ADVERTISEMENT
home / Love
लॉकडाऊनमध्ये करा या टिप्स फॉलो, पार्टनरसोबतचं नातं होईल दृढ

लॉकडाऊनमध्ये करा या टिप्स फॉलो, पार्टनरसोबतचं नातं होईल दृढ

देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस या व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने लोकं दगावत आहेत. कोरोनाचा कहर किंती आहे याचा अंदाज आता तुम्हाला रोजचे रूग्णांचे आकडे पाहून आला असेलच. रूग्णांच्या आकड्यांसोबतच दगावणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. ज्यामुळे सरकारने तातडीने अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावला आहे. त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही सगळे घरीच आहेत. या जीवघेण्या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लोकं घरातच वेळ घालवत आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं आहे. या संकटाच्या काळात लोकं आपल्या पार्टनरसोबत घरात आहेत. पण नेहमी घर असणं आणि लॉकडाऊनच्या काळात एकत्र असणं यात फरक आहे.

लॉकडाऊनदरम्यान आपल्या पार्टनरसोबत घरी असताना तुम्ही अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमच्या पार्टनरसोबतचं तुमचं नातं अधिक मजबूत होईल. आजच्या लेखात आपण अशाच काही गोष्टींवर लिहीलं आहे, ज्यांची तुम्ही काळजी घ्यायची आहे.

कामात मदत करा

Pinterest

एकमेकांना कामात मदत करा

ADVERTISEMENT

लॉकडाऊनमुळे पार्टनर एकमेकांना जास्तीतजास्त वेळ देत आहेत. जे आधी धावपळीच्या आयुष्यात शक्य नव्हतं ते आता लॉकडाऊनमुळे शक्य झालंय. जर तुम्ही आपल्या पार्टनरसोबत घरी आहात तर घराची साफसफाई, जेवण बनवणं, मुलांची काळजी घेणं किंवा बाहेरून एखादी गोष्ट मागवणं यासाठी आपल्या पार्टनरची मदत घ्या किंवा पार्टनरला मदत करा. असं केल्याने तुमच्या प्रेम अजून वाढेल आणि लॉकडाऊनच्या काळातील कंटाळा ही दूर होईल.

पार्टनरची घ्या काळजी

जर लॉकडाऊनच्या काळात तुम्ही दोघंच घरी असाल तर तुमच्या पार्टनरच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या. एकमेकांची वेळोवेळी काळजी घ्या त्याला किंवा तिला एखाद्या गोष्टीची गरज आहे का, ते विचारा. या कठीण काळात जर तुम्ही एकमेकांची काळजी घेतलीत तर तुमचं भविष्यातलं नातं अजून घट्ट होईल. लक्षात घ्या या काळात रूसवे फुगवे विसरून एकमेकांना जपणं जास्त गरजेचं आहे.

गोड क्षणांची आठवण

Pinterest

गोड क्षणांची आठवण

ADVERTISEMENT

प्रत्येक कपलच्या आयुष्यात एकमेकांसोबत घालवलेल्या गोड किंवा दुःखद क्षणांच्या आठवणी असतात. पण कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात चुकूनही कडू किंवा दुःखद आठवणींचा उल्लेख करू नका. असं केल्याने तुमच्या दोघांमधील तणाव वाढू शकतो. त्यामुळे नेहमी अशा गोष्टींकडे लक्ष द्या ज्यामुळे तुमचं नातं मजबूत होईल. गोड क्षणांना आठवून येणाऱ्या काळाची किंवा भविष्यात करता येतील अशा गोष्टींचं प्लॅनिंग करा आणि सकारात्मक राहा.

वाद-विवाद टाळा

असं म्हणतात जिथे प्रेम असतं तिथे तक्रारही असते. पण जेव्हा जोडीदार एकमेंकासोबत घरात जास्तीजास्त वेळ असतात तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवरूनही वाद होऊ लागतात. छोट्याशा गोष्टींचा मोठा मुद्दा व्हायला वेळ लागत नाही आणि मग वादाचं रूपांतर भांडणात होतं. रागाच्या भरात वॉट्सअपसाठी अॅटीट्यूड स्टेटस ठेवून लोकाचं लक्ष वेधून घेऊ नका. ज्यामुळे तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपल्या जोडीदारासोबत वाद करणं टाळा आणि प्रेमाने राहा. सोशल मीडियापासून ब्रेक घेतला तरी हरकत नाही.

मनातल्या गोष्टी शेअर करा

Pinterest

मनातल्या गोष्टी शेअर करा

ADVERTISEMENT

नेहमीच्या दगदगीच्या आयुष्यात जोडीदाराला वेळ न देता आल्यामुळे नात्यात दुरावा येतो. कामाच्या ताणामुळे आणि प्रवासाच्या थकव्यामुळे तुम्ही जास्त वेळ एकमेकांशी बोलूही शकत नाही. ज्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. जर तुम्ही दोघंही घरी असाल तर मन मोकळं करा. एकमेकांच्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि मनातले हेवेदावे किंवा शंका-कुशंका विसरून आपल्या जोडीदारासोबत जवळीक वाढू द्या.

एकमेकांना द्या सरप्राईजेस

सरप्राईझ म्हटल्यावर ते काहीतरी मोठं आणि महागडं असलं पाहिजे असं काही नाही. जर तुमच्या पार्टनरबद्दल तुमच्या मनात प्रेम असेल तर ते सांगणंही गरजेचं असतं. दिवसाची सुरूवात किस देऊन करा. तो किंवा ती जेव्हा कामात व्यस्त असेल तेव्हा त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवा आणि हलकसं किस करा. त्यांना न मागता कॉफी करून द्या. सुरूवातीला हे अजब वाटेल पण अशा छोट्या छोट्या गोष्टींनी तुमच्यातील प्रेम नक्कीच वाढेल.

एकमेंकाना करा मसाज

Pinterest

एकमेंकाना करा मसाज

ADVERTISEMENT

सध्या आपण घरात बसून वर्क फ्रॉम होम करत असलो तरी सगळ्यांवरच एक प्रकारचा ताण आहे. त्यामुळे वीकेंड किंवा सुट्टीच्या दिवशी एकमेंकाना मस्तपैकी मसाज करा. छान लाईट म्युजिक लावून त्याचा आनंद घ्या. नुसता हेड मसाज केला तरी आपल्याला अगदी फ्रेश वाटतं. तुम्ही दोघं एकत्र आहात त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि रिलॅक्स व्हा.

जेवणाचं प्लॅनिंग

Pinterest

जेवणाचं प्लॅनिंग

लॉकडाऊनमुळे बाहेर जाऊन रोमँटीक डिनर करणं शक्य नाही पण घरच्याघरी रोमँटीक डिनर करायला काय हरकत आहे. यामुळे तुमच्या कंटाळवाण्या डेली रूटीनमध्येही जरा बदल होईल. तुमच्या आणि त्याच्या आवडीचं जेवण करा किंवा त्याला तुमच्या आवडीची एखादी डिश करायला सांगा. जर त्याला येत नसेल तर तुम्ही दोघांनी मिळून करा. मस्तपैकी टेबल सजवा आणि रेस्टॉरंटसारखा किंवा त्यापेक्षाही छान एकांतातला डिनर करा.

ADVERTISEMENT

कडलिंग करा

अनेक कपल्सना सेक्सपेक्षा कडलिंग करायला जास्त आवडतं. कडलिंग म्हणजे फक्त एकमेकांचा सहवास आणि जवळ राहणं असतं. ज्यात तुम्ही एकमेकांना मिठी मारू शकता. एकमेंकाजवळ फक्त झोपून राहा. काही आवडत्या गोष्टींवर बोला. यामुळे तुमचा आणि त्याचाही मूड बदलेल.

नाईट करा स्पेशल

Pinterest

नाईट करा स्पेशल

बाहेर फिरायला जाणं किंवा वेकेशनला जाणं शक्य नाही म्हणून तुम्ही तुमची सेक्सी लाँजरी जर कपाटातल्या कोपऱ्यात ठेवली असेल तर लॉकडाऊनमधल्या एकांताचा उपयोग करून घ्या. मस्तपैकी सेंटेड कँडल लावून वातावरण रोमँटीक बनवा. तुमच्या पार्टनरला आवडणारी लाँजरी घालून त्याला सरप्राईज द्या. तुमच्या अदांनी त्याला घायाळ करा.

ADVERTISEMENT

कशा वाटल्या वर सांगितलेल्या टिप्स? लॉकडाऊनला आपल्या पार्टनरचं मन जिंकायची सुवर्णसंधी समजा. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. तुम्ही नात्यांशी निगडीत अजूनही लेख आमच्या वेबसाईटवर वाचू शकता.

28 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT