घरात बाळाची चाहुल जरी लागली तरी देखील बाळासाठी काय काय करायचे याचे प्लॅन्स सुरु होतात. बाळाची खोली कशी सजवायची, बाळाला कोणते कपडे घ्यायचे यासाठी घरातील सगळेच उत्सुक असतात. पण आणखी एक उत्सुकता असते ती म्हणजे बाळाच्या नावाची. घरात मुलगी झाली असेल तर तिचे नाव हटके असायला हवे असे सगळ्यांना वाटते. मुलीचे आद्याक्षर क आले असेल तर क वरुन मुलींची नावे (k varun mulinchi nave marathi), क वरुन मुलींची नावे 2022 तुम्हाल माहीत असायला हवीत. या शिवाय द वरुन मुलींची नावे, य वरुन मुलींची नावे या खेरीज मुलींची रॉयल नावे देखील ठेवू शकता. चला जाणून घेऊया क वरुन मुलींची नावे
Table of Contents
क वरुन मुलींची नावे – K Varun Mulinchi Nave Marathi
क वरुन मुलींची नावे ठेवायची असेल तर तुमच्यासाठी आम्ही खास मुलींची नावे शोधून काढली आहेत. चला जाणून घेऊया क करुन मुलींची नावे
मुलींची नावे | नावांचे अर्थ |
कुंजल | कोकिळा |
कपिला | गायीचे नाव |
कर्पुरा | कापरासारखी शुभ्र |
कल्पना | आभास |
कलावती | कला जपणारी |
कविता | एक पद्य |
कविशा | छोटी कविता |
कादंबरी | साहित्याचा एक प्रकार |
कांची | श्रीकृष्ण |
कांचनमाला | सोन्याची माळ |
कुमुदिनी | कमळ |
कुसुमावती | फुलांची माळ |
कुंदा | एक सुगंधी फुल |
काश्वी | उज्वल, चमत्कार |
काशी | पवित्र असे ठिकाण |
क वरुन मुलींची नावे 2022 – K Varun Mulinchi Nave 2022
मुलीचे नाव ठेवायचे तर ते लेटेस्टच असायला हवे. तुमच्या गोड- गोजिऱ्या मुलीसाठी आम्ही क वरुन मुलींची नावे 2022 म्हणजे अगदी लेटेस्ट नावे शोधून काढली आहेत.
मुलींची नावे | नावांचे अर्थ |
केशा | अत्यानंद |
कियारा | चमकदार, प्रसिद्ध |
कुजा | देवीचे रुप |
किराती | देवीचे नाव, गंगा नदीचे एक विशेषण |
केयरा | सुंदर नदी, पाण्याचे काटोकाट भरलेली नदी |
कनक | सोन्याने बनवलेली, सोन्याची |
करिश्वी | आदर्श व्यक्ती |
कौरिन | सुंदर अशी मुलगी |
किआ | नवीन सुरुवात |
कुंजा | अनमोल असा खजिना |
कैटरिना | शुद्ध |
कैलिशा | भाग्वयान स्त्री |
कलापी | सुंदर मोर |
केरा | अद्वितीय |
केयूर | फिनिक्स पक्ष्यासारखा एक अप्रतिम पक्षी |
क वरुन मुलींची युनिक नावे – K Varun Mulinchi Unique Nave
मुलीचे नाव युनिक असावे असे प्रत्येक आई- बाबांना वाटते. इतरांनी तिचे नाव घेताना त्यात युनिकपणा असावा असे वाटत असेल तर खास तुमच्यासाठी क वरुन मुलींची युनिक नाव शोधली आहेत. ही युनिक नावे तुम्हाला नक्की आवडतील अशी आहेत.
मुलींची नावे | नावांचे अर्थ |
कुहू | कोकिळेचे मंजूळ गीत |
कांतिदा | तेज देणारी |
किंकिणी | घुंगरांचा कमरपट्टा |
कौतुका | कौतुक करणारी |
कैवल्या | मोक्ष, परमानंद |
किंशुक | एक सुंदर लाल फुल |
कुशाग्री | बुद्धिमान |
कस्तुरी | हरणाच्या बेंबीतील सुगंधित द्रव्य |
कृपी | द्रोणाचार्याच्या पत्नीचे नाव |
कृषिका | कठीण परिश्रम करणारी |
काजोल | काजळ |
किश्वर | क्षेत्र, जागा |
किमया | चमत्कार |
किर्तना | भजन |
कविश्री | देवी लक्ष्मी |
क वरुन मुलींची पौराणिक नावे – K Varun Mulinchi Traditional Nave
क वरुन मुलांची काही पौराणिक सुंदर नावेही आहेत. ही नावे आजही वजनदार वाटतात. नाव घेताना वजन असेल तर अशी नावे नक्कीच छान वाटतात. चला जाणून घेऊया क वरुन मुलींची पौराणिक नावे
मुलींची नावे | नावांचे अर्थ |
कल्याणी | पवित्र गायीचे नाव |
कात्यायानी | देवी पार्वतीचे रुप |
कर्णप्रिया | कानांना प्रिय वाटतील असे |
कनुप्रिया | राधेचे नाव |
कंगना | हातात घालायचा दागिना |
कमलाक्षी | कमळासारखे डोळे असणारी |
कामाक्षी | देवी पार्वती |
कामाख्या | देवी दूर्गा |
कादंबिनी | मेघमाला |
कमलजा | कमळातून निर्माण झालेली |
कामना | सुंदर, इच्छा कमळ |
केसर | केशर वरुन तयार केलेले मुलीचे नाव |
कण्णगी | अन्यायाविरोधात आवाज उठवणारी महिला |
कारुण्या | अनुकंपा |
कामायनी | प्रेमाचे प्रतीक |
क वरून मुलींची नावे व अर्थ – Baby Girl Names With K Alphabet
क वरुन मुलींची अन्य काही नावे जाणून घ्यायची असतील तर ती देखील आम्ही शोधून काढली आहेत. ही नावे देखील तुम्हाला नक्की आवडतील अशी आहेत
मुलींची नावे | नावांचे अर्थ |
कांची | सोन्यासारखे चमकणारी |
कामाख्या | देवी दूर्गा |
कनाली | तेजस्वी |
कशिश | आकर्षक |
कशफ | शोध घेणारी |
काजल | डोळ्यांचे सौंदर्य वाढवणारी |
करीना | निर्दोष |
कनिका | छोटा कण |
कनिष्का | लहान |
कुमकुम | कुंकू |
कोमिला | नाजूक शरीर असलेली |
केनिशा | सुंदर जीवन |
केलका | चंचल, कलात्मक |
काहिनी | युवा, उत्साही |
कशनी | देवीचे नाव, महिला |
आता क वरुन मुलींचे नावे जाणून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलींची नाव क वरुन ठेवू शकता.