त्वचेला खाज येणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पावसात भिजल्यावर, धुळ, माती, घाम यामुळे त्वचेवर खाज येऊ शकते. कधी कधी तर अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळेही तुमच्या त्वचेला खाज येण्याची शक्यता असते. अशी त्वचेवर येणारी खाज काही वेळात आपोआप कमी होते. मात्र तुम्हाला सतत त्वचेवर खाज येत असेल अथवा त्वचेवरील अती खाजेमुळे तु्म्ही त्रस्त असाल तर या समस्येकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. कारण सतत मान, हातपाय, कंबर अशा ठिकाणी खाज येणं हे तुम्ही प्रिडायबेटिक असण्याचं लक्षण असू शकतं.
मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय (How To Control Diabetes In Marathi)
मधुमेहींच्या अंगाला का येते खाज
जर तुम्ही मधुमेही असाल अथवा तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता असेल तरी तुमच्या अंगाला खाज येऊ शकते. याचं कारण तुमच्या शरीरात इन्सुलीनची पातळी वाढणे असू शकते. मधुमेहाचे हे एक मुख्य लक्षण असू शकते. काही रूग्णांच्या त्वचेवर तर खाजेमुळे खपली निघते अथवा फोडदेखील येतात. हात, पाय, पावलं अशा अवयवांवर जास्त प्रमाणात खाज येते. हातापायांच्या तळव्यांचा खूप दाह होतो. याचं कारण रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे रक्ताभिसरण आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यात अडतळा येतो. ज्यामुळे तुमच्या हातापायांचा दाह होतो, बऱ्याचदा हात पाय मुंग्या येण्यामुळे बधीर होतात. अशा रुग्णांच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. त्वचेवर खाज आल्यावर खाजवल्यामुळे त्वचेवर नखांचे ओरखडे येतात जे लवकर कमी होत नाहीत.
दीर्घायुषी व्हायचं असेल तर आताच स्वतःला लावा ‘या’ चांगल्या सवयी
मधुमेहींनी त्वचेला येणारी खाज कशी कमी करावी
अचानक अंगाला खाज आल्यामुळे तुम्ही त्रस्त होतात. त्वचा कोरडी झाल्यामुळे तुमच्या अंगाला खाज येत आहे असं तुम्हाला वाटतं. त्वचेला मऊपणा येण्यासाठी तुम्ही खूप मॉईस्चराईझरचा वापर करता. बऱ्याचदा त्वचेवर खाज कमी करण्यासाठी मेडिकेडेड लोशन लावलं जातं. मात्र अशसा बाह्य उपचारांचा या खाजेवर काहीच परिणाम होत नाही. जर तुम्ही मधुमेही असाल आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे तुमच्या त्वचेला खाज येत असेल तर यावर मधुमेह नियंत्रित ठेवणं हा एकमेव उपाय आहे. यासाठी आहारात बदल करा, नियमित व्यायाम करा आणि निरोगी जीवनशैली आचरणात आणा. ज्यामुळे तुम्ही स्वस्थ राहाल आणि तुमची त्वचा निरोगी. तेव्हा लक्षात ठेवा जर तुमच्या त्वचेला सतत खाज येत असेल आणि कोणत्याही बाह्य उपचाराने ती बरी होत नसेल तर त्वरीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि रक्तातील साखर तपासून घ्या.