उन्हाळ्याच्या दिवसात सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे डास, माशा आणि उंदरांचा सुळसुळाट. घर कितीही स्वच्छ ठेवले तरीही अचानक इतके डास कुठून येतात असा प्रश्न पडतो. पण यावर नक्की उपाय काय करायचा ते कळत नाही. सतत पेस्ट कंट्रोल (Pest Control) करणं तर शक्य नाही. पण यावर काहीतरी उपाय मात्र करायला हवा. मग अनेक घरांमध्ये धूप, कापूर, ऑल आऊट या सगळ्या वापर केला जातो. पण त्याने अगदी काही तासांपुरता तुम्हाला फरक दिसून येतो. पण तुम्ही देशी हॅक्सचा वापर करून यावर उपाय करू शकता. आम्ही तुम्हाला असेच काही हॅक्स सांगणार आहोत जे तुमच्या घरात उन्हाळ्यात निर्माण झालेले डास, माशा आणि उंदीर यांना पळवून लावण्यास मदत करतील.
डास, माशा, मुंग्या आणि किडे घालविण्यासाठी हॅक
हे हॅक विशेषतः उडणाऱ्या किटकांसाठी आहे. तुम्ही रोज दिवसातले 5 मिनिट्स काढा आणि हा उपाय करून पाहा. उन्हाळ्यात संध्याकाळच्या वेळी तुम्ही हा उपाय करा
साहित्य
- 1 लहान मातीचे भांडं
- थोडेसे तमालपत्र
- कडुलिंबाचे तेल अथवा मोहरीचे तेल
- कापूर
सर्वात पहिल्यांदा कापूर वाटून तो तेलात मिक्स करा. कापूर वाटताना असे भांडे घ्या जे पुन्हा वापरण्यासाठी नको असेल. अन्यथा कापराचा वास जात नाही. तेलात कापूर व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर तमालपत्र तोडून मातीच्या भांड्यात टाका आणि त्यावर कापूर आणि तेलाचे मिक्स्चर ओता. या मिश्रणाला मातीच्या भांड्यात आग लावा आणि मग विझवा. जेणेकरून यातून धूर निघत राहील. खोलीमध्ये हे भांडे ठेवा आणि साधारण 5 मिनिट्स दरवाजा बंद करून ठेवा. रोज संध्याकाळी तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात हा उपाय करून पाहा. यामुळे घरातील माशा आणि डास निघून जाण्यास मदत मिळते. कडुलिंबाचे अनेक फायदे आहेत. याचा उपयोग करून घेता येतो.
झुरळं, उंदीर मारण्याची पद्धत
जमिनीवर चालणे किडे अर्थात झुरळ, उंदीर मारण्यासाठी उपाय हवा असेल तर तुम्ही या गोष्टींचा वापर करावा
साहित्य
- थोडेसे गव्हाचे पीठ
- साखर
- बोरीक अॅसिड
- थोडेसे तेल
वरील सर्व साहित्य गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करा. हे तुम्ही भिजवा यामध्ये बोरीक अॅसिडचे प्रमाण अधिक असू द्या. आता याचे लहान लहान गोळे बनवा आणि किचन सिंक आणि कोपऱ्यामध्ये ठेवा अथवा अशा ठिकाणी ठेवा जिथे झुरळं जास्त असण्याची शक्यता आहे. हे मिश्रण खाल्ल्यानंतर उंदीर, झुरळं मरतात आणि पुन्हा येत नाहीत.
किड्यांसाठी बनवा स्प्रे
घरच्या घरी तुम्ही एक चांगला स्प्रे बनवू शकता ज्यामुळे डास आणि किटक नष्ट करायला तुम्हाला मदत मिळेल. यासाठी कशाचा वापर करावा ते जाणून घ्या.
साहित्य
- पाणी
- 3-4 चमचे व्हाईट व्हिनेगर
- एक चमचा कुटलेला कापूर
- अगदी थोडेसे डेटॉल
- एक लहान चमचा मीठ
- स्प्रे बाटली
हे सर्व एकत्र व्यवस्थित मिसळून ढवळून घ्या आणि मग स्प्रे बाटलीत भरा. त्यानंतर तुम्ही हा स्प्रे तुमच्या खोलीमध्ये मारा. तुमच्या घरात लहान मूल अथवा पाळीव प्राणी असतील तर तुम्ही विशेष काळजी घ्या. जर तुम्हीच असाल तर तुम्ही बिनधास्त रोज हा स्प्रे मारू शकता. याच्या वासाने डास आणि माशा नष्ट होतात.
घराच्या हायजीनची अशी घ्या काळजी –
- तुम्हाला जर वाटत असेल तर की घरात जास्त किटक आणि डास झाले आहेत तर स्वयंपाकघर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. काम झाल्यावर तिथली घाण लगेच स्वच्छ करा. अजिबात ओल ठेऊ नका
- ओली भांडी ड्रॉव्हरमध्ये कधीही ठेऊ नका. सुकवल्यावरच ठेवा
- मुंग्या जास्त असतील तर तुम्ही कधीतरी हळद पावडर पेरा. यामुळेही मुंग्या नाहीशा होण्यास मदत मिळते
- सुकलेल्या कडिलिंबाच्या पानांचाही यासाठी उपयोग होऊ शकतो. ही पानं जाळल्यास, डास शिल्लक राहात नाहीत
हे सर्व हॅक्स उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. तुम्ही याचा वापर करून नक्की पाहा आणि आम्हाला कळवा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक