लहान मुलांना जे आवडेल ते देण्याचा हट्ट सगळ्या पालकांचा असतो. त्यामुळेच की काय बरेच लोक लहान मुलं जे मागतील किंवा बाजारात जे काही नवे येईल ते खाण्याचा हट्ट मुलांचा असतो. त्यामुळे पालकही मुलांना असा खाऊ देतात. पण काही गोष्टी मुलांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. अनेक जाहिराती मुलांना एनर्जी आणि प्रोटीन्स पुरवल्याचा दावा करतात. पण अशा गोष्टींमुळे लहान मुलांमध्ये साखर वाढण्याची शक्यता असते. तर चटपटीत गोष्टीमुळे लहान मुलांच्या शरीरात मीठ वाढण्याची शक्यता असते. अनेक डॉक्टर लहान मुलांच्या आहारातून काही गोष्टी कमी करण्याचा सल्ला देतात. मुलांच्या आहारातून कोणते स्नॅक्स आजच काढून टाकायला हवेत ते जाणून घेऊया
गोड क्रिम बिस्किटं
भारतात सध्या जिथे तिथे पाहायला गेल्यावर एका ब्रँडची गोड क्रिम बिस्किटं लहान मुलांच्या खूपच आवडीची आहेत. ही बिस्किटं चवीला चांगली असली तरी एका अभ्यासानुसार या बिस्किटांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साखर असते. अनेक देशांनी या बिस्किटाला आहारातून काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्यामुळे मुलांची साखर वाढू शकते. लहान मुल एखादी गोष्ट गोड लागू लागली की ते खाण्याचे प्रमाण विसरतात. पालकांनाही मूल काहीतरी खात आहे याचा आनंद असतो.त्यामुळे जर तुमची मुलं ही बिस्किटं खात असतील तर त्याचे प्रमाण कमी करणे आणि ते खाणे बंद करणे नेहमीच चांगले
कुरकुरीत पदार्थ
खूप वेळा लहान मुलांना चटपटीत खाण्याची खूपच जास्त सवय असते. अशा लहान मुलांना डाळ चटपटीत केली किंवा फोडणीचा भात केला तर तो जात नाही. पण त्यांना कुरकुरीत पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पालकही अनेकदा कटकट नको म्हणून मुलांना त्यांच्या आवडीचा खाऊ देऊ लागतात. पण कुरकुरीत आणि चटपटीत अशा हलक्या फुलक्या स्नॅक्समध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ असते. मीठाचे अतिसेवन हे ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगले नाही.
चॉकलेट्स
लहान मुलं म्हटली की त्यांना चॉकलेट खायला खूप जास्त आवडतात. पण असे असले तरी देखील लहान मुलांच्या नावाखाली विकली जाणारी काही चॉकलेट्स त्यांच्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक असतात. हल्ली खेळणी मिळतात म्हणून काही चॉकलेट्सची खरेदी भरपूर झालेली दिसते. पण यामध्येही अतिरिक्त गोडवा असतो. ज्यामुळे मुलांचे दात किडण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. मुलांना ते देणे बंद करा असे अजिबात नाही. पण त्याची सवय लागू नये. हट्ट करुन काही जणांना ते मिळवायची सवय झालेली आहे. असे होत असेल तर मुलांच्या आहारातून ती कशी काढून टाकता येईल याचा विचार नक्की व्हायला हवा.
तळलेले पदार्थ
लहान मुलांचा बटाटा फारच जास्त आवडीचा पदार्थ आहे. त्यांन इतर कोणत्याही भाज्या आवडत नाहीत. पण त्यांना बटाटा अगदी कोणत्याही स्वरुपात आणि कसाही जातो असे नाही. हल्ली बटाट्याचे फ्राईज अगदी लहान मुलांचेही आवडीचे झाले आहेत. असे पदार्थ खाल्ल्यामुळे मुलांमध्ये वजनवाढीचे प्रमाण वाढू लागले आहे. मुलांसाठी वजन वाढ ही चांगली नाही. हल्ली अनेक लहान मुलं जास्त जाड दिसतात.वयाहून अधिक जाड होणे आरोग्यासाठी मुळीच चांगले नाहीत.
आता मुलांच्या आहारात या काही गोष्टींचा समावेश सतत होत असेल तर पालक म्हणून तु्म्ही नक्कीच काळजी घ्यायला हवी.
अधिक वाचा
बाळाचे पोट साफ होण्यासाठी उपाय | Balachi Shi Honyasathi Upay