1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यासाठी 105 हुतात्मांना आपले रक्त सांडावे लागले होते. हा दिवस महाराष्ट्रभरात साजरा केला जातो. महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या जातात. आता संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा हाच इतिहास एका वेबसिरिजच्या माध्यमातून जगासमोर मांडला जाणार आहे. हुतात्मा या वेबसिरिजमधून हा इतिहास उलगडला जाणार आहे. 1 मे रोजी हुतात्मा वेबसिरिज प्रदर्शित केली जाणार आहे. मीना देशपांडे यांच्या ‘हुतात्मा’ या कांदबरीवर आधारित ही वेबसिरिज असणार आहे. ही वेबसिरिज झी-5 या अॅपवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. एकुण दोन पर्वात ही वेबसिरिज प्रदर्शित केली जाणार आहे. पहिल्या पर्वात या मालिकेचे सात भाग दाखविण्यात येतील. जयप्रद देसाई यांनी या वेबसिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. या मालिकेतून 1955 चा ऐतिहासिक काळ रंगवण्यात आला आहे. त्यामुळे सहाजिकच यासाठी लोकेशन, कलाकारांची वेशभूषा त्या काळाला शोभेल अशीच करण्यात आली आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ
स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य निर्माण करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ करण्यात आली होती. त्यातूनच 1 मे 1960 मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि राजकीय अशा सर्वच स्थरातून ही चळवळ पुकारण्यात आली होती. या चळवळीचा ऐतिहासिक प्रवास हुतात्मा या वेबसिरिजमधून पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी केलेलं आंदोलन आणि मराठी जनतेचा संघर्ष यात दिसणार आहे.
हुतात्मा वेबसिरिज 1 मे ला होणार प्रदर्शित
हुतात्मा वेबसिरिजमध्ये अनेक कलाकार असणार आहेत. अंजली पाटील, वैभव तत्ववादी, अभय महाजन, सचिन खेडेकर, अश्विनी काळसेकर, मोहन आगाशे, लोकेश गुप्ते, आनंद इंगळे,रविद्र मंकणी, विक्रम गोखले,मनोज कोल्हटकर, अरिफ झाकरिया आणि छाया कदम अशा अनेक दिग्गज कलाकारांचं अभिनय कसब या मालिकेतून पाहता येणार आहे. शिवाय महाराष्ट्राच्या निर्मितीची ही संघर्षकथा प्रत्येक मराठी भाषिकाने पहावी अशीच आहे.
#Engagement – मिस युनिव्हर्स सुश्मिताला मिळाला मिस्टर परफेक्ट
जेव्हा मि. परफेक्शनिस्टच्या एका शब्दावर धकधक गर्लने दिला होकार
अर्जुन कपूर मलायकाबरोबर करणार नाही लग्न कारण…
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम