टीव्हीवरील गाजलेली सीरियल ‘इस प्यार को क्या नाम दूं’ मुळे अनेकींचा हार्टथ्रोब झालेला अभिनेता बरूण सोबतीबद्दलची मोठी बातमी समोर आली आहे. जी ऐकून त्याच्या फॅन्सना नक्कीच आनंद होईल. बरूणला झाली आहे कन्या रत्नाची प्राप्ती. लग्नाच्या तब्बल 8 वर्षानंतर बरूणची बायको पश्मीन मनचंदाने नुकतंच मुलीला जन्म दिला. ज्यामुळे बरूणच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे आणि साहजिक आहे लग्नाच्या इतक्या वेळानंतर बाप होण्याचं सुख जे त्याला मिळालं आहे. साक्षात लक्ष्मीची पावलंच त्याच्या घरी अवतरली आहेत, असं म्हणायला हरकत नाही.
बरूणने याबाबत सोशल मीडियावर कोणतीही माहिती दिलेली नाही. पण काही दिवसांपूर्वीच त्याने इन्स्टावर बायको पश्मीनच्या बेबी शॉवरच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते.
सुंदर बेबी शॉवर
पश्मीनला जणू तिला मुलगी होणार हे आधीच कळल्यासारखं तिने बेबी शॉवरला छान पिंक गाऊन घातला होता. या गाऊनमध्ये तिने क्युट फोटोसेशनही केलं. या बेबी शॉवरला अनेक टीव्ही सीरियल सेलेब्स आणि या कपलचे मित्र मंडळींनी हजेरी लावली होती. याबाबतचे फोटो बरूणने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. ज्यामध्ये बरूण आणि पश्मीन फारच सुंदर दिसत होते. अगदी परफेक्ट कपल. या सेलिब्रेशनला मोहीत सहगल, शनाया ईरानी, रिद्धी डोगरा आणि अक्षय डोगरा हे टीव्ही सेलेब्स आले होते.
वरूण आणि पश्मीनची लव्ह स्टोरी
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, लग्नाआधी पश्मीन आणि बरूण हे खूप चांगले मित्र होते. दोघांनीही एकाच शाळेतून शिक्षण पूर्ण केलं आहे. एका मुलाखतीत बरूणने सांगितलं होतं की, पश्मीन त्याला लहानपणापासून आवडायची. तो पश्मीनला खूष करण्यासाठी कविताही लिहीत असे. इयत्ता नववीपासून हे दोघं स्कूल स्वीटहार्ट्स होते. अखेर या दोघांनी 2010 मध्ये लग्न केलं. आता हे कपल आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी निघालं आहे. #POPxoMarathi कडून बरूण आणि पश्मीनला खूप खूप शुभेच्छा.
हेही वाचा –
सीरियल क्वीन एकता कपूरकडे आला नवा पाहुणा