प्रत्येक ऋतूनुसार महिलांची फॅशन बदलत असते. हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण ऊबदार कपडे घालतो. हिवाळ्यात भरपूर कपडे घालावे लागत असल्याने जास्त फॅशनेबल कपडे वापरता येत नाहीत. पण खरंतर फक्त थोडासा बदल करून तुम्ही हिवाळ्यातदेखील खूप छान फॅशन कॅरी करू शकता. हिवाळ्यात फक्त उबदार टी-शर्ट अथवा अंगावर स्टोल पांघरण्यापेक्षा श्रग घालण्याची फॅशन सध्या इन आहे. सेलिब्रेटीजमध्येही श्रग वापरण्याची फार क्रेझ आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटी श्रगमध्ये दिसतात. या हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही देखील श्रग वापरू शकता.
खरंतर श्रग दिल्लीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. मात्र सध्या मुंबईतदेखील चांगली थंडी असल्याने मुंबईतही श्रग वापरणं ट्रेडमध्ये आहेत. श्रग तुम्ही एखाद्या जीन्स अथवा लॉंग स्कर्टसोबत घालू शकता. दिसायला अतिशय स्टायलिश आणि आकर्षक असणाऱ्या या श्रगमुळे तुमचे थंडीपासूनही संरक्षण होऊ शकते. बऱ्याचदा श्रग होजिअरी, लोकर, कॉटन अथवा नेट अशा कापडात तयार केलेले असतात. लॉंग आणि शॉर्ट अशा दोन्ही प्रकारामध्ये श्रग बाजारात उपलब्ध असतात. पण लॉंग श्रग मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. हिवाळ्यात लोकर आणि होजिअरी मटेरियलमधील श्रग वापरले जातात तर उन्हाळ्यात कॉटन आणि स्लीव्हलेस श्रग ट्रेंडमध्ये असतात. आम्ही सूचवलेल्या या स्टाईलिश पॅटर्नच्या आणि विविध रंगाच्या श्रगमध्ये तुमचा लुकही नक्कीच हटके दिसेल..
श्रगमध्ये विविध प्रकार असून ते विविध प्रकारे स्टाईल करता येतात. यासाठीच आधी विविध प्रकारचे श्रगचे प्रकार पाहुयात ज्यामुळे तुमचा लुक नक्कीच हटके दिसू शकेल.
शॉर्ट श्रगला क्रॉप श्रग असंही म्हणतात. हे श्रगचं एक मिनी व्हर्जन आहे असं आपण म्हणू शकतो. ते छोटे आणि क्यूट असतात ज्यामुळे तुम्ही ते वेगवेगळ्या टॉपसोपत स्टाईल करू शकता. कंबरेच्या वर असलेल्या उंचीमुळे तुमचा कटीभाग यामुळे शोभून दिसतो.
काही श्रग तुमच्या कंबरेपर्यंत उंचीचे असतात. जे तुम्ही तुमच्या एखाद्या जॅकेट अथवा स्वेटर प्रमाणे थंडीत कॅरी करू शकता. हे श्रग मल्टी स्टाईल कॅरी करण्यासाठी अगदी परफेक्ट असतात.
वाचा - स्वेटर आणि स्वेटशर्टचे प्रकार
गुडघ्यापर्यंत उंचीचे श्रग जास्त ट्रेंडमध्ये असतात. कारण ते एखाद्या टी-शर्ट अथवा वनपीससोबत स्टाईल करता येतात. अशा प्रकारच्या श्रगमुळे तुम्हाला वेस्टन आणि इंडीयन अशा दोन्ही प्रकारची स्टाईल कॅरी करता येऊ शकते.
बऱ्याचदा तुमच्या श्रगच्या बाह्या अथवा हातांच्या पॅटर्नवरून तुमचा लुक ठरत असतो. जर तुम्ही थंडीत लॉंग बाह्यांचे टीशर्ट घातलं असेल तर त्यावर शॉर्ट स्लीव्ज अथवा स्लीव्ज लेस श्रग अगदी परफेक्ट दिसू शकतं.
श्रगचा हा प्रकारही अतिशय सुंदर दिसतो. कारण तुम्ही तुमच्या स्लीव्ज लेस टॉप अथवा स्पेगेटी स्लीव्ज टॉपवर हा श्रग उत्तम रित्या कॅरी करू शकता. या श्रगमुळे तुमचा लुकही सुंदर दिसतो शिवाय तुमचे हिवाळ्यातील कडक थंडीपासून संरक्षणही होते.
पारंपरिक पंजाबी ड्रेस अथवा एथनिक कुर्तीवर असे पांरपरिक श्रग छान दिसतात. तुमच्या स्लीव्जलेज कुर्तीला ओव्हर क्लोदिंग करण्यासाठी हा एक बेस्ट पर्याय आहे. शिवाय यामुळे तुमचा लुक पटकन बदलतो.
वेस्टर्न श्रग तुम्ही तुमच्या जीन्स, शॉर्ट स्कर्ट अथवा कोणत्याही पाश्चात्य पेहरावासोबत कॅरी करू शकता. ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा नक्कीच हटके दिसता.
श्रग हा हिवाळ्यात स्टाईलिश दिसण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. शिवाय श्रग तुम्ही निरनिराळ्या प्रकारे स्टाईल करू शकता. मात्र काही पद्धतीने स्टाईल केल्यास तुमचा लुक अगदी परफेक्ट दिसू शकतो.
श्रग हा वेस्टर्न आणि इंडियन अशा दोन्ही पेहरावासोबत चांगला दिसतो. जीन्स आणि टी-शर्टसोबत शॉर्ट अथवा लॉंग श्रग कॅरी केल्यामुळे तुम्ही हटके तर दिसताच शिवाय तुमचा कंबर आणि कंबरेखालचा भाग कव्हरदेखील होतो. ज्यामुळे तुमचा बॉडीशेप उत्तम पद्धतीने झाकता येतो.
पारंपरिक पंजाबी ड्रेस, पलाझोसोबत श्रग अतिशय सुंदर दिसतो. निरनिराळ्या रंगाच्या टॉप्स, कुर्ती आणि बॉटमसोबत तुम्ही असे श्रग ट्राय करू शकता.
तुम्हाला शॉर्ट, स्कर्ट, जीन्स, प्लाझो आणि टॉप्स आवडत असतील तर त्यासोबत तुम्ही श्रग ट्राय करू शकता. त्यातही श्रग निरनिराळ्या लांबीचे असतात ज्यामुळे तुम्ही तुमचा एकाच टॉपसोबत वेगवेगळा लुक करू शकता.
हिवाळ्यात सगळीकडे थंडीचे वातावरण असते. ज्यामुळे या काळात तुम्ही श्रग घालून तुमचे संरक्षण करू शकता. शिवाय श्रगमुळे तुम्ही स्टायलिशही दिसता. यासाठीच श्रगचे हे विविध प्रकार तुम्हाला नक्कीच आवडतील.
जर तुम्ही प्लाझो घालता असेल तर त्यावर एखादा सुंदर टॉप आणि अशाप्रकारचा लॉंग श्रग तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. या लुकमधू तुमच्या लुकला मस्त एथनिक टच मिळू शकतो.
किंमत - 1124 रू
या ठिकाणी क्लीक करून तुम्ही हा श्रग विकत घेऊ शकता
काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या क्लासिक कलेक्शनमधील हा श्रग तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवा. कारण ट्रेंडी तर आहेच शिवाय यामुळे तुमचा लुकही हटके दिसेल, कोणत्याही पांढऱ्या रंगाच्या टी-शर्ट अथवा टॉपसोबत तुम्ही हा टॉप कॅरी करू शकता.
किंमत - 1699 रू.
या ठिकाणी क्लीक करून हा श्रग विकत घेऊ शकता.
एखाद्या शॉलप्रमाणे पांघरलेला हा श्रग तुमच्या लुकला अगदी परफेक्ट करेल. कारण त्यामुळे तुमचा लुक अतिशय क्लासिक दिसेल. एखाद्या क्रॉप टॉपसोबत आणि हाय वेस्ट जीन्ससोबत हा श्रग तुम्ही ट्राय करू शकता.
किंमत 4375 रू.
या ठिकाणी क्लीक करून तुम्ही हे श्रग विकत घेऊ शकता.
सध्या पार्टीचा सिझन सुरू आहे. अशा वेळी एखाद्या पार्टीसाठी हा श्रग अगदी परफेक्ट आहे. ग्रे रंगाच्या शिमर लुकचा हा श्रग तुम्ही एखाद्या पार्टीसाठी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.
किंमत - 1119 रू.
हे श्रग या ठिकाणी क्लीक करून तुम्ही विकत घेऊ शकता.
शॉर्ट श्रग जर तुमच्या वॉर्डरोब लिस्टमध्ये असेल तर हे नक्कीच ट्राय करा. निळ्या रंगाच्या या प्रिंटेड श्रग सोबत तुम्ही कोणतंही क्रॉप टॉप पेअर करू शकता. ज्यामुळे तुम्हाला परफेक्ट फ्युजन लुक करता येईल.
किंमत - 1099 रू.
या ठिकाणी क्लीक करून तुम्ही हे श्रग विकत घेऊ शकता.
आजकाल लॉंग श्रग खूप ट्रेंडमध्ये आहेत. अनेक बॉलीवूड सेलिब्रेटीजनां तुम्ही लॉंग श्रगमध्ये पाहिलं असेल. या पिंक कलरच्या श्रगमध्ये तुम्ही सुंदर तर दिसाल शिवाय याच्या बेल स्लीव्हज आणि फ्लेअर कॉलरमुळे तुम्ही आकर्षकही दिसाल. पिंक कलर अनेक मुलींच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.जर तुम्हालादेखील गुलाबी रंग आवडत असेल तर या गुलाबी थंडीत तुम्ही हे पिंक श्रग जरूर ट्राय करा.
किंमत - 999 रू.
तुम्ही हा पिंक श्रग या ठिकाणी खरेदी करू शकता.
वाचा - बूटांची स्टाईल करुन दिसा हटके.. तुम्ही ट्राय केलेत का हे प्रकार
जर तुम्ही वर्किंग वूमन असाल तर ऑफिसमध्ये तुम्हाला डिंसेट लुक असलेले कपडे परिधान करावे लागतात. हिवाळ्यात स्लीव्हलेस कपडे वापरता येत नाहीत.
हिवाळ्यात ऑफिसला जाताना क्लासिक लुकसाठी हे ब्ल्यू कलरचं श्रग तुम्हाला नक्कीच आवडेल. कोणत्याही वनपीस अथवा जीन्स - शर्टसोबत तुम्ही हा श्रग नक्कीच घालू शकता.
किंमत - 509 रू.
हा ब्ल्यू श्रग खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
ब्लॅक कलरच्या या श्रगमुळे तुम्हाला ऑफिसचा फॉर्मल लुक मिळू शकेल. शिवाय हे ब्लॅक श्रग कोणत्याही कलरच्या आणि कोणत्याही पॅर्टनच्या कपड्यांसोबत छान दिसेल. अतिशय साधं पण दिसायला स्टायलिश हे श्रग तुम्हाला एक हटके लुक देऊ शकतं. फॉर्मल लुकमुळे ऑफिस मिंटींगसाठी तुम्ही हे श्रग वापरू शकता.
किंमत- 1664 रू
हे श्रग तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.
सतत एकसारख्या लुकचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर हे जरा वेगळ्या स्टाईलचं आणि शर्टप्रमाणे दिसणारं श्रग जरुर ट्राय करा. एखाद्या गडद रंगाच्या कोणत्याही टी-शर्टवर हे साधं पण हटके लुकचं व्हाईट आणि ब्ल्यू कलरचं श्रग सुंदर दिसेल. या श्रगचं कापड कॉटन असल्याने तुम्हाला थंडीपासून संरक्षण तर मिळेलच शिवाय उन्हाळ्यातही तुम्ही ते घालू शकता. हिवाळ्यात यामुळे तुम्ही कुल दिसाल तर हिवाळ्यात यामुळे तुम्हाला आरामदायक वाटेल.
किंमत- 899 रू
हे श्रग तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.
राखाडी रंग कोणत्याही गडद रंगासोबत सहज मॅच होऊ शकतो. त्यामुळे हे श्रग तुम्ही कशासोबतही घालू शकता. लोकरीचं असल्याने हे हिवाळ्यात शोभूनही दिसेल. या श्रगसोबत तुम्ही एखादा स्कार्फ कॅरी करू शकता. बाहेरगावी फिरायला जातानाही तुम्हाला हे श्रग वापरता येईल.
किंमत- 1241 रू
हे श्रग खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
अनेकजणींना बरगंडी रंग आवडत असतो. व्हाईट टी- शर्ट आणि ग्रे जीन्सवर हे श्रग फारच उठून दिसेल. लॉंग श्रगला कोल्ड शोल्डर लुक दिल्याने या श्रगला एक फंकी लुकदेखील मिळाला आहे. जर तुम्हाला असा हटके लुक आवडत असेल तर हे श्रग तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवं.
किंमत- 449 रू
हे श्रग खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
Also Read: 17 Trendy Winter Jackets In Marathi
अॅनिमल प्रिंटची फॅशन सध्या ट्रेडमध्ये आहे. जर तुम्हाला वेस्टर्न टॉप आणि जीन्स आवडत असतील तर त्यावर अॅनिमल प्रिंटमुळे तुम्हाला एक वेगळा लुक मिळू शकतो. या श्रगसोबत एक लॉंग नेकपीस अवश्य कॅरी करा.
किंमत - 1019 रू
हे श्रग खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लीक करा.
काही रंग असे असतात जे कोणावरही आणि कोणत्याही कपड्यांसोबत मॅच होतात. लाल रंग हा असाच एक रंग आहे. शिवाय लाल रंगाचे कपडे हिवाळ्यात सूटही करतात. त्यामुळे लोकरीच्या कापडाचं हे जॅकेट तुम्हाला एक स्टायलिश लुक नक्की देऊ शकेल. शिवाय लाल रंगामुळे तुम्ही एखाद्या रोमॅंटिक डेटवर जाताना हे श्रग वापरू शकता.
किंमत - 900 रू
या लाल रंगाच्या श्रगची खरेदी तुम्ही या ठिकाणी करू शकता.
पिवळ्या रंगाच्या या स्टायलिश श्रगमुळे तुम्हाला नेहमी पेक्षा वेगळा लुक नक्कीच मिळेल. शिवाय पिवळा रंग असल्याने कोणत्याही काळ्या, सफेद, मरून अथवा गडद रंगाच्या कपड्यांसोबत हे कॅरी करू शकाल. या श्रगचे बेल स्लीव्हज तुम्हाला जरूर आवडतील. शॉर्ट जीन्स आणि स्पेगेटीवरही हे श्रग मस्तच दिसेल.
किंमत - 1135 रू
यलो कलरचे हे लॉंग श्रग तुम्ही या ठिकाणी क्लीक करून खरेदी करू शकता.
हे एक जरा वेगळ्या लुकचं श्रग तुम्ही तुमच्या वेस्टर्न कलेक्शनसाठी अवश्य खरेदी करू शकता. नेहमीपेक्षा वेगळा लुक असल्याने तुम्ही यात स्टायलिशही दिसाल. शिवाय हिवाळ्यात यामुळे तुम्हाला थंडीही लागणार नाही. निळ्या रंगाच्या या श्रगला आकर्षक लुक देण्यासाठी पिवळ्या रंगाची कॉलर देण्यात आली आहे. अधिक चांगल्या लुकसाठी यासोबत शॉर्ट वनपीस आणि हायहील्सचे शूज कॅरी करा.
किंमत - 719 रू
हे स्टायलिश लुकचं श्रग तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.
यासाठी तुम्ही लॉंग अथवा नी लेंथ श्रग नक्कीच सुंदर दिसेल. मात्र लक्षात ठेवा शक्य असल्यास तुमच्या श्रगच्या बाह्या पुर्ण असतील याची काळजी घ्या. ज्यामुळे तुम्ही सुडौल दिसू शकता.
वास्तविक तुम्ही कसा ड्रेस घातला आहे यावर तुम्हाला कोणता श्रग चांगला दिसेल हे अवलंबून आहे.
मात्र पांढऱ्या रंगाच्या ड्रेससोबत काळ्या, निळ्या, लाल असे कोणत्याही रंगाचे लॉंग श्रग चांगले दिसतील.
वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळा लुकचे श्रग घालता येऊ शकतात. मात्र पिकनिक, शॉपिंग, प्रवास करताना श्रग घालणं नेहमीच योग्य दिसतो.
आम्ही तुम्हाला 500 रू. पासून 2000 रू. च्या रेंजमधील स्टायलिश श्रग सूचवले आहेत. तुम्ही त्यापैकी तुमच्या बजेटनुसार कोणतेही श्रग विकत घेऊ शकता. तुम्हाला स्वतःचे कपडे स्वतः डिझाईन करण्याची आवड असेल तर या स्टाईलचे श्रग तुम्ही डिझाईन करुनही घेऊ शकता. थोडक्यात या हिवाळ्यात या प्रकारचे श्रग जर तुमच्या वॉर्डरोबमध्ये असतील तर तुमचा लुक नक्कीच हटके दिसू शकेल.
You Might Like These:
हे ‘30’ ग्लॅमरस आणि हटके पंजाबी सूट तुम्हाला नक्कीच आवडतील
Cotton and Handloom Blouse Designs: कॉटन आणि हॅंडलूम ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स
तुमच्या वॉडरोबमध्ये असायलाच हव्यात या गोष्टी!
ऑफिसमध्ये घालण्यासाठी परफेक्ट आऊटफिट्स
ग्लॅमरस आणि स्टायलिश कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा ‘फॅशन फंडा’
फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक