वेगळा पार्टी लुक तयार करू शकता. यासाठी स्किनी पॅंटसोबत पेपलम, ट्यूनिक, ब्लाऊज अथवा क्रॉप टॉप कॅरी करा. 

 

30 Oct 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT