ADVERTISEMENT
home / Family
Love Msg And Quotes For Wife In Marathi

Love Msg And Quotes For Wife In Marathi | बायकोसाठी प्रेमाचे संदेश

प्रत्येक पुरूषाच्या यशामागे एक स्त्री असते. आयुष्याच्या काही टप्प्यावर ती आई, बहीण, मुलगी या नात्यातून पाठीशी उभी राहते. मात्र स्त्री जेव्हा पत्नी होते तेव्हा ती आयुष्यच काय सात जन्म साथ सोडत नाही. समाजाने निर्माण केलेलं हे नातं वैवाहिक जीवनात कधी एकरूप  होऊन जातं ते तिच्या पतीलाही कधी कळत नाही. कुणाच्या घरची मुलगी अथवा बहीण जेव्हा लग्नानंतर तुमची पत्नी होते तेव्हा तिचं अवघं व्यक्तिमत्वच बदलून जातं. पत्नीची भूमिका सांभाळताना तिला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. स्वतःचा मूळ स्वभाव, आवडीनिवडी बदलून ती फक्त तुमच्या जीवनाची सहचारिणी झालेली असते. पत्नीला प्रत्येकवेळी मोठमोठ्या भेटवस्तू, महागड्या साड्या, मौल्यवान दागदागिनेच हवे असतात असं नाही. खरंतर तिला हवं असतं निस्वार्थ प्रेम, आदर आणि तिच्या कष्टाची जाणीण असणारं प्रेमळ मन… यासाठीच तुमच्या आयुष्यातील सहचारिणीसाठी, तुमच्या लाडक्या बायकोसाठी प्रेमाचे संदेश (Love Messages For Wife In Marathi) तसंच वाचा Husband Wife Relation Quotes In Marathi | नवरा – बायकोच्या हृदयस्पर्शी नात्यावरील कोट्स.

Romantic Love Msg For Wife In Marathi | पत्नीसाठी रोमॅंटिक प्रेम संदेश मराठीतून

Love Quotes In Marathi For Wife
Love Quotes In Marathi For Wife

बायकोला खूश करण्यासाठी सोशल मीडियावर अपडेट करा हे पत्नीसाठी खास रोमॅंटिक प्रेम संदेश (Love Quotes In Marathi For Wife).

1.बायको आहेस तू माझी…

जग इकडेतिकडेस झालं तरी

ADVERTISEMENT

तुझी जागा कायम ह्रदयातच असेल.

2. हजारो नाती आहेत माझ्या आयुष्यात

पण हजारो विरोधात जातात तेव्हा सोबत एकच असते. माझी बायको

3.पापण्यात लपलेली तुझी नजर

ADVERTISEMENT

माझ्याकडे पाहून लाजत आहे

कारण तुझ्या पायातील पैजणसुद्धा

माझ्यात नादात वाजत आहे

4.बायको असावी भांडण करणारी

ADVERTISEMENT

 कधी कधी रागाने धुसफूस करणारी

पण काही झालं तरी हक्काने फक्त

माझ्यासोबत उभी राहणारी

5. आयुष्यात हजारो मित्रमैत्रिणी येतात आणि जातात

ADVERTISEMENT

पण शेवटपर्यंत साथ देते ती फक्त बायकोच असते

6. बायकोपेक्षा आधी तू माझी प्रेमळ मैत्रीण आहेस

जी कायम मला समजूनच घेते

7. काळजी घेत जा स्वतःची

ADVERTISEMENT

कारण माझ्या या छोट्या जगात

तू खूप स्पेशल आहेस…

8. माझी मैत्रीण, माझी सर्वस्व माझी बायको…

माझ्यासाठी तुझ्यातच ही सर्व नाती आहेत

ADVERTISEMENT

 9. आयुष्यभर साथ द्यायची की नाही हा तुझा निर्णय आहे, पण मरेपर्यंत तुझा नवरा राहीन हा शब्द माझा आहे.

10. मी रोज नव्याने एका व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि ती व्यक्ती तू आहेस माझी बायको.

Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Love Quotes For Wife In Marathi | बायकोसाठी लव्ह कोट्स मराठीतून ()

Love Quotes In Marathi For Wife
Love Quotes In Marathi For Wife

बायको म्हणजे आयुष्यभर साथ देणारी जीवनसंगिनी अशा प्रेमळ पत्नीसाठी हे खास लव्ह कोट्स (Love Quotes In Marathi For Wife).

ADVERTISEMENT

1. एक स्वप्न, तुझ्यासोबत जगण्याचं

   एक स्वप्न, तुझ्यामागे माझं नाव लावण्याचं

2. नदीला या काठ दे, वाटेला माझ्या वाट दे, अडकतो जीव फक्त तुझ्यात माझा, आता फक्त आयुष्यभर साथ दे

3. माझी बायको फक्त माझ्यासारखीच असावी, ती माझी आणि मी तिचा

ADVERTISEMENT

4. तिची नेहमी तक्रार असते की, मी मुलींकडे पाहून हसतो, पण कधी कळणार तिला प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो.

5. जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करत नाही, ती माझ्यावर काय प्रेम करणार

6.आयुष्याचा प्रवास सारा तुझ्यासोबत घडावा, मी अखेरचा श्वास सुद्धा फक्त तुझ्या मिठीत सोडावा

7. तुझ्याशिवाय जगणं काय, जगण्याचं स्वप्नदेखील पाहू शकत नाही, एकवेळ श्वासाशिवाय जगेन पण तुझ्याशिवाय जगू शकत नाही.

ADVERTISEMENT

8. तुझं हसणं आणि माझं फसणं एकाच वेळी घडलं, नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं

9. बायको रिस्पेक्ट करणारी पाहिजे कारण भांडण तर गर्लफ्रेंडपण करतेच.

10. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात, अगदी प्रलयाच्या वाटेवरही असेल मला तुझी साथ

Valentine Marathi Love Msg For Wife | बायकोसाठी व्हॅलेंटाईन संदेश मराठीतून

Love Msg For Wife In Marathi
Love Msg For Wife In Marathi

लवकरच व्हॅलेंटाईन डे येत आहे. तेव्हा हा प्रेम दिन साजरा करण्यासाठी तुमच्या लाडक्या बायकोला पाठवा हे स्पेशल  व्हॅलेंटाईन संदेश मराठीतून (Valentine Marathi Love Msg For Wife) 

ADVERTISEMENT

1. तू आहेस म्हणून तर, सगळे काही माझे आहे, तूच माझ्या प्रेमाचा गंध आणि तुझ्यामुळे वातावरणात सुगंध आहे.

2. तू इतक्या प्रेमाने माझ्याकडे पाहावं की तुझ्या नुसत्या पाहण्यानेच तुझ्या पायातील पैजण वाजावं…

3. तू घरी नसतेस तेव्हा तुझी उणीव भासते, बायको तू मला माझ्या पेक्षाही प्रिय वाटते.

4. प्रेमाने माझ्या दिली माझ्या आयुष्याला नवी दिशा, तू नसशील तर मात्र आयुष्याची होईल माझ्या दशा.

ADVERTISEMENT

5.तुझ्या कवेत मला आयुष्य माझे काढायचे आहे, तुझ्या प्रेमाच्या पावसात चिंब चिंब भिजायचे आहे.

6. शब्दात नाही सांगता आलं तर डोळ्यातून समजून घेशील ना, अस्वस्थ जेव्हा जेव्हा होईन मला धीर देशील ना.

7. तुझ्या शिवाय माझे जगणे कठीण आहे, पण हे तुला सांगणे सर्वात जास्त कठीण आहे… बायको.

8. कातरवेळ आणि उधाणलेला सागर, हातात हात आहे हात तुझा आणि मन झाले अनावर.

ADVERTISEMENT

9. सगळी दुनिया रूसली तरी चालेल पण, माझ्या आईची सून रूसली नाही पाहिजे.

10. लग्नाचा वाढदिवस काय येईल आणि जाईल, पण आपल्या प्रेमाची बरसात मात्र अशीच सुरू राहिल.

व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या प्रेयसीला द्या ‘हे’ स्पेशल गिफ्ट (Valentines Day Gift Ideas In Marathi)

Deep Marathi Love Status For Wife | बायकोसाठी प्रेम स्टेटस

Marathi Love Status For Wife
Marathi Love Status For Wife

आजकालचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. तेव्हा सोशल मीडियावर स्टेटस अपडेट करा आणि व्यक्त करा तुमचे तुमच्या लाडक्या बायकोवरील प्रेम (Love Sms For Wife In Marathi).

ADVERTISEMENT

1. बायको तू कायम अशीच राहा मला तुझ्यासोबतच म्हातारं व्हायचं आहे.

2. मी किती भाग्यवान मला मिळाली तुझ्यासारखी बायको, पण मग बाकींच्याच्या पोटात दुखा कायको

3.प्रेम हवेसारखं असतं, तुम्ही त्याला पाहू शकत नाही पण अनुभवू शकता.

4. पती आणि पत्नी एकतर एकमेकांची ताकद असू शकतात किंव्हा मग कमजोरी…

ADVERTISEMENT

5. थोडा मी, थोडी तू आणि भरपूर प्रेम… एवढंच पुरेसं आहे आपल्याला… एकमेकांसोबत जगण्यासाठी.

6. तुझ्यावर माझं एवढं प्रेम आहे की रागात जरी तुझं नाव मनात आलं तरी मला फक्त मला प्रेमच वाटत.

8. ही काय इच्छा आहे जी कधीच संपत नाही, कितीही तुला पाहिलं तरी मन भरतच नाही.

9. बायको पुढे जगातील कोणत्याच पतीचं काहीच चालत नाही.

ADVERTISEMENT

10.प्रेमात तुझं माझ्यावर एवढं कर्ज झालंय की सात जन्म फेडलं तरी फिटणार नाही.

Romantic Love Status For Wife In Marathi | बायकोसाठी रोमॅंटिक प्रेम स्टेटस

Romantic Love Status For Wife In Marathi
Romantic Love Status For Wife In Marathi

बायकोसाठी रोमॅंटिक प्रेम संदेश आणि स्टेटस, ज्यामुळे तुम्हाला पत्नीसोबत सहज व्यक्त करता येतील तुमच्या मनातील प्रेमाच्या भावना (Romantic Love Quotes For Wife In Marathi).

1.कधी मी रागावलो तर तू प्रेमाने मिठीत घे, आणि कधी तू रागावलीस तर मी माफी मागेन.

2. तुझ्यावर माझं किती प्रेम आहे हे शब्दात सांगता नाही येणार… फक्त इतकंच सांगेन तुझ्याशिवाय जगता येणार नाही.

ADVERTISEMENT

3. तुझ्या प्रेमाने एक गोष्ट शिकवली, एकमेकांच्या साथीशिवाज जगणं फिकं आहे.

4.बायकोची काळजी घेणं म्हणजे नवऱ्याचं कर्तव्य आहे गुलामी नाही.

5. तुला पाहिलं त्या क्षणी ठरवलं हिच्याशीच आयुष्यभर गुजगोष्टी करायच्या आहेत.

6. सुरुवातील आपण एकमेकांनासाठी अनोळखी होतो आणि आता दोन जान एक जीव

ADVERTISEMENT

7. मला  माफ कर माझ्यामुळे तुला राग आला… पण तू रागात आणखी हॉट दिसतेस.

8. काही लोक एकदा भेटतात आणि बदलून जातात, काही मात्र तुमचंच आयुष्य बदलतात. माझं आयुष्य बदलणारी माझी बायको, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.

तुमचं तुमच्या बायकोवर असलेलं  प्रेम व्यक्त करण्यासाठी खरंतर जगातील सारे शब्द अपुरे पडावेत. पण तरीही शब्दातून मांडलेल्या या प्रेमभावना तुम्हाला कशा वाटल्या, हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

19 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT